Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझी द्विधा मनस्थिती, रायबरेली की वायनाड? कुणाची निवड करू? राहुल गांधींच्या सभेत काय घडलं?

11

नवी दिल्ली : काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील पारंपारिक काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमधून तसेच केरळमधल्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. दोन्ही जागांवरून निवडून आल्यानंतर कोणत्या तरी एका जागेचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, “मी संकटात सापडलोय, कुणाची निवड करू रायबरेली की वायनाड?” असा प्रश्न त्यांनी जनतेलाच विचारला. जनतेनेही उस्फूर्तपणे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावर तुम्हाला नाराज करणार नाही, आनंद होईल असाच मी निर्णय घेईन, असे राहुल म्हणाले.राहुल गांधी यांनी बुधवारी (१२ जून) वायनाडला भेट दिली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड मतदारसंघात मोठा विजय मिळवल्यानंतरचा हा त्यांचा पहिला दौरा होता. त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि सीपीआय उमेदवार ॲनी राजा यांचा ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी पराभव केला. राहुल गांधी वायनाडच्या जागेचा राजीनामा देतील आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीचे संसदेत प्रतिनिधित्व करतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच, त्यांनी वायनाडला भेट दिली.
Rahul Gandhi : काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचा ‘जय-जयकार’, लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनण्याचा घ्यावा ‘पुढाकार’

माझ्यासमोर धर्मसंकट, कुणाची निवड करू?

वायनाडच्या जनेतने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. सलग दुसऱ्यांदा मला येथील जनतेने निवडून दिले. त्यांचे मी आभार मानतो. पण आता माझ्यासमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे. मी कुणाची निवड करू? रायबरेली की वायनाड? असा प्रश्न राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला विचारला. त्यावर स्टेजसमोरील जनतेने उस्फूर्तपणे ‘वायनाडची निवड करा’, असे सांगितले. लोकांचा कौल ऐकून राहुल यांनी स्मितहास्य करून त्यांच्या भावनांचा आदर केला. मी तुम्हाला नाराज करणार नाही, तुम्हाला आनंद होईल असाच निर्णय मी घेईन, असे ते म्हणाले.
आजचा अग्रलेख: मतदारांचा विवेक जागा

आम्ही द्वेषाला प्रेमाने हरविले, विनम्रतेने अहंकाराला पराजयाची धूळ चारली

राहुल गांधी भाषणात म्हणाले, या निवडणुकीत द्वेषाला आम्ही प्रेमाने हरविले आहे. विनम्रतेने अहंकाराला पराजयाची धूळ चारली. पंतप्रधान वाराणसीतूनही हरले असते, पण ते थोडक्यात बचावले. अयोध्येमध्येही भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले कारण तेथील जनतेनेही हिंसा आणि द्वेषाला साफ नाकारले. दिल्लीत बनलेले सरकार अपंग आहे. विरोधी पक्षांनी भाजपला मोठा झटका दिलाय. तुम्ही बघा नरेंद्र मोदींची सगळी कार्यशैली बदलून जाईल. कारण भारताच्या जनतेने आम्हाला गृहित धरू नका, असा संदेश दिला आहे.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा आग्रह काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांसह कार्यकारिणीच्या सदस्यांनी रविवारी धरला. यावर मी लवकरच निर्णय घेईन, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.