Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 4 जुलै 2024 : मूलांक 7 जोडीदासासोबत वाद ! मूलांक 9 कुटुंबात आनंदाचे वातावरण ! तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – सहकाऱ्यांसोबत भांडण होण्याची शक्यता
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक ठिक असेल. आज परिस्थिती तुम्हाला फारशी अनुकूल नाही आणि या काळात सहकाऱ्यांसोबत भांडण होईल, त्यामुळे शांत राहा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
मूलांक 2 – कामात मन लागणार नाही
मूलांक 2 असलेल्यांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. ऑफिसमध्ये तुमचे कर्तृत्व सिद्ध करावे लागे. कार्यक्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागेल, त्यामुळे कामात फारसे मन लागणार नाही. विद्यार्थ्यांसाठी वेळ थोडी कमकुवत दिसत आहे.
मूलांक 3 – जोडीदारासोबत वाद होतील
मूलांक 3 असलेल्यांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला संमिश्र फळ मिळेल. आईवडील आणि जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले होतील. पण जोडीदारासोबत काही वाद होण्याचीही शक्यता दिसते.
मूलांक 4 – सहकाऱ्याकडून मदत मिळेल
मूलांक 4 असणाऱ्यांना आज मदतीची गरज असेल. तुम्हाला एखाद्या मित्राकडून काही मदत मिळू शकते. काही मोठे यश प्राप्त होऊ शकते. जोडीदार कुठेतरी काम करत असेल तर त्यांच्यासाठी प्रवासाचा योग आहे.
मूलांक 5 – स्वतःकडे लक्ष द्या
मूलांक 5 असणाऱ्यांसाठी दिवस ठिक आहे. मूड चांगला ठेवण्यासाठी जोडीदारासोबत फिरायला किंवा सिनेमा पाहायला जा. काही कारणांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईळ, त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्याचीही गरज आहे.
मूलांक 6 – मुलांच्या स्वभावात बदल
मूलांक 6 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. कौटुंबिक स्थितीमुळे आज परिस्थिती फारशी अनुकूल नाही. त्यामुळे चांगले परिणाम मिळणे कठीण दिसते. मुलांच्या स्वभावात बदल होईल.
मूलांक 7 – जोडीदारासोबत वाद
मूलांक 7 असणाऱ्यांनी आज आपल्या वागण्याकडे विशेष लक्ष द्यावे कारण भांडण होण्याची शक्यता दिसते आहे. आज जोडीदारासोबत लहान गोष्टींवरून शब्दाला शब्द वाढत जाईल आणि जोडीदाराची चिडचिड होऊ शकते. तुम्हाला जोडीदारासोबत मित्रासारखे राहिले पाहिजे, तरच परिस्थिती सुधारेल.
मूलांक 8 – कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करा
मूलांक 8 साठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला हे शक्य नसेल तर त्यांना तुमची परिस्थिती समजवून सांगा, म्हणजे तुमच्यावर जास्त दबाव येणार नाही.
मूलांक 9 – आनंदी वातावरण राहील
मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच कुटुंबात मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि लोकांच्या भावनांचा सन्मान करा. कुटुंबातील लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील.