Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
WhatsApp Call Record: व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करायचे आहेत? कुठल्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय असे करा रेकॉर्ड
Whatsapp कॉल रेकॉर्ड कसे करायचे?
- कोणाचाही Whatsapp कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो, मग तो इनकमिंग कॉल असो किंवा आउटगोइंग कॉल, दोन्ही व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात.
- जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल येतो किंवा एखाद्याला कॉल करता तेव्हा कॉल दरम्यान किंवा कॉल करण्यापूर्वी या गोष्टी करा.
- तुमच्या फोनवर स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करा. परंतु सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे रेकॉर्डिंगसाठी ऑडियो ऑप्शन दाखवेल. यामध्ये तुम्ही मीडिया आणि माइकचा पर्यायची निवड करा.
- यानंतर तुम्हाला स्टार्ट रेकॉर्डिंगच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा कॉल रेकॉर्ड होईल, इतकेच नाही तर तुम्हाला व्हिडिओ देखील रेकॉर्ड करता येईल
WhatsApp कॉल रेकॉर्डिंगमध्ये आवाजाशी करावी लागेल तडजोड
असे करतांना तुमचा आवाज थोडा कमी क्लिअर असण्याची शक्यता असली तरी हे रेकॉर्डिंग तुमच्या बेसिक गरजांसाठी हे उत्तम ठरेल. यामध्ये तुम्हाला मात्र कमी आवाजात कॉल ऐकू येईल.
तुम्ही व्हिडिओ कॉल देखील रेकॉर्ड करू शकता
वर देण्यात आलेल्या प्रोसेसच्या मदतीने तुम्ही केवळ व्हॉइस कॉलच नाही तर कोणाचेही व्हिडिओ कॉलही रेकॉर्ड करू शकता. व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी हीच प्रोसेस फॉलो करावी लागेल. परंतु या प्रोसेसचा गैरवापर टाळण्याचे लक्षात ठेवा. आवश्यक नसल्यास कोणाचाही आवाज किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणे टाळा.