Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 23 जुलै 2024 : मूलांक 6 रागाला आवरा, सौम्य भाषा वापरा !मूलांक 8 जोडीदारासोबत मतभेद टाळा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.

14

Numerology Prediction, 23 July 2024 : अंकशास्त्रानुसार, मंगळवार, 23 जुलै 2024 मूलांक १ असलेल्यांना दिवस अनुकूल आहे. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असेल. मूलांक ३ असणाऱ्यांनी अहंकारापासून दूर राहावे, अन्यथा नुकसान तुमचे आहे. मूलांक ४ साठी गुंतवणूकीचा योग आहे. मूलांक ६ असणाऱ्यांनी शांत राहा आणि सौम्य भाषेचा वापर करा. मूलांक ९ असणाऱ्यांची कामे वेळेत पूर्ण होतील तसेच रखडलेले पैसे मिळणार आहेत. तुमचा आजचा दिवस कसा असेल? तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 23 जुलै 2024 : मूलांक 6 रागाला आवरा, सौम्य भाषा वापरा !मूलांक 8 जोडीदारासोबत मतभेद टाळा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.
Numerology Prediction, 23 July 2024: ज्या लोकांचा आज 23 तारखेला वाढदिवस आहे त्यांचा मूलांक क्रमांक 5 असेल. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 5 असते. या लोकांचा स्वभाव बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतो. बुध ग्रहाला ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून, मूलांक 5 असणारे बुद्धिमान, धैर्यवान, मेहनती असतात. त्यांचे संवाद कौशल्य उत्तम आणि चांगले विचार करणारे असतात. चला तर 2 मूलांक असणाऱ्यांसाठी तसेच मूलांक 1 ते 9 साठी मंगळवार कसा जाणार आहे ते जाणून घेऊया.

मूलांक 1 – व्यापारात पैसे गुंतवल्याने भविष्यात लाभ

मूलांक 1 असलेल्यांना दिवस अनुकूल आहे. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सरस आहे. आज पैशांची आवक सुरू राहील. पैशांच्या बाबतीत सुरू असलेल्या अडचणी आज संपतील. व्यापऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही व्यापारातही काही पैसे गुंतवू शकता, त्यातून भविष्यात नफा मिळेल. नोकरीत आज हुशारी आणि आत्मविश्वासाने काम कराल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. कौटुंबिक बाबतीत आज दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत संबंध मधुर ठेवले तर आज अधिक लाभ होतील.

मूलांक 2 – थकित पैसे हाती येतील

मूलांक 2 असलेल्यांना आज दिवस चांगला आहे. पैशांच्या दृष्टिकोनातून दिवस अनुकूल आहे. आज तुमचे थकित पैसे हाती येण्याचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी आज वेळ चांगली आहे. व्यापारात वाढ होण्यासाठी तुम्ही आज काही पावले उचलाल. नोकरदार वर्गाच्या प्रगतीचे मार्ग आज खुले होतील. आज तुमचा स्वभाव भावनिक होईल. कौटुंबिक जीवन आज आनंदाचे राहील. जोडीदारासोबत सुखद दिवस व्यतित कराल.

मूलांक 3 – अहंकारामुळे नुकसान

मूलांक 3 असलेल्यांना आज दिवस सामान्य आहे. तुमच्या ज्ञानामुळे तुमच्यात अहंकार निर्माण होईल, ज्या कारणामुळे कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःच अडथळे निर्माण कराल, आणि याचे प्रदीर्घ परिणाम दिसतील. पैशांच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. आज तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. प्रकृतीच्या बाबतीत आज सतर्क राहाल. कुटुंबीयांसोबत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत आज प्रेमपूर्वक दिवस व्यतित होईल.

मूलांक 4 – गुंतवणुकीत मुलाचा सल्ला घ्या

मूलांक 4 असलेल्यांना आजचा दिवस सरस जाईल. आज हुशारी आणि बुद्धिचातुर्याने सर्व कामे पूर्ण कराल, आणि आज तुम्हाला फार ऊर्जावान वाटेल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. आज मुलाचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिकाधिक लाभ होतील. नोकरदारांसाठी आज वेळ अनुकूल आहे. तुमच्या ज्ञानवर्धक बोलण्याचे कार्यस्थळी कौतुक होईल. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आज आईला काही भेटवस्तू दिली तर त्याचा लाभ निकटच्या भविष्यात होईल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला व्यतित होईल.

मूलांक 5 – शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक

मूलांक 5 असलेल्यांना आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. पैशांच्या बाबतीत बोलायचे तर आजचा दिवस चांगला आहे. शेअर बाजारात तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला अधिक लाभ होतील. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फार अनुकूल राहील. आज कुटुंबात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित कराल. कुटुंबात आनंदी वातावरण टिकून राहील, त्यामुळे तुम्हीही आज प्रफुल्लित असाल. जोडीदारासोबत आज दिवस चांगला जाईल.

मूलांक 6 – शांत राहा आणि सौम्य भाषा वापरा

मूलांक 6 असलेल्यांना आजचा दिवस सामान्य राहील. व्यापारी वर्गासाठी आज वेळ अनुकूल आहे. आज स्वतःच्या विकासासाठी काही नवीन प्रस्ताव स्वीकारू शकता. आज तुम्हाला फार ऊर्जावान वाटेल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. आज पैसे कोठे तरी अडकू शकतात. तसेच कुटुंबीयांसोबत मतभेद होतील. त्यामुळे तुम्ही शांत राहाणे आणि सौम्य भाषा वापरणे योग्य राहील. जोडीदारासोबत आज मनातील विचार शेअर करणे चांगले राहील.

मूलांक 7 – पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करावी

मूलांक 7 असलेल्यांना आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या स्वभावात अहंकाराची भावना दिसेल. आज तुमच्या कामांत अहंकार येऊ दिला नाही तर आजचा दिवस फार चांगला जाईल. पैशांच्या बाबतती आजचा दिवस सामान्य राहील. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य दिवसांपैकी निम्न स्तरावरची राहील. आज कुटुंबातील सदस्यांसोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आज शांत राहा. जोडीदारासोबत संबंध मधुर ठेवा, त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होतील आणि तुम्हाला मदतही होईल.

मूलांक 8 – जोडीदारासोबत वैचारिक मतभेद

मूलांक 8 असलेल्यांना आज दिवस सामान्य दिवसाशी तुलना करता खालच्या स्तरावर राहील. पैशाच्या बाबतीत आज दिवस अनुकूल नाही. तुमचे हाती येत असलेले पैसे अडकतील, आणि तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून अस्वस्थ राहाल, याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवरही पाहायला मिळेल. कार्यस्थळी आज वेळ अनुकूल नसेल. आज तुमच्या स्वभावात चिडचिडापणा राहील. कुटुंबाच्या बाबतीत आज दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत आज वैचारिक मतभेद होतील.

मूलांक 9 – पैशांची आवक होईल

मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस फार चांगला राहील. तुम्ही आज ऊर्जावान राहाल आणि याच ऊर्जेबरोबत तुम्हील कार्यक्षेत्रा अत्यंत हुशारीने आणि चांगल्या प्रकारे तुमची कामे पूर्ण कराल. तुमच्या कामामुळे तुम्हाला आज ख्याती मिळेल. पैशांच्या बाबतीत आज दिवस अनुकूल आहे. आज पैशांचे आगमन होण्याचे योग आहे. कौटुंबिक बाबतीत जीवन फार चांगले राहील. कुटुंबात आज एखादे मंगलकार्य आयोजित होईल. जोडीदारासोबत आजचा दिवस सुखद जाईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.