Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवीन अँटी-थेफ्ट फीचरचं काम फोनमध्ये स्टोर युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे आहे. गुगलनुसार, फीचर्सचा नवीन सेट चोरी होण्यापूर्वी, होताना किंवा झाल्यानंतर युजर्सची सुरक्षा करेल. अश्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हे फीचर्स संशयास्पद अॅक्टिव्हिटी घडल्यास युजर्सचा डेटा त्वरित सुरक्षित करण्यासाठी डिजाइन करण्यात आले आहेत.
थेफ्ट डिटेक्शन फीचर कसे होईल अॅक्टिव्हेट
रिपोर्टनुसार, या फीचरच्या टेस्ट फेज मध्ये तीन प्रकारचे लॉक असतील. यातील एका लॉक मध्ये, Google AI चा वापर करेल जो चोरी संबंधित अॅक्टिव्हिटी ओळखण्यासाठी बनवण्यात आला आहे. हे फीचर अश्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या अॅक्टिव्हिटी ओळखते आणि स्क्रीन ब्लॉक करेल.
दुसरे फीचर, युजर फोन नंबर रजिस्टर करून आणि एखाद्या दुसऱ्या डिवाइसवरून सिक्योरिटी चॅलेंज पूर्ण करून डिवाइस स्क्रीन दुरूनच लॉक करण्याची सुविधा देतं. शेवटचं फिचर डिवाइस बराच वेळ इंटरनेट अॅक्सेसविना ठेवल्यास स्क्रीन ऑटोमॅटिकली लॉक करेल.
हे फीचर्स जुलैपासून ब्राजीलच्या अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील व्हर्जन असलेल्या फोनसाठी उपलब्ध होतील. गुगलने म्हटलं आहे की यावर्षी हळूहळू दुसऱ्या देशांच्या युजर्ससाठी देखील हे रिलीज केले जातील.
गुगल थेफ्ट डिटेक्शन फीचरची वैशिष्ट्ये
नवीन थेफ्ट डिटेक्शन लॉक सुधारित फॅक्टरी रीसेट प्रोटेक्शन स्किलसह बनवण्यात आला आहे, ज्यामुळे चोरांना चोरी केलेला डिवाइस सहज रीसेट करून पुन्हा विकत येत नाही. तसेच एखादा डिवाइस चोरी झाल्यास मालकाच्या क्रेडेंशियलविना हा विकत येणार नाही, त्यामुळे चोरीच्या घटना कमी होऊ शकतात.
यातील प्रायव्हेट स्पेस फीचरमध्ये संवेदनशील अॅप्स आणि डेटा अनअथॉराइज्ड अॅक्सेसपासून सुरक्षित ठेवता येईल. फोनमध्ये एक वेगळा, सुरक्षित भाग बनवून युजर हेल्थ किंवा फायनॅन्शियल डेटा सारखी खाजगी माहिती असलेले अॅप्स लपवून लॉक केले जातील.
तसेच गुगल संवेदनशील डिवाइस सेटिंग बदलण्यासाठी कडक ऑथेंटिकेशन रिक्वायरमेंट्स देखील लागू करत आहे, जसे की फाइंड माय डिवाइस डिसेबल करणे किंवा स्क्रीन टाइमआउट वाढवणे. या अपडेटमुळे जरी एखाद्या चोराने डिवाइस अॅक्सेस मिळवला तरी महत्वपूर्ण बदल करण्यासाठी फोनच्या खऱ्या मालकाच्या पिन, पासवर्ड किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल, त्यामुळे युजरच्या डेटा आणि प्रायव्हसीची रक्षा होईल.