Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास Google Pay आणि PhonePe कसे ब्लॉक करावे? जाणून घ्या

8

तुम्ही पेमेंट करण्यासाठी रोख रकमेऐवजी UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पर्सनल माहितीसह पेमेंट डिटेल्स आपण आपल्या फोनमध्ये सेव्ह करतो. अशावेळी चुकून फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी खूप मोठे नुकसान होऊ शकते. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या मदतीने युजर्स या ॲप्सचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून थेट डिजिटल पेमेंट करू शकतात.

भारतात डिजिटल पेमेंटच्या बाबतीत सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. UPI पेमेंटसाठी, फोनमध्ये फक्त एक ॲप डाउनलोड करावे लागते. मात्र, तुमचा स्मार्टफोन हरवला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. भारतातील दोन सर्वात लोकप्रिय पेमेंट ॲप्स म्हणजे Google Pay आणि PhonePe, ज्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. पण जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ते ॲप्स ब्लॉक करावे लागतील. कसे ते जाणून घेऊया..

PhonePe अकाऊंट कसे ब्लॉक करावे

स्टेप 1: PhonePe अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी, यूजर्सना प्रथम हेल्पलाइन नंबर 08068727374 वर कॉल करणे आवश्यक आहे.
स्टेप 2: यानंतर अकाउंट डिटेल्स कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हला द्यावे लागतील. यानंतर तुमचे अकाऊंट बंद होईल.

  • यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • नंतर तुम्हाला PhonePe शी लिंक केलेला ई-मेल आयडी टाकावा लागेल.
  • यासह शेवटच्या पेमेंट डिटेल्स एंटर कराव्या लागतील.
  • त्यानंतर बँक अकाउंटशी लिंक केलेले नाव टाकावे लागेल.
  • अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असल्यास तो देखील टाकावा लागेल.

स्टेप 3: यानंतर तुमचे अकाऊंट तात्पुरते ब्लॉक केले जाईल.

Google Pay अकाऊंट कसे ब्लॉक करावे

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला Google Pay किंवा GPay टोल-फ्री हेल्पलाइन नंबर 1800-419-0157 वर कॉल करावा लागेल.
स्टेप 2: यानंतर तुम्हाला स्पेशलिस्टशी बोलण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या Google Pay अकाऊंटच्या सर्व डिटेल्स द्याव्या लागतील. अशा प्रकारे तुमचे Google Pay अकाऊंट ब्लॉक केले जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.