Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fact Check : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ९८ मुस्लिम उमेदवार खासदार? व्हायरल मेसेजचं सत्य काय?

12

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, सोशल मीडियावर एक लांबलचक मेसेज व्हायरल होत आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि एक केंद्रशासित प्रदेश पाँडिचेरी या चार राज्यांतून लोकसभेचे जवळपास ९८ मुस्लिम खासदार निवडून आले असल्याचा मेसेज शेअर केला जात आहे. मात्र न्यूजचेकरने तपासणी केली असता, त्यांच्या तपासणीत व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.

या लोकसभा निवडणुकीत देशभरातून २४ मुस्लिम लोकसभा खासदार निवडून आले आहेत, त्यापैकी ६ पश्चिम बंगाल, ३ केरळ, १ तमिळनाडू, १ आसाममधून निवडून आले आहेत. ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९२ जागा मिळाल्या. तर काँग्रेससह इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या. इतरांनी १७ जागा जिंकल्या आहेत.
Fact Check : पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ नितीन गडकरी उभे राहिले नाहीत? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
एका लांबलचक व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे, की पश्चिम बंगालमधून सुमारे ३७ मुस्लिम लोकसभेचे खासदार निवडून आले आहेत. त्याचवेळी आसाममधून २२, तमिळनाडूतून ५ आणि केरळमधून सुमारे २३ मुस्लिम लोकसभा खासदार निवडून आले आहेत. याशिवाय एएमएच नाझिम हे पाँडिचेरीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय या मेसेजमध्ये आणखी काही मजकूरही या यादीत आहेत, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, ‘ही संपूर्ण यादी वाचल्यानंतर तुम्हाला भविष्याची काळजी वाटत नसेल, तर कदाचित तुम्हीही त्यांच्यामध्ये लपलेला लांडगा आहात. हिंदू. कबुतराने डोळे बंद केले तर मांजर पळून जात नाही.

navbharat-times-110819432.

Courtesy: FB/jayshankar.prashad.3

काय आहे फॅक्ट चेक?

न्यूजचेकरने व्हायरल मेसेजची तपासणी केली असता, त्यात लिहिलेल्या वेगवेगळ्या राज्यांचाही तपास केला. आपल्या तपासात न्यूजचेकरने सर्वात आधी पश्चिम बंगालचा तपास केला. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या निकालानुसार लोकसभेच्या ४२ जागांपैकी केवळ ६ जागांवर मुस्लिम खासदार निवडून आले असून, त्यापैकी तृणमूल कांग्रेसच्या तिकिटावर बहरामपूरमधून युसूफ पठाण, बशीरहाटमधून एसके नुरुल इस्लाम, जंगीपूरमधून खलीलूर रहमान, मुर्शिदाबादमधून अबू ताहेर खान, उलुबेरियामधून सजदा अहमद निवडून आले आहेत. काँग्रेसचे अबू ताहेर खान मुर्शिदाबादमधून, सजदा अहमद हे उलुबेरियातून निवडून आले आहेत. याशिवाय ईशा खान चौधरी या काँग्रेसच्या तिकीटावर मालदा दक्षिणमधून निवडून आल्या आहेत. खालील चित्रांमध्ये हे पाहू शकता.

navbharat-times-110819834.

त्यानंतर आसामच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. यावेळी असं आढळून आलं, की आसाममधील एकूण १४ जागांपैकी काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार रकीबुल हसन हे फक्त धुबरी येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

navbharat-times-110819918.

दुसरीकडे तामिळनाडूमधील एकूण ३९ जागांपैकी रामनाथपुरममधून इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या तिकिटावर फक्त एक खासदार नावास्कानी खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचा पराभव केला.

navbharat-times-110819948.

याशिवाय न्यूजचेकरने केरळच्या दाव्याचीही पडताळणी केली. केरळमधील लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी केवळ ३ लोकसभा जागांवर मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. यापैकी मुस्लिम लीगच्या तिकिटावर ईटी मोहम्मद बशीर हे मलप्पुरम मतदारसंघातून आणि डॉ. अब्दुससमद समदानी हे पन्नानी मतदारसंघातून निवडून आले आहेत. याशिवाय आणखी एक खासदार शाफी परमबिल हे काँग्रेसच्या तिकिटावर वडाकरा येथून निवडून आले आहेत.

navbharat-times-110819980.

तर पाँडिचेरी लोकसभा मतदारसंघातून एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नाही, तर काँग्रेसचे व्हीई वैथिलिंगम निवडून आले आहेत.

navbharat-times-110820051.

तपासादरम्यान मिळालेल्या काही न्यूज रिपोर्ट्सनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ७८ मुस्लिम उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी केवळ २४ उमेदवार विजयी झाले होते, तर गेल्या वेळी २६ मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले होते.

navbharat-times-110820111.

आतापर्यंतच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं आहे, की व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत केवळ २४ मुस्लिम उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. व्हायरल मेसेजमध्ये असलेल्या नावांची तपासणी केली. मेसेजमध्ये असलेली लांबलचक नावं ही २०२१ मध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडू या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या मुस्लिम आमदारांच्या नावांची यादी आहे.

पश्चिम बंगालची यादी तपासली तेव्हा असं समोर आलं, की त्यात उपस्थित असलेली सर्व ३७ नावं २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांची आहेत. (फोटोमध्ये असलेली आकडेवारी पश्चिम बंगाल विधानसभेच्या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.)

navbharat-times-110820175.

आसामची यादी तपासली ती नावं देखील २०२१ च्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेल्या मुस्लिम उमेदवारांची आहेत. (फोटोतील माहिती आसाम विधानसभेच्या संकेतस्थळावरूनही घेण्यात आली आहे.)

navbharat-times-110820335.

तमिळनाडू यादीचं सत्य … (डेटा स्रोत: तामिळनाडू निवडणूक आयोग वेबसाइट)

navbharat-times-110820381.

केरळची यादी तपासल्यानंतर त्यात २०२१ मध्ये विविध पक्षांतून निवडून आलेल्या मुस्लिम आमदारांची नावं असल्याचं स्पष्ट होते. (ही आकडेवारी केरळ विधानसभेच्या संकेतस्थळावरूनच घेण्यात आली आहे.)

navbharat-times-110820414.

पाँडिचेरी यादीतील माहिती…

navbharat-times-110820451.

निष्कर्ष

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत ९८ मुस्लिम उमेदवार खासदार म्हणून निवडून आल्याचा सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमधील दावा खोटा असल्याचं न्यूजचेकरच्या तपासात पुराव्यांसह स्पष्ट झालं आहे.

navbharat-times-110820527.

(This story was originally published by NewsChecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.