Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
बदलापूर - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 24 Aug 2024 16:42:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg बदलापूर - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर https://tejpolicetimes.com/?p=103296 https://tejpolicetimes.com/?p=103296#respond Sat, 24 Aug 2024 16:42:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103296 Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर

अमुलकुमार जैन, अलिबाग : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेल्या महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथे केले आहे. लाडकी बहिण योजनेला उदंड प्रतिसाद प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला […]

The post Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर

अमुलकुमार जैन, अलिबाग : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेल्या महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथे केले आहे.

लाडकी बहिण योजनेला उदंड प्रतिसाद

प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ” महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसाद आला पाहून बदलापूर घटनेचे राजकारण सुरू केलं. बदलापूरच्या घटनेवरून राज्यात हिंसाचार मागून अशांतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन केलं. मात्र, न्यायालयाने चपराक दिल्यानंतर महाविकास आघाडीने आजचा बंद मागे घेतला. कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराच्या उद्धव ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने साधा निषेध केला नाही”.
Raj Thackeray : बलात्कार, हुंडाबळी, विनयभंग.. राज ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच वाचली

बदलापूर येथील घटना दुर्दैवी

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, ”बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे बदलापूर घटनेतील आरोपीला तातडीने अटक ही करण्यात आली आहे. तसेच या घटनेत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ देखील करण्यात आले आहे”.

मविआकडून लाडकी बहिण योजना बंद करण्याचा प्रयत्न

राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा चालू केलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते दस्तावले आहेत. काहीही करून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून होत आहेत. बदलापूर येथे झालेल्या निदर्शनावेळी आंदोलकांकडून लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकवण्यात येत होते. सामान्य नागरिकांकडून असे प्रकार केले जात नाहीत. आंदोलनामध्ये घुसलेल्या राजकीय शक्तींनी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकावले होते. असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

Source link

The post Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103296 0
बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट! अक्षयच्या वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी https://tejpolicetimes.com/?p=103122 https://tejpolicetimes.com/?p=103122#respond Fri, 23 Aug 2024 02:58:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103122 बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट! अक्षयच्या वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी

ठाणे (बदलापूर) : बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. अशातच आता या प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला या प्रकरणात फसवले जात असल्याचा […]

The post बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट! अक्षयच्या वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट! अक्षयच्या वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी

ठाणे (बदलापूर) : बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. अशातच आता या प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला या प्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

आरोपी अक्षयच्या कुटुंबाची मागणी

अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे की, त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते या चाचणीद्वारे आपल्या मुलाचा म्हणजे अक्षयच्या निर्दोषतेचा पुरावा मिळू शकतो.
Badlapur School Case : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न, लग्नानंतर तिन्ही बायका गेल्या सोडून

अक्षयची आई काय म्हणाली?

अक्षयची आई म्हणाली, अक्षयला १५ दिवस झाले कामाला लागून, १३ तारखेला घटना घडली. अक्षयला १७ तारखेला घेऊन गेले. आम्हाला तिथल्या काम करणाऱ्या बाईने सांगितलं की, अक्षयला पोलीस घेऊन गेले. तेवढंच मला माहिती आहे. पोलीस माझ्या मुलाला मारु लागले, माझ्या लहान मुलाला पण मारलं. असं आरोपी अक्षयच्या आईने सांगितलं आहे.

अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. गावातील ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात घुसून कुटुंबीयांना बाहेर काढलं आणि घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हाकलून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.
Akshay Shinde: बदलापूर अत्याचार घटना; आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड, ग्रामस्थांना घरात सापडली…

अक्षयच्या घरात सापडली खेळणी

दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी आढळली आहेत. ही खेळणी नेमकी आली कुठून? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

Source link

The post बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट! अक्षयच्या वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103122 0
लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा https://tejpolicetimes.com/?p=102978 https://tejpolicetimes.com/?p=102978#respond Wed, 21 Aug 2024 20:02:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102978 लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा

ठाणे, प्रदीप भणगे : बदलापूरातील घटनेनंतर राज्यात सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. अशातच राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाची भांडण रंगली आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करत महिलेच्या सुरक्षेवरुन सरकारला घेरले तर सत्ताधाऱ्यांनी आंदोलनामागे राजकीय केला आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या बदलापूर घटनेवर काय प्रतिक्रिया आल्या आहेत पाहूया.. सुषमा अंधारे प्रतिक्रिया…. […]

The post लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा

ठाणे, प्रदीप भणगे : बदलापूरातील घटनेनंतर राज्यात सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. अशातच राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाची भांडण रंगली आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करत महिलेच्या सुरक्षेवरुन सरकारला घेरले तर सत्ताधाऱ्यांनी आंदोलनामागे राजकीय केला आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या बदलापूर घटनेवर काय प्रतिक्रिया आल्या आहेत पाहूया..

सुषमा अंधारे प्रतिक्रिया….

राज्यात साडे सात वर्षापासून गृहमंत्री देेवेंद्र फडणवीस आहेत. या राज्यात महिला अत्याचाराच रेट जास्त असल्याने महिला अत्याचारावरील श्वेत पत्रिका त्यांनी काढावी अशी मागणी उद्धव सेनेच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. वामन म्हात्रे हे शिंदे गटाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहे. यामुळे एका महिला पत्रकाराविषयी असे वक्तव्य करून आंदोलन अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करून सुद्धा वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे का ? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी केला आहे. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुषमा अंधारे या दुपारपासून बदलापूर पूर्व स्थानकात ठिय्या मांडून बसल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया…

पाेलिस जी घटना घडलेली नाही. त्या प्रकरणात गुन्हे दाखल करतात. तर जे गुन्हे घडले त्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत नाही. हे बदलापूर प्रकरणातून उघड झाले आहे. गुन्हे नोंदवू का यासाठी पाेलिसांवर दबाब येताे. वरुन फाेन येतो. तो कोणत्या इंद्रदेवाचा फोन येतो का ? वरनं परवानी आली नाही तर गुन्हा दाखल करणार नाही का ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. घटनाच इतकी नींदनीय होती. नागरीकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे बोलले जाते. हे खाेटे आहे. बदलापूरकर सांगतात. ते स्वत: आंदोलनात होते. आम्हाला लाडकी बहिण नको, सुरक्षीत बहिण ही योजना हवी आहे असे आव्हाड यांनी सांगितले.

नाना पाटोले यांची प्रतिक्रिया…

कालचे आंदोलन हे बदलापूरकरांचे नव्हते. तर संपूर्ण महाराष्ट्राला जागरुक करणारे आंदोलन ठरले. मात्र सरकार या आंदोलनाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करीत आहे. या आंदोलनात बदलापूरकर उत्फूर्त पणे सहभागी झाले होते. त्यांची काेणतीही चूक नव्हते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलकांनी दगडफेक केली. या आंदोलकावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. जननेते नींदनीय घटनेचा साधा निषेध व्यक्त करायचा की नाही असा संतप्त सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
Raj Thackeray : संताप आणणारा प्रकार, गुन्हा दाखल करुन घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा सवाल

राजू पाटील यांची प्रतिक्रिया…

शक्ती कायदावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारला खडेबोल सुनावले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांना कठोरातील शिक्षा व्हावी अन्यथा अशा प्रकरणाला आळा बसणार नाही. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात महिलांसाठी शक्ती कायदा लागू करा. आता तरी सरकारला जाग आली असले शक्ती कायदा फाईल दिल्लीत पडून आहे, तो त्वरित पारित करून घ्यावा अशी थेट मागणी राजू पाटील यांनी सरकारला केली आहे. विधानसभेत शक्ती कायद्यासाठी मी बोललो आहे असे राजू पाटील यांनी माहिती दिली.

वामन म्हात्रे प्रतिक्रिया…

मी संबंधित महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. केवळ आणि केवळ मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. मी कोणत्याही प्रकारचे असे अपशब्द वापरलेले नाहीत. पोलिसांनी देखील याबाबत तपास करून निर्णय घ्यावा. माझ्या बाजूने देखील कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्यात येईल. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे. तर उबाठा गटाकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप ही वामन म्हात्रे यांनी केला आहे.
Chitra Wagh on Waman Mhatre : कोणीही असूदे, आधी थोबाड फोडायचं, मग पोलिसांना सांगायचं, वामन म्हात्रेंवर चित्रा वाघ भडकल्या

शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया…

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, बदलापूर प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आराेपीला पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपी हा शाळेतील खाजगी कर्मचारी हाेता. त्याला शाळेने नियुक्त केलेले नव्हते. शाळा, का’लेज, हा’टेलमध्ये खाजगी कर्मचारी नियुक्त करताना त्यांची पोलिस पडताळणी करावी. शाळेत सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले नाही. हा शाळेचा हलगर्जी पणा असून या प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे. या प्रकरणी एसआयटी अधिकारी आर. पी. सिंग यांची नियुक्ती केली आहे . आराेपीला फाशी होईल यासाठी सर्व बाबी न्यायालयात मांडल्या जातील. बदलापूर आंदोलनात स्थानिक नागरीक नव्हते. त्यांच्या हातात लाडकी बहिण योजनेचे बॅनर होते. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पाेलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला.

तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया…

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले की, दिशा कायदा आपल्याकडे लागू असला तरी बदलापूरातील घटनेने या महाराष्ट्राची दिशाच बदलून टाकली आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्याकरीता कायदा लागू करायचा. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केली जाणार नसेल तर त्याचा उपयाेग काय ? एखादी गंभीर घटना घडल्यावर शाळेत सीसीटीव्ही लावा, त्याच्या तपासाकरीता एसआयटी स्थापन केली. घटना घडून गेल्यावर या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही. याचा सरकारने विचार करावा.

रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया…

ही घटना घडली ती संतापजनक आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन झाले. त्या आंदोलकांच्या हाती लाडक्या बहिणीचे ब’नर कसे काय आले. या आंदोलनात बाहेचे लोक होते. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. घटनेकडे सगळेजण राजकारण म्हणून पाहत आहे. हे घटनेचे राजकारण होता कामा नये. पिडीत मुलीला आणि पालकांना समुदेशन केले आहे. त्यांच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजने अंतर्गत मदत करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांना मदत करणे या गोष्टी बाजूला राहून त्याचे राजकारण केले जात असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया..

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराविषयी अर्वाच्च भाषा वापरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. ‘तू अशा बातम्या देतेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ अशी बेताल टिपण्णी म्हात्रेंनी केली होती. यावर बोलताना “तिथल्या तिथे त्याचं थोबाड का नाही फोडलं?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. मला हा मुद्दा आता समजला, गुन्हा का नोंद होत नाही याविषयी मी पोलिसांशी बोलते, पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोलतं, तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत… मी जर काम करत असताना, मला जर कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही हो.. ज्या पद्धतीने आपल्याला असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण एक महिला म्हणून… सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे, मी राजकीय कार्यकर्ती आहे.. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा..” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया…

आरोपीने निष्पाप मुलींसोबत केलेली घटना अत्यंत अशोभनीय व दुष्ट आहे, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या प्रकरणी गंभीर असून, आरोपीला अटक करून गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने आरोपींचा बचाव केला असता तर तो मुद्दा बनला असता. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजकारण करत आहेत, तर अशा संवेदनशील विषयात असे करणे योग्य नाही. – संजय निरुपम (प्रवक्ते व माजी खासदार – शिवसेना शिंदे)

Source link

The post लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102978 0
आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न https://tejpolicetimes.com/?p=102970 https://tejpolicetimes.com/?p=102970#respond Wed, 21 Aug 2024 17:35:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102970 आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न

प्रदिप भणगे, ठाणे : बदलापूर अत्याचार घटनेनं राज्याला हादरून सोडलं आहे. काल हजारो नागरिकांनी रेलरोको आंदोलन करत घटनेचा निषेध केला आहे. आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याचे वयाच्या 24 व्या वर्षांपर्यंत 3 […]

The post आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न

प्रदिप भणगे, ठाणे : बदलापूर अत्याचार घटनेनं राज्याला हादरून सोडलं आहे. काल हजारो नागरिकांनी रेलरोको आंदोलन करत घटनेचा निषेध केला आहे. आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याचे वयाच्या 24 व्या वर्षांपर्यंत 3 लग्न झाले असून लग्नानंतर त्याच्या तीनही बायका सोडून गेल्या आहेत.

अक्षयच्या घराची नागरिकांकडून तोडफोड

संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे. बदलापूर मधील खरवई गावातील एका चाळीत अक्षय शिंदे राहत होता. त्याचबरोबर त्याचे नातेवाईक देखील त्याच्या शेजारी राहत होते. तोडफोडीनंतर अक्षय याचे कुटुंबीय गायब झाले आहे. यावेळी अधिकची माहिती विचारण्यात आली तेव्हा त्याचे 3 लग्न झाले असून एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही अशी माहिती मिळाली आहे.

खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची शनिवारी उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार घेण्यास पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. तसेच पीडितांवर लगोलग उपचार करण्यासही डॉक्टरांनी टाळाटाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Badlapur Assault Case FIR : दादाने माझे कपडे काढले नि… घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं, बदलापूर प्रकरणी FIR मध्ये काय?

आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित

बदलापूरमध्ये झालेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं होते. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी राज्य सरकारकडे केली होती.

Source link

The post आरोपी अक्षय शिंदेने 24 व्या वर्षापर्यंत केले 3 लग्न first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102970 0
Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल https://tejpolicetimes.com/?p=102948 https://tejpolicetimes.com/?p=102948#respond Wed, 21 Aug 2024 13:11:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102948 Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

गोंदिया : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यासह देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. ”लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाटून स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे. अशी भावना निर्माण करा” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर […]

The post Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

गोंदिया : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यासह देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. ”लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाटून स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे. अशी भावना निर्माण करा” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे हे गोंदिया दौऱ्यावर असून ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट देखील केलं आहे. ते म्हणाले की, ” जनतेच्या पैशांतून लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा आणि स्वत:ची ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का? याचा विचार करा. माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे आज हा विषय समोर आला याचा मला अभिमान आहे. अशा घटना घडू नये यासाठी कडक कायदे करू त्याची अंमलबजावणी करावी”. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

घटना घडली तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. ” ते म्हणाले की, ” जिथे घटना घडली तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात जर अशी परिस्थिती आहे तेव्हा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही”. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित

बदलापूरमध्ये झालेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं होते. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी राज्य सरकारकडे केली होती.

Source link

The post Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102948 0
Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार https://tejpolicetimes.com/?p=102861 https://tejpolicetimes.com/?p=102861#respond Tue, 20 Aug 2024 17:36:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102861 Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच या घटनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. शाळेच्या संस्था चालकांना हटवण्यात येणार असून त्यांच्या जागी शाळेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमला जाणार आहे. शिक्षण विभागाला या संदर्भातील अहवाल आज रात्री देण्यात येणार आहे. त्याचबरोबर […]

The post Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच या घटनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. शाळेच्या संस्था चालकांना हटवण्यात येणार असून त्यांच्या जागी शाळेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमला जाणार आहे. शिक्षण विभागाला या संदर्भातील अहवाल आज रात्री देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांचे निलंबन

देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळाआधीच बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.तसेच सरकारने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची माहिती दिली आहे. बदलापूरातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करुन बदलापूर प्रकरणातील पुढचा तपास करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा संस्थाचालकांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची दखल घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याचे सीएम शिंदे यांनी सांगितले आहे.

Source link

The post Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102861 0
Badlapur News : ”तू अशा बातम्या देत आहेस जसा तुझ्यावरच बलात्कार झालायं”, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरली घाणेरडी भाषा https://tejpolicetimes.com/?p=102836 https://tejpolicetimes.com/?p=102836#respond Tue, 20 Aug 2024 16:05:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102836 Badlapur News : ”तू अशा बातम्या देत आहेस जसा तुझ्यावरच बलात्कार झालायं”, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरली घाणेरडी भाषा

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला घाणेरडी भाषा वापरली आहे.वामन म्हात्रे यांच्या वकतव्यामुळे पत्रकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. वामन म्हात्रे काय म्हणाले? एक महिला पत्रकार वार्तांकन करत असताना […]

The post Badlapur News : ”तू अशा बातम्या देत आहेस जसा तुझ्यावरच बलात्कार झालायं”, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरली घाणेरडी भाषा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur News : ”तू अशा बातम्या देत आहेस जसा तुझ्यावरच बलात्कार झालायं”, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरली घाणेरडी भाषा

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला घाणेरडी भाषा वापरली आहे.वामन म्हात्रे यांच्या वकतव्यामुळे पत्रकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

वामन म्हात्रे काय म्हणाले?

एक महिला पत्रकार वार्तांकन करत असताना वामन म्हात्रे यांनी तिच्या सोबत घाणेरडी भाषा वापरली आहे. ”तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे”.असं वादग्रस्त विधान वामन म्हात्रे यांनी केलं आहे. म्हात्रे यांच्या विधानामुळे पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Navneet Rana on Badlapur Assault : फडणवीस साहेब, आई म्हणून वेदना होतेय, बदलापूरच्या राक्षसाला भरचौकात फाशी द्या, नवनीत राणा आक्रमक

आधी वादग्रस्त विधान नंतर सावरासावर

वामन म्हात्रे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, ”मी कुठलही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीची माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता.माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला”.असं म्हात्रे म्हणाले आहेत.

आरोपीकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी होती

आरोपी अक्षय शिंदे याच्याकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. यामुळे शाळेच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या शाळेत 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. दरम्यान याच काळात त्याने गैरफायदा घेतला.विशेष म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेकडून शक्ती कायदा लागू करण्याची मागणी

बदलापूर घटनेवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. राजू पाटील म्हणाले की, ”सकाळपासून लोकांकडून आंदोलन सुरु आहे. लोकांची जनभावना आहे कोणतीही राजकीय पक्ष सहभागी नाही अशावेळी सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी घटनास्थळी भेट दिली पाहिजे होती पण असे काही झाले नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर येतात पण सीएम शिंदेंनी यायला हवे होते. रेल रोको गेले आठ तास सुरु आहे. लोकांचा आक्रोश आहे हा अशावेळी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.” असे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.

Source link

The post Badlapur News : ”तू अशा बातम्या देत आहेस जसा तुझ्यावरच बलात्कार झालायं”, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरली घाणेरडी भाषा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102836 0
Badlapur News : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेकडेच चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची होती जबाबदारी https://tejpolicetimes.com/?p=102867 https://tejpolicetimes.com/?p=102867#respond Tue, 20 Aug 2024 14:53:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102867 Badlapur News : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेकडेच चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची होती जबाबदारी

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे.अशातच आता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्याकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. यामुळे शाळेच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती नाही […]

The post Badlapur News : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेकडेच चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची होती जबाबदारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur News : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेकडेच चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची होती जबाबदारी

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे.अशातच आता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्याकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. यामुळे शाळेच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती नाही

आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या शाळेत 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. दरम्यान याच काळात त्याने गैरफायदा घेतला.विशेष म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेकडून शक्ती कायदा लागू करण्याची मागणी

बदलापूर घटनेवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. राजू पाटील म्हणाले की, ”सकाळपासून लोकांकडून आंदोलन सुरु आहे. लोकांची जनभावना आहे कोणतीही राजकीय पक्ष सहभागी नाही अशावेळी सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी घटनास्थळी भेट दिली पाहिजे होती पण असे काही झाले नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर येतात पण सीएम शिंदेंनी यायला हवे होते. रेल रोको गेले आठ तास सुरु आहे. लोकांचा आक्रोश आहे हा अशावेळी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.” असे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.
Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

शक्ती कायद्यातील तरतूदी काय?

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात महिलांसाठी शक्ती कायदा लागू करा. आता तरी सरकारला जाग आली असले शक्ती कायदा फाईल दिल्लीत पडून आहे, तो त्वरित पारित करून घ्यावा अशी थेट मागणी राजू पाटील यांनी सरकारला केली आहे. विधानसभेत शक्ती कायद्यासाठी मी बोललो आहे असे राजू पाटील यांनी माहिती दिली. शक्ती कायदा महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी खास बनवण्यात आला आहे. महिलांवरील हल्ले आणि अशी अत्याचारांच्या गुन्हे कायद्यामुळे अजामीनपात्र होणार आहे. महिलावरील अतिप्रसंगच्या घटनेत फाशीची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील मुलींवर अत्याचारांच्या घटना समोर आल्या तर गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेपेची आणि दहा लाख दंड किंवा मृत्यूदंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १२ वर्षाखालील मुलींवरील अत्याचाराची घटना असेल तर मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा आणि दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच अत्याचारांच्या प्रकरणात २१ दिवसांच्या आत गुन्हेगारावर आरोपपत्र दाखल करणे अशी तरतूद करण्यात आली आहे.

Source link

The post Badlapur News : धक्कादायक! आरोपी अक्षय शिंदेकडेच चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची होती जबाबदारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102867 0
Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी https://tejpolicetimes.com/?p=102830 https://tejpolicetimes.com/?p=102830#respond Tue, 20 Aug 2024 13:56:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102830 Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. गेल्या आठ तासांपासून संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं होतं. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी त्या संदर्भातील ट्विट देखील केले […]

The post Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. गेल्या आठ तासांपासून संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं होतं. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी त्या संदर्भातील ट्विट देखील केले आहे.

आदित्य ठाकरेंची पोस्ट काय?

आदित्य ठाकरेंनी लिहिलंय की, ”दररोज आम्ही महिलांसाठी “सेल्फ डिफेन्स क्लासेस” सुरू करण्याचा विचार करतो, यापूर्वी आम्ही सुरू केले होते.परंतु मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आणि आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने काळाची मागणी असल्याने, तरीही प्रश्न उरतो असं का आहे? विनयभंग, बलात्काराच्या घटना आपल्याला देशभरातून रोज ऐकायला मिळतात ज्यामुळे आपल्याला राग येतो आणि आजारी पडतो. त्यामुळे जलद न्याय, निष्पक्ष न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे.मानवते विरुद्धच्या गुन्ह्याला पूर्णपणे सहन न करण्याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे बलात्कार आहे. आज बदलापूर प्रकरण ऐकून मन हेलावून गेलं.बलात्कार हा बलात्कार असतो.त्यात कुठेही वयाचा फरक नसतो.आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. मुर्मू जी महाराष्ट्र शक्ती विधेयकाला तिची प्रदीर्घ प्रलंबित संमती देतील, ज्यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवरील कायद्याचे सक्षमीकरण होईल”. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी

पुण्यातही अत्याचाराची घटना

बदलापूर येथील घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया समोर येत असताना पुण्यातील एका नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळाल्या माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय १९ असून त्याचे नाव देवराज पदम आग्री असे आहे.

या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला. समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध ७४,७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

The post Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102830 0
Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी https://tejpolicetimes.com/?p=102821 https://tejpolicetimes.com/?p=102821#respond Tue, 20 Aug 2024 12:36:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102821 Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी

मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागली आहे. अशातच अशा आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बदलापूरातील नागरिकांकडून होत आहे. इतकेच नव्हे तर शक्ती कायदावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारला खडेबोल सुनावले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांना […]

The post Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी

मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागली आहे. अशातच अशा आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बदलापूरातील नागरिकांकडून होत आहे. इतकेच नव्हे तर शक्ती कायदावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारला खडेबोल सुनावले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांना कठोरातील शिक्षा व्हावी अन्यथा अशा प्रकरणाला आळा बसणार नाही.
Badlapur Girls Assault: बदलापूर प्रकरणी भडकली अभिनेत्री शिवाली परब; थेट फाशी देण्याची केली मागणी

शक्ती कायदा लागू करा

बदलापूर प्रकरणावर बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले, सकाळपासून लोकांकडून आंदोलन सुरु आहे. लोकांची जनभावना आहे कोणतीही राजकीय पक्ष सहभागी नाही अशावेळी सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी घटनास्थळी भेट दिली पाहिजे होती पण असे काही झाले नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर येतात पण सीएम शिंदेंनी यायला हवे होते. रेल रोको गेले आठ तास सुरु आहे. लोकांचा आक्रोश आहे हा अशावेळी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे असे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.

शक्ती कायद्यातील तरतूदी काय?

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात महिलांसाठी शक्ती कायदा लागू करा. आता तरी सरकारला जाग आली असले शक्ती कायदा फाईल दिल्लीत पडून आहे, तो त्वरित पारित करून घ्यावा अशी थेट मागणी राजू पाटील यांनी सरकारला केली आहे. विधानसभेत शक्ती कायद्यासाठी मी बोललो आहे असे राजू पाटील यांनी माहिती दिली. शक्ती कायदा महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी खास बनवण्यात आला आहे. महिलांवरील हल्ले आणि अशी अत्याचारांच्या गुन्हे कायद्यामुळे अजामीनपात्र होणार आहे. महिलावरील अतिप्रसंगच्या घटनेत फाशीची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील मुलींवर अत्याचारांच्या घटना समोर आल्या तर गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेपेची आणि दहा लाख दंड किंवा मृत्यूदंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १२ वर्षाखालील मुलींवरील अत्याचाराची घटना असेल तर मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा आणि दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच अत्याचारांच्या प्रकरणात २१ दिवसांच्या आत गुन्हेगारावर आरोपपत्र दाखल करणे अशी तरतूद करण्यात आली आहे.

Source link

The post Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102821 0