Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
भारतीय दंड संहिता - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 19 Nov 2024 05:46:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg भारतीय दंड संहिता - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 कौटुंबिक हिंसाचार, पुरुषांवरही वाढता अत्याचार! राज्यभरातून दिवसाकाठी शंभराहून अधिक कॉल्स https://tejpolicetimes.com/?p=109281 https://tejpolicetimes.com/?p=109281#respond Tue, 19 Nov 2024 05:46:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109281 कौटुंबिक हिंसाचार, पुरुषांवरही वाढता अत्याचार! राज्यभरातून दिवसाकाठी शंभराहून अधिक कॉल्स

International Mens Day 2024: पुरुषांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अखिल भारतीय पुरुष हक्क समितीला दररोज राज्यभरातून शंभराहून अधिक कॉल्स प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सsad man2 गायत्री जेऊघाले, नाशिक : गेल्या काही वर्षांपासून महिलांसह पुरुषांवरही होणाऱ्या कौंटुबिक हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. याबाबत पुरुषांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अखिल भारतीय पुरुष हक्क समितीला […]

The post कौटुंबिक हिंसाचार, पुरुषांवरही वाढता अत्याचार! राज्यभरातून दिवसाकाठी शंभराहून अधिक कॉल्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कौटुंबिक हिंसाचार, पुरुषांवरही वाढता अत्याचार! राज्यभरातून दिवसाकाठी शंभराहून अधिक कॉल्स

International Mens Day 2024: पुरुषांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अखिल भारतीय पुरुष हक्क समितीला दररोज राज्यभरातून शंभराहून अधिक कॉल्स प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
sad man2

गायत्री जेऊघाले, नाशिक : गेल्या काही वर्षांपासून महिलांसह पुरुषांवरही होणाऱ्या कौंटुबिक हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. याबाबत पुरुषांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अखिल भारतीय पुरुष हक्क समितीला दररोज राज्यभरातून शंभराहून अधिक कॉल्स प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुणे, मुंबई, नागपूरसारख्या मेट्रो शहरांतून सर्वाधिक तक्रारी येत आहेत.

पत्नीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपाला कंटाळून पुरुषांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटना दररोज घडत आहेत. करोना प्रादुर्भावाच्या काळात पुरुषांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे घटस्फोटाची प्रकरणेही वाढली. पुरुषांनी अत्याचाराविरोधात खटला दाखल केल्यावर न्यायालयाच्या बाहेरही प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. विवाहबाह्य संबंध, आर्थिक चणचण, नोकरीच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ, पत्नीकडून होणारा कुटुंबाचा अपप्रचार, सोशल मीडियामुळे वाढणारे गैरसमज, अशा विविध कारणांमुळे पुरुषांनाही कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. राज्यात दररोज सुमारे शंभरहून अधिक पुरुषांकडून पुरुष हक्क संरक्षण समितीकडे धाव घेतली जात आहे. राज्यात जिल्हानिहाय समितीचे कार्यालये कार्यरत आहे.

कायद्यात बदल करा…
भारतीय दंड संहिता ४९८अ नुसार स्त्रीचा मानसिक शारीरिक छळ केल्यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. तसेच कलम १२५अ फौजदारी कायद्यानुसार स्त्री पोटगीची मागणी करू शकते. मात्र, महिलांकडून होणाऱ्या छळवणुकीविरोधात ४९८ब असे कलम असावे, अशी मागणी पुरुष हक्क समितीमार्फत केली जात आहे. याचबरोबर कलम ३७६नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो; परंतु, बरेचदा महिला या कलमाचा दुरूपयोग करतानाही दिसतात. संगनमताने काही काळ राहतात आणि आर्थिक पाठबळ कमी झाले की बलात्काराचा गुन्हा दाखल करतात. अशावेळी पीडित पुरुषाला समाजात वावरणेही कठीण होते. त्यामुळे या कलमातही पुरुषांच्या अन्यायाविरोधाच्या बाबींचाही उल्लेख करावा, अशीही मागणी केली जात आहे.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
धुळ्यात डिसेंबरमध्ये अधिवेशन
राज्यातील पुरुषांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे धुळे येथे १ डिसेंबर रोजी २७वे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पुरुषांना त्यांच्या समस्या मांडता येणार असून त्यावर मंथन होणार आहे.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
…येथे करा संपर्क
पीडित पुरुषांना पुरुष हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात किंवा फोनद्वारेही संपर्क करता येणार आहे. कार्यालय सांगलीमध्ये असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातील पुरुषांना ९८२३१८७८८२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पुरुष हक्क संरक्षण समितीने केले आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दाद मागता येते, त्याचप्रमाणे पुरुषांनाही दाद मागता यावी यासाठी समितीची स्थापना केली आहे. गेल्या काही वर्षांत पुरुषांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मोबाइल आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून महिला वर्गाला वागणुकीचे चुकीचे धडे थेट मिळतात. त्यामुळे कुटुंब व्यवस्था विस्कटत आहे. कोणाचाच वचक राहिलेला नाही.- अॅड. बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, पुरुष हक्क संरक्षण समिती

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post कौटुंबिक हिंसाचार, पुरुषांवरही वाढता अत्याचार! राज्यभरातून दिवसाकाठी शंभराहून अधिक कॉल्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109281 0
Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण? https://tejpolicetimes.com/?p=102656 https://tejpolicetimes.com/?p=102656#respond Mon, 19 Aug 2024 00:53:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102656 Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ‘समन्स’ मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट निघू […]

The post Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ‘समन्स’ मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट निघू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, तक्रारीत तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला आहे.

गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम २०२’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. याची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.

.. तर दोन वर्षे तुरुंगवास

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २०० अन्वये तक्रार दाखल आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कमाल दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.
राहुल गांधी भारतीय नाहीत, सुब्रमण्यम स्वामींचा पुन्हा दावा; सुप्रीम कोर्टात याचिका
‘समन्स’ पूर्तता महत्त्वाची

या प्रकरणात राहुल गांधी यांना ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाल्यास, त्याचा अहवाल न्यायालयात येईल. त्यानंतरही राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत, तर अटकेचे वॉरंट काढले जाते. परंतु, ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाली नसेल, तर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेच्या पूर्ततेवर राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Source link

The post Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102656 0
देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… https://tejpolicetimes.com/?p=98082 https://tejpolicetimes.com/?p=98082#respond Mon, 01 Jul 2024 01:22:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=98082 देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या नव्या फौजदारी कायद्यांची नावे आहेत. त्यातील ठळक तरतुदींचा घेतलेला आढावा. भारतीय न्याय संहिता, २०२३(एकूण कलमे : ३५६) […]

The post देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या नव्या फौजदारी कायद्यांची नावे आहेत. त्यातील ठळक तरतुदींचा घेतलेला आढावा.

भारतीय न्याय संहिता, २०२३
(एकूण कलमे : ३५६)

प्रमुख बदल
– बाल या शब्दांची नेमकी व्याख्या समाविष्ट
– लिंग या संकल्पनेत पारलिंगीचा समावेश
– कागदपत्रे या संकल्पनेत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदींचाही समावेश
– महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नवे परिशिष्ट समाविष्ट
– खोट्या बातम्या प्रसृत करणे याचा गुन्ह्यांमध्ये समावेश
– आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द
– एखाद्या मुलग्याचा लैंगिक छळ करणे ही संकल्पना नव्याने समाविष्ट
– भीक मागण्यासाठी मुले पळवणे हा मानवी तस्करीचा एक भाग मानणार
– पाच हजार रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या चोरीच्या घटनांसाठी समाजसेवा ही शिक्षा
– लग्नाच्या आमिषाने, बढतीच्या आमिषाने किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा ठरणार

२० – नवे गुन्हे समाविष्ट
१९ – जुने गुन्हे रद्द
३३ – गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेच्या कालावधीत वाढ
८३ – गुन्ह्यांसाठीच्या दंडाच्या रकमेत वाढ
२३ – गुन्ह्यांसाठी किमान शिक्षेची नव्याने तरतूद
नव्या कायद्याची घोकंपट्टी; पोलिसांच्या सवयीच्या कलमांमध्ये झाले बदल, जाणून घ्या नवीन कलम
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३
(एकूण कलमे : ५३३)


प्रमुख बदल

– महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द
– सहायक सत्र न्यायाधीश हे पद रद्द
– घोषित गुन्हेगार या संकल्पनेच्या व्याप्तीत वाढ (दहा वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेत समावेश)
– स्थानबद्धतेच्या पहिल्या ४० ते ६० दिवसांच्या काळात १५ दिवस पोलिस कोठडीची मुभा आणि या कारणाने जामीन नामंजूर करता येणार नाही
– जिल्हापातळीवर विशिष्ट पोलिस अधिकारी असणार आणि प्रत्येक पोलिस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागणार
– तपासाचा आढावा ९० दिवसांत आरोपीला मिळण्याचा अधिकार
– आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासासाठी ९० दिवसांची मुदत.
– युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांत निकाल देणे बंधनकारक. काही विशिष्ट कारणांसाठी ही मुदत ६० दिवसांपर्यंत.
– परोक्ष सुनावणीची तरतूद समाविष्ट. निकाल लागेपर्यंत परोक्ष सुनावणी शक्य
– झिरो एफआयआर देशभरात लागू
– इलेक्ट्रॉनिक एफआयआर नोंदवण्याची तरतूद
– नृशंस गुन्ह्यांसाठीही बेड्या घालण्याची तरतूद वगळली

९ – नवी कलमे समाविष्ट
३९ – उपकलमे समाविष्ट
१४ – तरतुदी वगळल्या
११७ – तरतुदींमध्ये सुधारणा
३५ – ठिकाणी जलद न्यायदानासाठी प्रक्रिया निश्चित

भारतीय साक्ष अधिनियम, २०२३
(एकूण कलमे : १७०)

– कागदपत्रांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक नोंदींचाही समावेश
– पुराव्यांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक जबाबही समाविष्ट
– इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दस्तावेजांचे योग्य सादरीकरण, जतन, वैधता आदींबाबत तरतूद
– पती वा पत्नींविरोधातील खटल्यात वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार
– गुन्ह्यातील साथीदाराच्या साक्षीच्या आधारे दोषसिद्धी वैध मानली जाणार

२ – नवी कलमे समाविष्ट
६ – नवी उपकलमे समाविष्ट
२४ – तरतुदींमध्ये सुधारणा
६ – कलमे रद्द

गुन्ह्यांबाबत महत्त्वाची जुनी व नवी कलमे
गुन्हा जुने कलम नवीन कलम

हत्या ३०२ १०३ (१)
हत्येचा प्रयत्न ३०७ १०९
गंभीर दुखापत ३२६ ११८ (२)
मारहाण ३२३ ११५
धमकी ५०६ ३५१ (२)
विनयभंग ३५४ ७४
बलात्कार ३७६ (१) ६४ (१)
विवाहितेचा छळ ४९८ (अ) ८५
अपहरण ३६३ १३७(२)
चोरी ३८० ३०५ (ए)
दरोडा ३९५ ३१० (२)
फसवणूक ४२० ३१८ (४)
सरकारी कामात
अडथळा ३५३ १३२

Source link

The post देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=98082 0
नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच https://tejpolicetimes.com/?p=95691 https://tejpolicetimes.com/?p=95691#respond Fri, 07 Jun 2024 08:20:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95691 नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्या वाढत चालली आहे. अठराव्या लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल २५१ (४५ टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात गुन्हेगारी आरोप असलेल्या वा सिद्ध झालेल्या सदस्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी महिला खासदारांची संख्या मात्र ७७वरून कमी होऊन […]

The post नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्या वाढत चालली आहे. अठराव्या लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल २५१ (४५ टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात गुन्हेगारी आरोप असलेल्या वा सिद्ध झालेल्या सदस्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी महिला खासदारांची संख्या मात्र ७७वरून कमी होऊन ७४वर (१४ टक्के) आली आहे.‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रीफॉर्म्स’ (एडीआर) या निवडणूक विश्लेषण संस्थेने ही माहिती दिली आहे. नवनिर्वाचित १४ टक्के महिला खासदारांमध्ये भाजपच्या सर्वाधिक ३१, काँग्रेस १३, तृणमूल काँग्रेस ११, समाजवादी पक्ष ५, लोकजनशक्ती (रामविलास) २ आणि इतर पक्षांच्या खासदार आहेत. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ५३९पैकी ७७ खासदार महिला होत्या. सन २०१९मध्ये निवडून आलेल्या २३३ खासदारांवर (४३ टक्के) गुन्हे दाखल होते. त्या आधीच्या लोकसभेत ही संख्या १८५ (३४ टक्के), सन २००९मध्ये १६२ (३० टक्के) होती. सन २००४मध्ये १२५ (२३ टक्के) खासदारांवर गुन्हे दाखल होते. या विश्लेषणानुसार, सन २००९पासून गुन्हेगारी खटले असलेल्या खासदारांच्या संख्येत तब्बल ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा २५१ कलंकितांपैकी १७१ (३१ टक्के) खासदारांवर बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सन २००९पासून गंभीर गुन्ह्यांची शिक्षा असलेल्या संसद सदस्यांची संख्या १२४ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा चार उमेदवारांवर भारतीय दंड संहितेचे (आयपीसी) कलम ३०२ म्हणजे थेट हत्येचा गुन्हा असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. १५ नवनिर्वाचित खासदारांवर बलात्कार व महिलांवरील गुन्ह्यांचे खटले (कलम ३७६) दाखल आहेत.
नव्या संसदेत बसणार साक्षात धनकुबेर; ९३ टक्के खासदार कोट्यधीश, जाणून घ्या टॉप-३मध्ये कोण?
या १८व्या लोकसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवणाऱ्या भाजपच्या २४० विजयवीरांपैकी सर्वाधिक ९४ (३९ टक्के) उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या ९९ विजयी उमेदवारांपैकी ४९, सपच्या ३७पैकी २१, तृणमूल काँग्रेसच्या २९पैकी १३, द्रमुक २२पैकी १३ (५९ टक्के) तेलुगू देसम १६पैकी आठ आणि शिवसेनेच्या सातपैकी पाच (७१ टक्के) विजयी उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

श्रीमतांमध्ये तेलुगू देसमचा खासदार अव्वल स्थानी

पहिल्या तीन श्रीमंत उमेदवारांमध्ये तेलुगू देसमचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी ५,७०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर तेलंगणचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी (भाजप) आहेत. त्यांच्याकडे ४,५६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि तिसऱ्या स्थानावरील भाजपचे नवीन जिंदाल (हरयाणा) यांच्याकडे १,२४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त माया आहे. पहिल्या १० श्रीमंत खासदारांत भाजपचे पाच, टीडीपीचे तीन आणि काँग्रेसचे दोन आहेत. ही माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील असून इतर संपत्तीचा समावेश अहवालात करण्यात आलेला नाही.

Source link

The post नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95691 0