Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनोहर जोशींच्या नातीच्या सिनेमा तुफान गाजतोय! ‘मुंज्या’ने गाठला कमाईचा मोठा टप्पा

11

मुंबई: कंटेट चांगला आणि आकर्षित करणारा असल्याने प्रेक्षकांचे पावले आपोआप सिनेमागृहाकडे वळतात, मग मोठा स्टार किंवा बिग बजेटची गरज नसते. हे ‘मुंज्या’ या सिनेमाने सिद्ध केले आहे. ७ जून रोजी हे कोकणातील भूत ‘मुंज्या’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि तेव्हापासून बॉक्स ऑफिस अक्षरश: झपाटून टाकलं आहे. ‘मुंज्या’ने १२ दिवसात जवळपास ६५ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर असेच कलेक्शन सुरू राहिल्यास या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठल्यास आश्चर्य वाटायला नको.

तगड्या स्टारकास्टच्या जोरावर केली कमाई

‘स्त्री’, ‘भेडिया’सारखे चित्रपट देणाऱ्या दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी ‘मुंज्या’ची निर्मिती केली असून दिग्दर्शन आदित्य सरपोतदारचे आहे. आहे. ‘मुंज्या’मध्ये कोणताही मोठा स्टार नसला तरी तगडे कलाकार आणि चांगला कंटेट आहे. अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, मोना सिंह, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, तरन सिंग, सत्यराज, खुशी हजारे, आयुष उलगड्डे, श्रुती मराठे अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या वर्षात ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘शैतान’नंतर ‘मुंज्या’ हा तिसरा हिट सिनेमा ठरला.

किती झाली १२ दिवसांची कमाई

७ जून रोजी ‘मुंज्या’ प्रदर्शित झाला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात या सिनेमाने ३६.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर ८व्या दिवशा ३.७५ कोटी, नवव्या दिवशी ६.७६ कोटींची कमाई केली. दहाव्या दिवशी या सिनेमाची सर्वाधिक म्हणजेच ८.७५ कोटी झाली होती, तर ११व्या दिवशी सिनेमाने ५.५० कोटी कमावले. बाराव्या दिवशी अर्थात १८ जून मंगळवारी ‘मुंज्या’ने ३.५० कोटींचा गल्ला जमवला. एकूण १२ दिवसांच्या कमाईनंतर ‘मुंज्या’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन ६४.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘चंदू चॅम्पियन’वर भारी पडतोय ‘मुंज्या’

कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘चंदू चॅम्पियन’ने पहिल्या वीकेंडपर्यंत चांगली कमाई केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या सोमवार आणि मंगळवारी ‘चंदू चॅम्पियन’ने ‘मुंज्या’पेक्षा कमी कमाई केली. Sacnilk मधील रिपोर्टनुसार, सोमवारी चौथ्या दिवशी ‘चंदू चॅम्पियन’ने ५ कोटी कमावले तर पाचव्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. यानंतर आतापर्यंत या सिनेमाचे कलेक्शन २९.७५ कोटींवर पोहोचले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.