Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपुर-अमरावती महामार्गावर दरोडा व जबरी चोरी करणारे टोळीतील सदस्यास अमरावती शहर पोलिसांनी प्रतापगड येथुन घेतले ताब्यात…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अमरावती नागपुर महामार्गावर दरोडा व जबरी चोरीचे उद्देशाने ट्रॅव्हलर व्हॅनवर गोळीबार करून दरोडा टाकुन १० चाकी टिप्पर जबरी चोरी करण्या-या आंतराज्यीय टोळीतील २ सराईत आरोपींना प्रतापगढ उत्तरप्रदेश येथुन केले जेरंबद,नांदगावपेठ पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट क्र १ ची अमरावती शहर यांची कामगीरी….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(१०)मार्च २०२४ रोजी रात्री ०९.३० वा चे दरम्यान यातील फिर्यादी(नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) हे त्यांचे ताब्यातील टेम्पो ट्र्रॅव्हलर वाहन एमएच १४ जीडी ६९५५ हीने त्यातील प्रवाशांसह नागपुर येथे जात असतांना पिंपळविहीर गावाचे टर्निगजवळ, अमरावती नागपुर हायवे अमरावती वरून जात असतांना एका पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहनातून आरोपींनी येउन यातील फिर्यादीवर वर जिवे ठार मारण्याचे उददेशाने बंदुकीतुन ४ गोळी फायर केल्याने फिर्यादिचे चे उजवे बाजुची काच फुटुन त्यांचे हाताला गोळी लागली तरी त्यांनी लागलीच  वाहनातील सर्वांना सावध करून सहका-यास १०० नंबर वर फोन लावण्यास सांगुन गाडी वेगाने घेऊन तिवसा पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले त्यावरून नांदगावपेठ पोलिस स्टेशन कडील अप.क्र ८३/२०२४ भा.दं.वि कलम ३०७, ३४ सहकलम ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच दि. १०/०३/२०२४ रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे अशोक लॅलॅड टिप्परने एमआयडीसी नांदगावपेठ येथे जात असतांना आरोपीनी त्याचे वाहनास आरोपीचे बोलेरो वाहन आडवे लावुन फिर्यादिचे व त्यांचे साथीदारास आरोपीचे बोलेरो वाहनात घेऊन जाऊन त्यांना शेतात नेले व  त्यांना मारहाण करून हवेत २ अग्नीशस्त्राने गोळी झाडुन फिर्यादी कडुन त्यांचे कडील पैसे, मोबाईल व टिप्पर वाहन क्र डब्ल्यु बि ५३ सी २७२४ जबरीने चोरून घेउन गेले बाबत नांदगावपेठ पोलिस स्टेशन येथे अप.क्र ८४ / २०२४ भा.दं.वि कलम ३९५, ३९७ सहकलम ३/२५, २७ भारतीय हत्यार कायदा, मपोका कलम १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभिर्य ओळखुन पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हयाचे तपासात विवीध टिम तयार करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून आरोपींचा शोध घेणेबाबत प्राप्त
माहीतीवरून विविध राज्यात पथके पाठविली होती त्यानुसार सपोनि वाकडे व पथक नेमणुक गुन्हेशाखा व पोउपनि हीवरे व पथक नेमणुक राजापेठ पोलिस स्टेशन यांनी मध्यप्रदेश राज्यातील विवीध टोल नाक्यावर शोध तपास करून तेथील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करून गुन्हयात चोरी गेलेल्या टिप्परचा
मागोवा काढुन मध्यप्रदेश येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मैयर जवळ आरोपींनी पोलिसांची नाकाबंदी पाहुन गुन्हयातील चोरी गेलेले वाहन सोडुन पळुन गेल्याने पोउपनि हिवरे व पथक यांनी सदरचा चोरी गेलेला टिप्पर क्र डब्ल्यु बि ५३ सी २७२४ हा ताब्यात घेउन नांदगावपेठ पोलिस स्टेशन येथे हजर केला होता.गुन्हयाचे तपासात विवीध तांत्रीक पदधतीचा वापर करून, अमरावती,नागपुर, वर्धा, मध्यप्रदेश येथील छिंदवाडा, जबलपुर, मैयर, सतना जिल्ह्यातील  टोलनाक्याचे सिसिटीव्ही फुटेजची तपासणी करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेउन गुन्हयातील आरोपी हे प्रतापगढ उत्तरप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न करण्यात आले. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परि १,सागर पाटील यांचे मार्गदर्शनात प्रतापगढ येथील वरीष्ठ पोलिस अधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क करून आरोपींबाबत एसटीएफ तसेच एसओजी टिम्सचे माध्यमातुन  माहीती प्राप्त करण्यात आली. त्यावरून सदरचे आरोपी हे अत्यंत सराईत व धोकादायक स्वरूपाचे असुन ते नियमीतपणे शस्त्रे बाळगण्याचे सवयीचे गुन्हेगार आहे त्यांचेवर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, अग्निशस्त्रे बाळगणे अश्या पदधतीचे गुन्हे दाखल असुन त्यांचेवर ५०,०००/- रु बक्षीस स्थानिक प्रशासनाने जाहीर केले होते.अशा प्रतापगढ पोलिसांचे माध्यमातुन प्राप्त माहीतीवरून आरोपी हे एका अन्य गुन्हयात अटक झाले असुन ते प्रतापगढ जेलमध्ये असल्याचे समजल्यावरून अमरावती न्यायालय, प्रतापगढ न्यायालय, उत्तरप्रदेश प्रतापगढ कारागृह यांचे मार्फतीने आंतरराज्यीय आरोपी हस्तांतरणाची जटील व गुंतागुतीची प्रकीया पुर्ण करून गुन्हयातील प्रमुख आरोपी १) श्रेयांश उर्फ हर्ष सूर्यनारायण उर्फ लालचंद त्रिपाठी, २२ वर्षे रा. रामगढ बभनमई, पो.स्टे राणीगंज, जनपद प्रतापगढ, उत्तरप्रदेश २) अनुजकुमार अजयकुमार पांडे २४ वर्षे, रा. पुरे दुरभन, पोस्टे दिलीपपुर, जनपद प्रतापगढ उत्त्प्रदेश यांना मध्यवर्ती कारागृह, प्रतापगढ, उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेउन नांदगावपेठ पोलिस स्टेशन कडील गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहे. आरोपींकडुन अन्य आरोपींची माहीती घेण्यात आली असुन
त्यांचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परि २,गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त मुख्यालय कल्पना बारवकर पोलिस उपायुक्त परि १,सागर पाटील,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे, सहा पोलिस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग,कैलाश पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली नांदगावपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हनमंत डोपेवाड व गुन्हेशाखा युनिट क्र १ चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहा पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, सहा. पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे, पोउपनि राजेश वाकडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा संजय खारोडे, निलेश गावनेर, पोहवा राजुअप्पा, पोहवा फिरोज, पोहवा सतिष देशमुख,नापोशि दिनेश नांदे, विकास गुडधे, पोशि वैभव सवईकर, निलेश सावीकर, गजानन तायडे, वैभव तिखीले,वैभव धुरंदर,सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती, अमोल मनोहरे,अमोल बहादुरपरे, अलीमोदिदन खतीब, किशोर खेंगरे, रोशन माहुरे यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.