Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BSNL चा 249 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 45 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन रोज 2 जीबी डेटासह येतो. अशाप्रकारे या प्लॅनमध्ये एकूण 90 जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर डेली 100 SMS ची सुविधा मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते.
Airtel 249 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या तुलनेत, एअरटेलच्या 209 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 249 रुपये झाली आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे, जो बीएसएनएलच्या प्लॅन पेक्षा 17 दिवसांची वैधता जास्त देतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये रोज 1 जीबी डेटा मिळतो, जो बीएसएनएलच्या तुलनेत अर्धा आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे.
जिओ 249 रुपयांचा प्लॅन
एअरटेल प्रमाणे जिओनं देखील आपल्या 209 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवून 249 रुपये केली आहे. हा प्लॅन पण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये देखील रोज 1 जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळते. तसेच रोज 100 फ्री SMS ची सुविधा मिळते.
Vi 269 रुपयांचा प्लॅन
वोडाफोन-आयडियानं 269 रुपयांचा प्लॅनची किंमत बढ़ाकर 299 रुपये केली आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर रोज 1 जीबी डेटा दिला जाईल.
कोणता प्लॅन आहे बेस्ट
Airtel, Jio आणि Vi च्या तुलनेत, BSNL च्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या ऐवजी 45 दिवसांची वैधता दिली जाते. त्याचबरोबर डेली 1 जीबी डेटा ऐवजी 2 जीबी डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजे BSNLच्या प्लॅनची किंमत सारखी आहे, तर डेटा आणि वैधतेबाबत डबल आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे BSNL मध्ये इंटरनेट डेटा स्पीड स्लो असतो तर Airtel, Jio आणि Vi मध्ये फास्ट इंटरनेट स्पीड मिळतो. कारण BSNL अजूनही अनेक ठिकाणी 3G नेटवर्क देत आहे.