Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, 21 जून 2024 : ज्येष्ठ पौर्णिमा! वृषभसह २ राशींच्या नात्यात दूरावा! इच्छुकांचे लग्न जमेल, वाचा राशीभविष्य
आज 21 जून ज्येष्ठ शुक्ल पक्षातील चतुर्दशी आहे. शुभ योग तयार होत आहे. ज्येष्ठ पौर्णिमासोबत वटपौर्णिमा आणि वटसावित्रीचा योग देखील जुळून आला आहे. आज देवी लक्ष्मीची कृपा राहिल. कामाच्या अतिरेकीमुळे कुटुंबाकडून कोणतीही अपेक्षा करु नका. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आज चांगला दिवस आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. कौटुंबिक खर्चाकडेही लक्ष द्या, अन्यथा आर्थिक स्थिती डगमगेल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल? चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.
मेष – कोणाकडून अपेक्षा करु नका
आजचा दिवस तुम्ही कोणत्याही धार्मिक वादात अडकू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन व्यवसाय सुरु केल्यावर यश मिळेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या अतिरेकीमुळे कुटुंबाकडून कोणतीही अपेक्षा करु नका. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. भावाच्या सल्ल्याने प्रगती होईल. मुले भविष्याचा विचार करतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील.
वृषभ – नात्यात अंतर वाढेल
आज विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञान आणि अनुभवातून नवीन संधी मिळतील. शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. परीक्षेसाठी केलेल्या मेहनतेची फळ आज मिळेल. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आज चांगला दिवस आहे. सामाजिक आवडीनिवडी आज विकसित होतील. लव्ह लाईफसाठी वेळ अनुकूल नाही. व्यस्ततेमुळे नात्यात अंतर येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळा.
मिथुन – इच्छुकांचे लग्न जमेल
आज विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. ज्यामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. व्यवसायात सकारात्मक बदल केल्याने फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. रखडलेले काम पूर्ण होईल. जोडीदाराचा सल्ला कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. तुमच्या भावांला किंवा मित्राला मदत करण्याची संधी मिळेल.
कर्क – बाहेरचे खाणे टाळा.
व्यावसायिक लोकांच्या योजनांना आज चालना मिळेल. आर्थिक समस्यांना समोरे जावे लागू शकते. कौटुंबिक संबंध आज सुधारतील. कौटुंबिक खर्चाकडेही लक्ष द्या, अन्यथा आर्थिक स्थिती डगमगेल. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. आव्हानांचा यशस्वीपणे सामना करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ज्यात यश मिळेल. आरोग्याबाबत जागरुक राहा. बाहेरचे खाणे टाळा.
सिंह – व्यवहार करणे टाळा
वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद आज संपतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल. नातेवाईकांमुळे तणाव वाढेल. कोणाशीही व्यवहार करणे टाळा. सासरच्या लोकांकडून लाभ होताना दिसेल. घरगुती वस्तूंमध्ये वाढ होईल. मुलांच्या भविष्याबाबत चांगली बातमी मिळेल.
कन्या – नवीन नोकरी मिळेल.
विद्यार्थी भविष्याचा विचार करतील. आर्थिक स्थितीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बोलण्यात सौम्यता आणा ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मित्रांची संख्याही वाढेल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहिल. ज्यामध्ये वडिलांकडून मार्गदर्शन मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. प्रेम जीवनात आज भेटवस्तू मिळतील. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरच्या खाण्यावर संयम ठेवा. जीवनसाठी तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना चांगले फळ मिळेल.
तुळ – वैवाहिक जीवनात आनंद येईल
आज धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. सामाजिक कार्यात नावलौकिकता वाढेल. व्यवसायात मोठ्या व्यक्तीची मदत घेतल्याने अडचणी दूर होतील. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी आज वेळ चांगला आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार आज नवीन ऊर्जा देईल. ज्यामध्ये अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल
वृश्चिक – प्रगतीची संधी मिळेल.
आज नोकरीच्या क्षेत्रात बदल करण्यासाठी योग्य वेळ नाही. नशीब तुम्हाला साथ देणार नाही. लव्ह लाईफमध्ये नवीन अनुभव मिळतील. आज नोकरीच्या ठिकाणी मित्रामुळे प्रगतीची संधी मिळेल. नातेवाईकांमुळे अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागेल.ज्यामुळे आर्थिक स्थितीवर भार पडले. जुन्या कर्जातून आराम मिळेल. महत्त्वाचे व्यवहार टाळा. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. समस्या सोडवण्यात मदत कराल.
धनु – आर्थिक स्थिती मजबूत होईल
आज कामाच्या ठिकाणी मत्सर करणाऱ्या शत्रूपांसून सावध राहा. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भविष्यातील पाया मजबूत करण्यासाठी कुटुंबाशी चर्चा केली जाईल. मनावरील ओझे हलके होईल. व्यावसायिक बाबींचा अनुभव व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल. जोडीदाराच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या
मकर – कौटुंबिक समस्या दूर होतील
आज प्रेम जीवनात भेटवस्तू मिळेल. इतरांची मदत घेतल्याने तुम्हाला यश मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास आनंददायी आणि लाभदायक असेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा कराल. मनावरील ओझे कमी होईल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. परीक्षेत यश मिळेल.
कुंभ – जोडीदारासोबत भांडण होईल.
राजकारणाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सत्ताधारी पक्षाची साथ मिळेल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. प्रेम जीवनात नवीन ताजेपणा येईल. कौटुंबिक जीवनात गोंधळ निर्माण होईल. संवाद साधल्याने मतभेद दूर होतील. मित्रांना भेटाल आणि दूरचा प्रवास कराल. जोडीदारासोबत भांडण होईल.
मीन – रखडलेले काम आज पूर्ण होईल
दीर्घकाळापासून रखडलेले काम आज पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची दाट शक्यचा आहे. कोर्टात एखाद्या प्रकरणात यश मिळेल. सासरच्या बाजूने तणाव सहन करावा लागेल. प्रेम जीवनात गोडवा राहिल. जुन्या भांडणांच्या त्रासातून आराम मिळेल. सुटकेचा निश्वास सोडाल