Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio Hero 5G: जिओचा नवीन 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळेल इतक्या दिवसांची व्हॅलिडिटी

9

Jio Hero 5G: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्समध्ये दरवाढ केल्यानंतर युजर्स एका परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात आहेत. कारण महिनाभर व्हॅलिडिटी असणाऱ्या प्लॅन्सच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे युजर्स थोडे जास्त पैसे गुंतवून जास्त बेनिफिट्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे जिओचा हा नवीन प्लॅन युजर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. 999 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. काही काळापूर्वी जिओने आपल्या प्लॅनच्या किंमतींमध्ये वाढ केली होती, परंतु आता नवीन प्लॅन्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. कंपनीने या प्लानला ‘Hero 5G’ नाव दिले आहे. चला, या प्लानची सविस्तर माहिती घेऊया.

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोज 100 एसएमएस आणि रोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच, पूर्ण व्हॅलिडिटीच्या कालावधीत ग्राहकांना एकूण 196GB अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.

जिओ प्लॅनची खासियत

जिओच्या 999 प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. अनलिमिटेड डेटा ऑफरमुळे हा प्लॅन खूपच लोकप्रिय झाला आहे.

बंद झालेले जिओ प्लॅन्स

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन: या रिचार्जची किंमत 149 रुपये होती. या प्रीपेड रिचार्जमध्ये 14 दिवसांसाठी एकूण 14GB डेटा मिळत होता. म्हणजेच, दररोज 1GB इंटरनेट डेटा दिला जात होता. प्लॅनसोबत जिओच्या कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा होती.

जिओचा 179 रुपयांचा प्लॅन: जिओच्या 1GB डेली डेटा प्लॅनसाठी दुसरा पर्याय 179 रुपयांचा प्लॅन होता. यामध्ये तुम्हाला 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती आणि दररोज 1GB डेटा दिला जात होता. म्हणजेच, 18 दिवसांमध्ये तुम्हाला 18GB डेटा मिळत होता. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मिळत होती. तसेच जिओ अ‍ॅप बेनिफिट्स मोफत दिले जात होते.

नवीन प्लॅन्समुळे जिओ आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सुविधेमुळे हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरू शकतो.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.