Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 24 जुलै 2024 : मूलांक 1 धनलाभासह व्यवसायात प्रगती ! मूलांक 8 समस्यांचा सामना करावा लागणार ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.

12

Numerology Prediction, 24 July 2024 : अंकशास्त्रानुसार, बुधवार, 23 जुलै 2024 मूलांक 1, मूलांक 2, मूलांक 5 असलेल्या लोकांवर गणपतीचा आशीर्वाद राहील. मूलांक 1 असलेल्या लोकांना आज पैसे मिळू शकतात. मूलांक 2 असलेल्या लोकांनी आज भगवान शंकराची पूजा करावी. 3 क्रमांकाच्या लोकांनी आज इतर लोकांना सल्ला देणे टाळावे. मूलांक 4 असलेल्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मूलांक 9 असलेल्या लोकांनी आज बजरंगबली हनुमान यांना विड्याचे पान अर्पण करा. तुमचा आजचा दिवस कसा असेल? तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 24 जुलै 2024 : मूलांक 1 धनलाभासह व्यवसायात प्रगती ! मूलांक 8 समस्यांचा सामना करावा लागणार ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया
Numerology Prediction, 24 July 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचा आज 24 तारखेला वाढदिवस आहे त्यांचा मूलांक क्रमांक 6 असेल. शुक्र हा मूलांक 6 चा शासक ग्रह मानला जातो. या व्यक्ती अतिशय सुंदर असतात तसेच लहान वयात श्रीमंत होतात. आवडीनिवडीवर खूप खर्च करतात. त्यांना कंजुषपणा आवडत नाही. मुक्तपणे जीवन जगणे तसेच जीवनाचा मनसोक्तपणे आस्वाद घेतात. चला तर जाणून घेऊया आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस किती भाग्यवान असेल. तसेच मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली असतील.

मूलांक 1 – व्यापारात प्रगती होईल

मूलांक 1 असलेल्यांना आज दिवस चांगला राहील आणि आज तुमच्यासाठी धनयोग बनत असल्याचे दिसत आहेत. आज व्यापारातही प्रगती होईल. आज समाजात तुमचे नाव होईल. आज तुम्ही भावांसोबत काही चर्चा करणार असाल तर संयम ठेवा कोणतेही कटू शब्द वापरू नका आणि अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

मूलांक 2 – पैशाशी संबंधित किचकट समस्या निर्माण होईल

मूलांक 2 असलेल्यांना आज दिवसभर स्वतःचीच चिंता सतावेल. आज पैशाशी संबंधित एखादी किचकट समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळापासून थकित पैसे हाती येऊ शकतात. रागामुळे रक्तदाब वाढू शकतो. आज संयमाने कामे करणे तुमच्यासाठी चांगले राहील. तसेच आज शिवपूजा तुमच्यासाठी भाग्यवर्धक सिद्ध होईल.

मूलांक 3 – कोणलाही सल्ला देऊ नका

मूलांक 3 असलेल्यांसाठी आज दिवस सामान्य राहील. आज कोणालाही कोणताही सल्ला देऊ नका, अन्यथा शेवटी तुमचे चुकीचे असल्याचे सिद्ध होईल. आज प्रतिस्पर्ध्यांचा त्रास होईल. उपाय म्हणून पत्नीच्या हातून हळदीचा टिळा लावून घ्यावा, याचा निश्चित लाभ होईल.

मूलांक 4 – घरी पूजेचे आयोजन करा

मूलांक 4 असलेल्यांना आज दिवस चिंतेचा राहील. आज तुम्हाला एखादा मार लागण्याची शक्यताही दिसत आहे. आज तुमचे मन आणि डोके बरेच विचलित राहील. आज एखादा विशेष निर्णय घेण्याचे टाळावे. आज घरी एखाद्या पूजेचे आयोजन केले तर ते लाभदायक राहील.

मूलांक 5 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 5 असलेल्यांना आज नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. पण तुम्हाला आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज कुटुंबीयांसोबत सुखद वेळ व्यतित होईल. आज जोडीदाराला एखादी शारीरिक समस्या निर्णा होऊ शकते.

मूलांक 6 – व्यवसायाची चिंता सतावेल

मूलांक 6 असलेल्यांना आज दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला व्यवसायाबद्दल काही चिंता सतावू शकते. आज तुमचे काही सहकारी तुम्हाला एखाद्या शत्रूबद्दल भडकवू शकतात, त्यामुळे तुम्हाला आज फार संयम ठेवला पाहिजे. आज बहीण किंवा कन्येला एखादी भेटवस्तू द्यावी, तुम्हाला आवश्य लाभ होतील.

मूलांक 7 – जोडीदारासोबत वाद होतील

मूलांक 7 असलेल्यांना आजचा दिवस अडचणींचा राहील. आज तुम्हाला मार लागू शकतो. आज वाहन जपून चालवा. तसेच आज रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्याकडे आवक होत असलेले पैसे आज थकू शकतात. आज जोडीदारासोबतही वाद होऊ शकतात. कौटुंबातील वातावरण आनंदी ठेवा.

मूलांक 8 – अडथळ्यांचा दिवस

मूलांक 8 असलेल्यांना आजचा दिवस बऱ्याच अडथळ्यांचा आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली राहील, पण सायंकाळपर्यंत काही चिंता वाढू शकतात. आज तुम्हाला तुमच्यात बराच आळस जाणवेल. आळस दूर करण्यासाठी दुधात किंवा पाण्यात मध मिसळून पिल्याने दिवसभर ऊर्जावान वाटेल. आज घरातही तुमचा स्वभाव सुस्त राहील, त्यामुळे घरातील सदस्य नाराज असतील.

मूलांक 9 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस चांगला आहे. बऱ्याच दिवसांपासून एखाद्या मंगलकार्याच्या नियोजनबद्दल तुमच्या मनात आहे, त्यावर आज विचार करू शकता. तुम्हाला आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरी आज दिवसभर आनंदाचे वातावरण राहील. उपाय म्हणून आज हनुमानला गोड पानाचा प्रसाद अर्पण करावा, लाभ होईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.