दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगासोबतच शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. या आठवड्यात सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे, जिथे आधीच बुध आणि शुक्र विराजमान आहेत. अशा स्थितीत सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग आणि शुक्र आणि सूर्य यांच्या मीन राशीत युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. या दोन राजयोगांमुळे या आठवड्यात अनेक राशींची प्रगती होईल आणि अचानक धनलाभ होईल. त्याचबरोबर या आठवड्यात होळी आणि धुळवड आहे त्यामुळे वातावरणातील आनंद द्विगुणीत होईल. हा आठवडा मिथुन, सिंह आणि इतर 5 राशींच्या लोकांसाठी उत्तम आहे. चला तर, जाणून घेवूया मेष ते मीन राशींसाठी साप्ताहिक आर्थिक आणि करिअर राशिभविष्य कसे असेल.
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – ऑफिसमध्ये सतर्क राहा

या आठवड्यात ऑफिसच्या कामात एखादी महिला तुम्हाला त्रास देवू शकते तेव्हा सतर्क राहा. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारते आहे. तसेच तब्येतीमध्ये ही हळूहळू सुधारणा दिसून येते आहे. कुटुंबात सेलिब्रेशनचा एखादा कार्यक्रम होईल. प्रियजनांसोबत वेळ व्यतीत केल्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. प्रवासामुळे त्रास होऊ शकतो, तेव्हा प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे तुम्ही नाराज होवू शकता. शुभ दिन: 8,12
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – नवीन गोष्ट सुरु करण्यासाठी वेळ उत्तम

या आठवड्यात ऑफिस आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या बोलण्याने खूप फरक पडेल. ऑफिसमध्ये काही नवीन गोष्टी सुरु करण्याचा विचारात असाल तर त्वरित करा, वेळ उत्तम आहे. लवलाइफ चांगली असून प्रेमात आपलेपणा वाढेल. तब्येतीकडे लक्ष द्या तसेच आराम करणे देखील महत्त्वाचे आहे. कुटुंबात काही बदल दिसून येतील. प्रवासात तुम्हाला लाभ होईल. काही कामात मेहनत खूप आहे पण तुम्ही यशस्वी होणार. आठवड्याच्या शेवटी भागीदारीमधील व्यवसायात सुख-समृद्धीचे योग दिसून येतील. शुभ दिन: 8,9,12,13,14
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारणार

मिथुन राशीच्या जातकांची आर्थिक परिस्थिती या आठवड्यात अचानक सुधाणार आहे. गुंतवणुकीमधून मोठा फायदा होईल. कुटुंबात वातावरण चांगले असेल खास करून जो तरुण वर्ग आहे तो तुमच्यावर खुष असेल. या आठवड्यात कोणत्यातरी महिलेमुळे प्रवासांमध्ये त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रवास टाळणे उत्तम असेल. लवलाइफमध्ये नाराजी असेल, तुमच्या विरोधात परिस्थिती निर्माण होत आहे असे वाटेल. ऑफिसमध्ये काही तरुण लोकांमुळे तुमचे मन अशांत असेल. तब्येतीकडे लक्ष द्या आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. शुभ दिन: 10,12,14
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – मान-सन्मान वाढेल

ऑफिस आणि व्यवसायस्थळी प्रगती असून तुमचा मान – सन्मान वाढेल. या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न असेल. अडवलेले पैसे अचानक मिळतील त्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. लवलाइफ चांगली आहे आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणार आहात. या आठवड्यात तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात जर तणावाचे वातावरण असेल तर ते कमी होईल. प्रवासांमध्ये थोडा संताप आणि मानसिक अस्वस्थताहोऊ शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. शुभ दिन: 8,9,10,11,14
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – आर्थिक प्रगतीचे योग

या आठवड्यात आर्थिक उन्नतीचे शुभ योग दिसत आहेत, त्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. गुंतवणुक फायदेशीर आहे. तब्येतीमध्ये सुधारणा होणार आहे तरी पथ्य सांभाळावे. या आठवड्यात केलेल्या प्रवासांमुळे शुभ परिणाम दिसून येतील आणि मन प्रसन्न होईल. प्रेम संबंधातही आठवड्याच्या सुरुवातीला सुखद बातमी मिळेल आणि लव्ह लाइफ रोमँटिक असेल. ऑफिसच्या कामात त्रासाची शक्यता आहे, त्यामुळे तुमचा ताण वाढेल. कुटुंबात काही नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार करू शकता.शुभ दिन: 8,10,11,13,14
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – प्रवासात लाभ, कुटुंबात सुख- समृद्धी

या आठवड्यात कामात प्रगती असून तुम्हाला जशी हवी तशी परिस्थिती निर्माण होते आहे. प्रेमसंबंध चांगले असतील आणि जीवनात आनंदाने वाटचाल कराल. तब्येतीमध्ये सुधारणा दिसणार आहे. कुटुंबात सुख-समृद्धीचे योग असून प्रियजनांसोबत सुखाने वेळ व्यतीत करणार आहात. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे उत्तम यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबाला चांगला वेळ देणार आहात आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. शुभ दिन: 8,11,12,14
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – धनलाभाचे योग

तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ आहे आणि कोणत्या तरी महिलेच्या कारणाने धनलाभाचे चांगले योग जुळून येणार आहेत. लवलाइफमध्ये सुखी असाल. आरोग्यात खूप सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या आठवड्यात प्रवासामुळे शुभ संधी मिळतील आणि जीवनात सुख लाभेल. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेवून येणार आहे. शुभ दिन: 8,11,12,13
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार

हा आठवडा चांगला असून कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कोणत्यातरी महिलेच्या मदतीने प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल आणि भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदा घेऊन येणार आहे. या आठवड्यात धनवृद्धीचे शुभ योग तर प्रेम जीवनात सुख-समृद्धीचे योग आहेत. या आठवड्यात प्रवास करताना थोडा समतोल राखला तर चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी बातमी ऐकून मन उदास होऊ शकते.शुभ दिन: 8,9,11,14
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – सगळी कामे मार्गी लागणार

हा आठवडा आर्थिक लाभाने भरलेला असेल. मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकाल. ऑफिसमध्ये वेळ तुमची आहे, सगळी कामे मार्गी लागणार आणि प्रोजेक्ट यशस्वी होणार. आर्थिक लाभाची स्थिती ठिक ठिक असेल. या आठवड्यात प्रवास टाळला तरी चांगले होईल, कारण प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी सर्वांचे ऐका, पण स्वतःच्या मनाचा निर्णय घेतला तर चांगले परिणाम मिळतील.शुभ दिन: 9,10,11
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – क्रिएटीव्ह कामे करणार

कार्यक्षेत्रात प्रगती असून तुम्ही क्रिएटीव्ह पद्धतीने कामे करणार आहात. तब्येतीमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील दरम्यान आहार आणि आरामकडे लक्ष द्या. लवलाइफमध्ये थोडी नाराजी असेल. खर्च थोडे वाढणार आहेत. काही कारणामुळे कामे वाढतील पण काळजी करु नका तुम्ही ती पूर्ण करणार आहात. या आठवड्यात प्रवास टाळणे चांगले असेल. आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढतो आहे, तुम्ही योग्य नियोजन करावे. शुभ दिन: 9,11
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – कुटुंबातील मतभेद संपतील

या आठवड्यात लोकांना आर्थिक चणचण भासणार नाही. हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारा आहे. कुटुंबातील मतभेद संपतील आणि सुख समाधानाचे वातावरण असेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि आरोग्य सुधारण्यात तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकते. कुटुंबातील महिला वर्गाचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासांमुळे यश मिळेल फक्त संयमाने प्रवास करा. आठवड्याच्या शेवटी एखादी ओळखीची व्यक्ती धोका देण्याची शक्यता आहे. शुभ दिन: 10,12,14
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – प्रोजेक्टमध्ये व्यस्त राहणार

हा आठवडा यशाने भरलेला असेल. मान-सन्मान वाढेल आणि तुम्ही प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त राहणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. व्यवसायात अचानक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात प्रवासांमुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रवास करणे टाळावे. आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय घेतल्यास तुम्हाला सुखसमाधान मिळेल.शुभ दिन: 9,11,12