Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Haldi Upay : सतत पैशांची चणचण भासते? वैवाहिक जीवनात तंटा,ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे हे उपाय करुन पाहा

7

Haldi Remedies : हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते. हळद घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. त्यामुळे हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो. हळद अनेक रंगात येत असल्याने तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो. हळदी ही पिवळ्या, काळ्या आणि केशरी रंगात आपल्याला पाहायला मिळते. पिवळ्या हळदीचा गुरु ग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी आणि काळा हळदीचा शनिशी संबंध येतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Haldi Remedies For Marriage :

जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात हळदीचा वापर केला जातो. हळद जितकी जेवणात वापरली जाते तितकेच महत्त्व त्याला पूजेत देण्यात आले आहे. हळदीमुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते. हळद घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. त्यामुळे हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो. हळद अनेक रंगात येत असल्याने तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो. हळदी ही पिवळ्या, काळ्या आणि केशरी रंगात आपल्याला पाहायला मिळते. पिवळ्या हळदीचा गुरु ग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी आणि काळा हळदीचा शनिशी संबंध येतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

जर करिअरमध्ये प्रगती थांबत असेल? सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा आरोग्याच्या संबंधित समस्या निर्माण होत असतील तर हळदी संबंधित काही उपाय केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे हे उपाय करुन पाहा

जर तुमच्या कुंडलीतील गुरु नकारात्मक किंवा कमजोर असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात पिवळ्या धाग्यात हळद घालावी. तसेच चिमूटभर हळद बादलीत टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. असे केल्याने गुरुदोषापासून सुटका होते. जीवनातील अनेक संकटे दूर होतात.

तुमच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनात वाद होत असतील तर पाण्यात हळद मिसळून रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. यामुळे तुम्हाला संवाद नीट साधता येतील. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळावर हळदीचा टिळा लावावा. पैसे वाचवण्यासाठी २ हळकुंड तिजोरीत ठेवा.

असे म्हटले जाते की, भगवान विष्णूला हळदी अतिशय प्रिय आहे. गुरुवारी हळदी दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच लक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावर राहाते. असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

झोपेत तुम्हाला वाईट किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर हळदीचा तुकडा उशीजवळ ठेवावा असे केल्याने वाईट स्वप्ने पडत नाही.

अनेक प्रयत्न करुनही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील तर दर गुरुवारी हळदीच्या गाठींचा हार श्रीगणेशाला अर्पण करा. असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात. तसेच व्यवसाय देखील सुरळीत सुरु होतो.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.