Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’
- महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष रस्त्यावर
- भाजपचा बंदवर कडाडून हल्लाबोल
वाचा: Live मुंबईत ९ बेस्ट बसवर दगडफेक; पोलीस संरक्षण देण्याची मागणी
भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करून महाआघाडीच्या बंदच्या भूमिकेवर आसूड ओढले आहेत. ‘ज्यांनी मुंबईला बंद करून आपलं दुकान चालवलं त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ इतिहास आज पुन्हा आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठिंबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करून कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढंच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचं काम बंद करून मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध… नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक आहेत,’ अशी टीका शेलार यांनी तिन्ही पक्षांवर केली आहे.
वाचा: राजकीय किंमत चुकवावी लागली तरी…; वरुण गांधींचं अभिनंदन करत शिवसेनेची भाजपवर टीका
‘बंद आणि विरोध हाच यांचा ‘धंदा’ आहे. त्यावरच यांचा ‘चंदा’ गोळा होतो. हे ‘बंद’ आता बंदच केले पाहिजेत. आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणं ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल आहे,’ असा आरोप करतानाच, ‘आई दुर्गामाते, या महिषासुरांचा बंदचा हा खेळ उधळून टाकण्यासाठी जनतेला बळ दे,’ असं साकडं शेलार यांनी घातलं आहे.