Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 6 जून 2024 : लक्ष्मी नारायणयोग! मिथुन राशीसह या ४ राशींवर राहिल विष्णुची कृपा, आर्थिक चणचण संपेल; वाचा राशीभविष्य

10

Aaj Che Rashi Bhavishya 6 june 2024:
आज ६ जून ज्येष्ठ अमावस्या, शनि जयंतीसह रोहिणी नक्षत्र आहे. तसेच पंचमहापुरुष योगासह अनेक योग तयार होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या योगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल. बुध -शुक्राच्या युतीमुळे काही राशींना फायदा होईल. हा योग अतिशय चांगला असून काही राशींना अचानक धनलाभ होईल. मिथुन राशीच्या लोकांना बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. तर तुळाराशीच्या लोकांनी काम वेळेत पूर्ण करायला हवे. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून

मेष – कामात आवड वाढेल

आजचा दिवस तुमच्या सांसारिक सुख-सुविधांमध्ये वाढ करेल. आज तुम्हाला काही नवीन कमात रुची जागृत होईल. कोणत्याही कामात गुप्तता राखावी लागेल, अन्यथा समस्या उद्भवतील. वैयक्तिक कामात तुमची आवड वाढेल. आज तुम्हाला मोठा फायदा मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यासोबत नात्यातील दूरावा दूर होईल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

वृषभ – विश्वास दृढ होईल

वृषभ - विश्वास दृढ होईल

पार्टनरशीपमध्ये काम करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. भावांमध्ये बंधुत्वाची भावना मजबूत होईल. भावनिक बाबींवर नियंत्रण ठेवता येईल. करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. तुमचा विश्वास दृढ होईल. काहीतरी मोठे साध्य करु शकता. पार्टनरशीपमध्ये काम करण्यात तुम्हाला अधिक आवड असेल. काही नवीन संपर्क आज जोडाल. कामात बढती मिळाल्याने आनंद मिळेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र आणि अन्नदान करा

मिथुन – बोलण्यात गोडवा ठेवा

मिथुन - बोलण्यात गोडवा ठेवा

आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. तुमच्या कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकामागून एक फायदेशीर संधी मिळतील. ज्याचे अनुसरण करुन तुम्ही चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. घरात आणि बाहेर संतुलन राखा. समस्या येतील. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा.

कर्क – आर्थिक कामांना चालना मिळेल

कर्क - आर्थिक कामांना चालना मिळेल

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कलात्मक कौशल्य सुधारेल. तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. आर्थिक कामांना चालना मिळेल. सासरच्या लोकांशी वाद घालणे टाळा, मतभेद होऊ शकतात. मित्राच्या मदतीने गुंतवणूक केल्यास फायदा होईल. प्रवास घडण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचा जप करा

सिंह- चिंतेत सापडाल

सिंह- चिंतेत सापडाल

आजचा दिवस तुमच्यासाठी सावध आणि सतर्क राहण्याचा आहे. शहाणपणाने आणि समतोलपणे पुढे गेल्यास तुमच्यासाठी चांगले राहिल. तुम्ही पारंपारिक कामात व्यस्त असाल. गुंतवणुकीशी संबंधित काही बाबींमध्ये कमी प्रगती होईल, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामात निष्काळजीपणा दाखवू नका.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा

कन्या – पैसे खर्च होतील

कन्या - पैसे खर्च होतील

आज नोकरदार लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे. मोठे उद्दिष्ट साध्य झाल्यावर आनंदी व्हाल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. कोणतेही जोखमीचे काम करु नका, अडचणीत सापडाल. घरात किंवा बाहेर दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. नवीन संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत शॉपिंगला जाल. ज्यामुळे पैसे खर्च होतील
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. रात्री काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

तुळ – वेळेवर काम पूर्ण करा

तुळ - वेळेवर काम पूर्ण करा

आजचा दिवस तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सोपवलेले काम वेळेवर पूर्ण कराल. विविध कामांमध्ये रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्याने मन प्रसन्न राहिल. कोणत्याही प्रवासाला जाताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणात तुमचा विजय होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणेश स्तोत्राचे पठण करा

वृश्चिक – निर्णय क्षमतेचा फायदा होईल.

वृश्चिक - निर्णय क्षमतेचा फायदा होईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. दीर्घकालीन योजना पुढे कराल. भावांकडून मदत मिळेल. काही प्रकरणांमध्ये तुम्ही संकोच न करता पुढे जाल. व्यवसायात काम पुढे ढकलू नका. अडचणींना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतील. निर्णय क्षमतेचा फायदा होईल. स्वत:च्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे लक्ष द्याल. अडचणी येतील.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा

धनु – नात्यात तणाव येईल.

धनु - नात्यात तणाव येईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडा कमजोर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांवर विचारपूर्वक विश्वास ठेवा. नवीन मार्गावर चालण्याची संधी मिळेल. नात्यात काहीसा तणाव येईल. अनपेक्षित परिस्थिती तुमच्या समोर उभी राहील. आज तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. रात्री कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

मकर – सकारात्मक राहाल

मकर - सकारात्मक राहाल

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या जुन्या कामांना गती मिळाल्याने आनंदी व्हाल. विचारपूर्वक जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी कराल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास राहिल. सर्वांना सोबत घेऊन राहाल, ज्यात तुम्हाला यश मिळेल. परेदशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. पार्टनरशीपमध्ये काम करताना जोडीदारावर लक्ष ठेवा
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असले. विष्णूचे नामस्मरण करा

कुंभ – नातेसंबंधात समन्वय साधा

कुंभ - नातेसंबंधात समन्वय साधा

कौटुंबिक जीवनात आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखला पाहिजे. भविष्यासाठी बजेट बनवण्यात यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. कामाच्या बाबतीत सावध राहा. कोणीतरी तुम्हाला त्रास देईल. काही लोकांशी सावधगिरी बाळगणे चांगले राहिल. नातेसंबंधात समन्वय साधा. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

मीन – विद्यार्थ्यांना यश मिळेल

मीन - विद्यार्थ्यांना यश मिळेल

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा ताण येईल. त्यातून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमचे मन प्रसन्न राहिल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. स्पर्धेत सहभागी होऊ शकता. विचार चांगला ठेवा
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमान चालीसाचे पठण करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.