Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

FOOD Price Rise:मांसाहाऱ्यांच्या जीभेला पाणी..शाकाहाऱ्यांच्या खिशात टणठणात, शाकाहारी थाळी महाग करणारे हे आहेत घटक

9

नवी दिल्ली : देशातील बदलते हवामान, मान्सुनमधील अनियमितता यांचा परिणाम अन्नधाण्याच्या उत्पादनावर होत आहे. परिणामी खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. नोव्हेंबर २०२३ नंतर खाण्याच्या वस्तुंवरील महागाई ही ८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. खाण्याच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ किंवा कमी होण्याला CFPI अर्थात ग्राहक खाद्य पदार्थ किंमत निर्देशांक द्वारे गणले जाते. मे महिन्यामध्ये जाहीर झालेल्या या आकड्यांनुसार २०२४ मध्ये हा CFPI निर्देशांक ८.६९ टक्के होता. याचाच अर्थ असा की एक वर्षांआधी वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या जितके पैसे खर्च करावे लागत होते तीच गोष्ट आज खरेदी करण्यासाठी ८.६९ टक्के अधिक खर्च आपल्याला करावा लागतो.

याला सोप्या शब्दात सांगायचे झालेच तर एक वर्षांआधी जर आपण एखादी वस्तू १७२.२ रुपयांना खरेदी केली होती तीच वस्तू आता खरेदी करण्यासाठी आपल्याला १९२.६ रुपये खर्च करावे लागत आहेत. याची अनेक कारणे सांगितली जातात. जसे की मागील वर्षी झालेला कमी पाऊस, काही भागात पडलेला दुष्काळ याला कारणीभूत आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम देशातील अनेक भागात वाढत्या उष्णतेवर झाला आहे. देशभर आणि विशेषत: उत्तरेच्या भागामध्ये या वर्षी पहायला मिळालेला जिवघेणा उष्माघात याची साक्ष आहे. ज्यामूळे डाळी,अन्नधाण्य आणि पालेभाज्यांच्या उत्पादन आणि वितरण व्यवस्थेला याचा फटका बसला आहे.
देशात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या खासदाराची शपथही तितकीच खास; संविधानाची प्रत हातात आणि ‘या’ भाषेत घेतली शपथ

हवामानाच्या भरवशावर पालेभाज्यांच्या किंमती

वाढलेल्या उष्णतेने अनेक भागात पिकांचे विशेषत: पालेभाज्या व फळभाज्यांचे नुकसान झाले. यामध्ये टॉमॅटो,कांदा,वांगी आणि पालक सारख्या पिकांच्या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. सामान्यपणे मान्सूनची चाहूल लागण्याआधी शेतकरी पालेभाज्या व फळभाज्यांची पेरणी करतात परंतू या वेळच्या उष्णतेने यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अध्याप मान्सून अनेक भागात दाखल झाला नसल्याने तिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. हवामान विभागाने यावर्षी इतर वेळच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पण यामध्ये जर अतिवृष्टीचा फटका बसला तर पुन्हा फळभाज्यांच्या किंमती वाढू शकतात.

यासर्वाचा खाद्यपदार्थांच्या किंमतींवर काय परिणाम

भारतातील शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किंमतींवर क्रिसिल नामक संस्था प्रत्येक महिन्यात एक अहवाल प्रदर्शित करते. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शाकाहारी थाळ्यांच्या तुलनेत मांसाहारी थाळी ही स्वस्थ होत आहे. शाकाहारी थाळी एका वर्षात ९ टक्क्यांनी महाग झाली आहे. मे महिन्यात त्याच्या किंमतीत वाढ होवून २७.८ इतकी झाली आहे. त्याच थाळीची किंमत एप्रिल महिन्यात २७.४ रुपये होती. शाकाहारी थाळी महाग होण्याचे कारण हे पालेभाज्या व फळभाज्यांच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आहे. यामध्ये टॉमॅटो,बटाटा व कांदा यांच्या किंमतींमध्ये अनुक्रमे ३९,४१,४३ टक्के वाढ झाली आहे.

मांसाहारी थाळी स्वस्त

यातुलनेत मांसाहारी थाळीच्या किंमतीत ७ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३ मध्ये मांसाहारी थाळीची किंमत ५९.९ रुपये इतकी होती ती आता कमी होवून ५५.९ रुपये झाली आहे. यातुलनेत मांसाहारी थाळीमध्ये चिकनचा समावेश असून ब्रॉयलर च्या किंमतीत झालेली घट ही मांसाहारी थाळींच्या किंमती कमी होण्यास कारणीभूत आहे. ब्रॉयलरच्या किंमतींमध्ये एका वर्षात १६ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे हवामान बदलांमध्ये काहीही उलथापालथ झाली तरी मांसाहारी व्यक्तींसाठी मात्र अच्छे दिन कायम आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.