Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 25 जुलै 2024 : मूलांक 3 ताणतणाव वाढणार ! मूलांक 4 खर्च जास्त होणार, व्यवहार करताना सावध राहा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.

11

Numerology Prediction, 25 July 2024 : अंकशास्त्रानुसार, गुरुवार, 25 जुलै 2024 मूलांक 1 सकारात्म दिवस आणि कष्टाचे चांगले परिणाम दिसतील. मूलांक 2 असणाऱ्यांचा ताणतणाव वाढतो आहे सावध राहा. मूलांक 4 आणि 5 च्या जातकांचाआर्थिक खर्च जास्त होणार आहे. मूलांक 6 असणाऱ्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मूलांक 9 यांनी पैशांच्या बाबतीत सावध राहा. तुमचा आजचा दिवस कसा असेल? तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 25 जुलै 2024 : मूलांक 3 ताणतणाव वाढणार ! मूलांक 4 खर्च जास्त होणार, व्यवहार करताना सावध राहा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया
Numerology Prediction, 25 July 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचा आज 25 तारखेला वाढदिवस आहे त्यांचा मूलांक क्रमांक 7 असेल. सातव्या क्रमांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. हे लोक अनेक चांगल्या गुणांनी संपन्न असतात. कुटुंबातील सुख-समृद्धी वाढवतात आणि घरातील प्रत्येकाला ते प्रिय असतात. सौम्य स्वभावाचे मात्र कधीही तडजोड करत नाहीत. सामर्थ्यवान, लढणारे आणि कधीही हार मानत नाहीत. महत्वाकांक्षी असतात आणि चांगले विचार करणारे देखील असतात. हे लोक स्वभावाने तत्वज्ञानी आणि विचारवंत असतात. हे लोक कोणत्या ना कोणत्या संशोधनात गुंतलेले असतात आणि आध्यात्मिक गोष्टींवर खूप खोल विचार करतात. त्यांच्यात इतरांना ओळखण्याची चांगली गुणवत्ता असते. चला तर जाणून घेऊया आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस किती भाग्यवान असेल. तसेच मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली असतील.

मूलांक 1 – कष्टाचे चांगले परिणाम दिसतील

मूलांक 1 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कामाचे सकारात्मक रिझल्ट तुम्हाला मिळती, फक्त लक्षात ठेवा कामात कष्ट जास्त घ्यावे लागतील. कष्टाचे चांगले परिणाम दिसून येतील. इतरांवर जास्त अवलंबून राहू नका. जोडीदाराला सोबत घेऊन काम करा.

मूलांक 2 – मानसिक तणाव जास्त राहील

मूलांक 2 साठी दिवस फारसा चांगला नाही. आज मानसिक तणाव जास्ती राहील. लहानसहान गोष्टी आज मनावर अधिक परिणाम करतील. तुमच्या मनासारखे जरी नसले तरी दुपारनंतर परिस्थिती बदलताना दिसेल. सकारात्मक राहा आणि चिडचिड करु नका.

मूलांक 3 – कामात मन लागणार नाही

मूलांक 3 असलेल्या जातकांसाठी दिवस फारसा चांगला नाही. कामात मन लागणार नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध तणावपूर्ण राहतील. व्यवसायात स्थिती समान्य राहाणार आहे. आज सट्टा, जुगार यापासून दूर राहावे. तणावाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा अन्यथा आजारी पडाल.

मूलांक 4 – आर्थिक खर्च जास्त होतील

मूलांक 4 साठी खर्चिक दिवस आहे, पाकिटावर ताण पडणार आहे. आर्थिक खर्च आज जास्त होतील. कामात तुम्हाला फार चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्यासाठी काही नवीन वस्तू खरेदी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत आज अधिक सावध राहा.

मूलांक 5 – अनावश्यक खर्च जास्त होतील

मूलांक 5 साठी दिवस फारसा बरा नाही. प्रेमसंबंधाच्या बाबतीत आज उदासिनता राहील. नातेसंबंधातील अडथळे आणि त्रास वाढणारे ठरतील. अनावश्यक गोष्टींवर आज जास्त खर्च होईल. आज काही कारणांमुळे त्रस्त असाल.

मूलांक 6 – बोलण्यावर नियंत्रण ठेवा

मूलांक 6 साठी दिवस ठिक आहे फक्त काम आणि घर अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला आज अधिक सावध राहावे लागणार आहे. तुमच्या बोलण्यावर आज नियंत्रण ठेवा. तुम्हाला राग यावा अशी वर्तणूक लोक करताना दिसतील.

मूलांक 7 – प्रकृती बिघडू शकते

मूलांक 7 साठी तब्येतीच्या दृष्टीने दिवस फारसा चांगला नाही.आज प्रकृती थोडी खराब राहू शकते. पावसाळ्यात तुम्हाला त्रास होवू शकतो. फिरायला जाताना सामानाकडे विशेष लक्ष द्या. चोरी होण्याची शक्यता दिसत आहेत.

मूलांक 8 – धनलाभ होईल

मूलांक 8 साठी दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला लाभ होतील. आज तुम्हाला कामातून बऱ्याच संधी मिळतील. धनलाभ होईल आणि कुटुंबावर खर्च जास्त होईल.

मूलांक 9 – पैशांच्या बाबतीत सावध राहा

मूलांक 9 साठी दिवस चांगला आहे फक्त आर्थिक व्यवहार करताना तसेच पैशांच्या बाबतीत आज सावध राहावे लागेल. कामात तुम्हाला मदत मिळू शकते. या वेळी तुम्हाला स्थानपरिवर्तनाची संधी मिळू शकते.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.