Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोटोरोला इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा स्मार्टफोन 18 जूनला देशात लाँच केला जाईल, अशी माहिती दिली आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर या स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. Edge 50 Ultra मध्ये 6.7 इंच pOLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8s Gen 3 दिला जाईल.
अलीकडेच मोटोरोलानं हा स्मार्टफोन टीज केला होता. या इमेजमध्ये स्मार्टफोनचा बॅक पॅनल दिसत होता. यात वुडन टेक्सचर्ड रियर पॅनल आहे. हा स्मार्टफोनच्या जागतिक बाजारातील Edge 50 Ultra प्रमाणे असू शकतो. यात 16 GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 1 TB पर्यंतची UFS 4.0 स्टोरेज आहे. हा अँड्रॉइड 14 वर आधारित Hello UI वर चालतो.
या स्मार्टफोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा युनिटमध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 3x ऑप्टिकल झूमसह 64 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनची 4,500mAh ची बॅटरी 125 W वायर्ड आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G, 5G, Wi-Fi, GPS, Bluetooth आणि NFC चा समावेश आहे. यात सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Motorola नं पुढील काही वर्षांमध्ये सेल वाढवण्याची योजना बनवली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये टॉप 3 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सहभागी होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Razr सीरीजच्या स्मार्टफोन्सना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपनीनं फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या Razr आणि Edge सीरीजसह प्रीमियम स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये आपला दबदबा वाढवण्याची तयारी केली आहे.