Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बिझनेस अनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या ट्वीटनुसार, चौथ्या दिवशी (१० जून २०२४) ‘मुंज्या’ने ४.११ कोटींची कमाई केली. यानंतर या सिनेमाने २४.१५ कोटी कमाईचा टप्पा गाठला आहे.
‘मुंज्या’ची प्रत्येक दिवसाची कमाई
पहिला दिवस (७ जून २०२४)- ४.२१ कोटी
दुसरा दिवस (८ जून २०२४)- ७.४० कोटी
तिसरा दिवस (९ जून २०२४)- ८.४३ कोटी
चौथा दिवस (१० जून २०२४)- ४.११ कोटी
एकूण कमाई- २४.१५ कोटी
पहिल्याच आठवड्यात गाठणार ३५ कोटींचा टप्पा
मीडिया रिपोर्टनुसा, याच वेगाने ‘मुंज्या’ची कमाई सुरू राहिल्यास पहिल्याच आठवड्यात ३५ कोटींचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या एकूण कमाईला मागे टाकेल.
‘मिस्टर अँड मिसेस माही’चे मोठे नुकसान
‘मिस्टर अँड मिसेस माही’ने ११व्या दिवशी नुकसानाचा सामना केला. या स्पोर्ट्स ड्रामाने सोमवारी अवघ्या ९० लाखांची कमाई केली. शरण शर्मा दिग्दर्शित या सिनेमाची आतापर्यंतची एकूण कमाई ३०.८० कोटी आहे. या सिनेमाचे बजेट ४० कोटींचे आहे, त्यामुळे सिनेमा हिट ठरण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. ‘मुंज्या’कडे प्रेक्षकांचा वाढता कल पाहता हे काहीसे कठीण वाटते आहे.