Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठा बटालियनचा लढाऊ शिपाई अन् गनमास्टर अशी ओळख, रायगडचा सुपुत्र कारगिल युद्धात शहीद, जवानाची प्रेरणादायी कहाणी…

9

अमुलकुमार जैन, रायगड: छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील छोट्याशा सहाणगोठीचा गावातील २३ वर्षीय जवान निलेश तुणतुणे हा भारत भूमीची रक्षा करत असताना शत्रुच्या हल्ल्यात शहीद झाला. अलिबाग तालुक्याचे नाव देशात गेले. शहीद निलेश तुणतुणे याचा ६ फेब्रुवारी १९७५ साली अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा या राज्य महामार्गालगत असणाऱ्या सहाणगोठी या गावात निर्मला नारायण तुणतुणे या वीरमातेच्या पोटी जन्म झाला.मिळालेल्या माहितीनुसार, निलेश याचे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले. पुढील अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजमध्ये झाले. निलेश हा बालपणापासून कबड्डी सारख्या मैदानी खेळात निलेश निपुण होता. जे एस एम कॉलेजमध्ये असताना त्यांनी एन सी सी मध्ये असताना देशसेवा करण्याचे ध्येय बाळगून त्यांनी अलिबाग येथे होणारी लष्कर भरती कडे वळला. अशाच अलिबागमध्ये झालेल्या भरतीमध्ये तो लष्करातील शिपाई पदासाठी निवड झाली. त्याची रवानगी सैनिकी प्रशिक्षण साठी हैद्राबाद येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली.

प्रशिक्षण पूर्ण झाले आणि तो मराठा बटालियन तुकडीचा तगडा लढाऊ शिपाई म्हणून देशसेवेस सज्ज झाला. लहान पणापासूनच खिलाडुवृत्ती, नेतृत्वगुण त्याच्या अंगी कबड्डीच्या मैदानातच भिनले होते. या नेतृत्व गुणाची पारख कडक शिस्तीतील लष्करी अधिकाऱ्यांना झाल्याशिवाय राहिली नाही. त्याचे नेतृत्वगुण उफाळून आले. कृतीतून व्यक्त झाले. म्हणूनच त्याचे कौशल्य आणि कामगिरी पाहुन एका तुकडीची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. त्याच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वगुणांचा गौरव लष्कराने केला. तो उत्कृष्ट नेमबाज म्हणून लष्करात नाव कमावले होते.
Rescue Operation: अलिबाग समुद्रात सुटकेचा थरार, सोसाट्याचा वारा अन् जहाज फुटले; तब्बल २१ तासांनी झाली १४ खलाशांची सुटकाएका बाजूला भारत पाकिस्तान मैत्री करावयाचे राजकारणी चित्र पाकिस्तानने उभे केले. दुसऱ्या बाजूला भारताच्या पवित्र भूमिचा इंच इंच भाग बळकाविण्याचा कट कारस्थाने पाकिस्तानने रचले होते. भारतात पाकिस्तानने अतिरिकी कारवाया सुरु केल्या. पण भारतीय फौजानी वेळोवेळी या कारवायांनी ठेचून टाकले. निलेश तूणतूणे हा उत्कृष्ट नेमबाज जवान होता. आपल्या बंदुकीने घेतलेल्या वेधावर त्याचा गाडा विश्वास होता. म्हणूनच त्याला गनमास्टर म्हणून सगळे ओळखत होते.

हिवाळ्यात भारतीय सैन्य आपल्या चौक्या सोडून खाली उतरलं होतं. नेमका याच संधीचा फायदा घ्यायचा आणि भारतीय चौक्यावर ताबा मिळवायचा असा शकुनी प्रयत्न पाकिस्तान सेना प्रमुख जनरल मुशर्रफ यांनी चालवला. त्यासाठी ठिकाण निवडल गेल कारगील. एकदा का कारगिल ताब्यात आलं की राष्ट्रीय महामार्ग १ अ तोफांच्या टप्प्यात येणार होता. तोफांच्या टप्प्यात येणारा मार्ग म्हणजे भारतीय सेनेची रसद तोडण्याचा प्रभावी मार्ग हा अतिशय भयंकर डाव नवाज शरीफ अन मुशर्र्फ यांनी आखला होता. या कारवाईला “ऑपरेशन बद्र” असे नाव देण्यात आले.
१ ऑगस्ट १९९८ रोजी भारतीय सीमेरषेजवळ श्रीनगर बारमुल्ला येथे आपल्या तुकडीसह गनमास्टर निलेश हे गस्त घालत होते. पाकिस्तानी घुसखोरीच्या हालचालीवर त्यांच्या तुकडीचे बारीक लक्ष्य होते. अगोदर शांत असलेला परिसर ज्वालनच्या आगडोबांनी उजळून गेला. अतिरेक्यांनी तोफांचा भडिमार अचानक सुरु केला. गनमास्टर निलेश तुणतूणे त्याचे प्रतिउत्तर तितक्याच् जोमाने देऊ लागले. तोफांचा भडिमार प्रचंड सुरु होता. त्यातच प्राणपणाने लढत असलेल्या निलेश तूणतूणे यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
“जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले”. सहाणगोठीचा हा पराक्रमी पुत्र वयाच्या २३ व्या वर्षी देशासाठी शहीद झाला. अलिबागच्या या रणसम्राट भूमीपुत्राने अखेरची चिरनिद्रा घेतली ती भारतमातेच्या कुशीतच. अलिबागजवळच साधारण दहा किलोमीटर अलिबाग रोहा राज्य महामार्गावर सहाणगोठी हे लहानसे गाव आहे. या गावाची ओळख म्हणजे येथील निलेश तुणतुणे यांचे स्मारक! मुख्य रस्त्यावर हाताच्या उजवीकडे दिसणारे हे स्मारक म्हणजे अलिबागमधील एका वीरपुरुषाच्या धैर्याची साक्ष देणार ठिकाण! येथे पत्र्याच्या छताखाली भारतीय सैन्याच्या गणवेशात निलेश यांचा अर्धपुतळा सिमेंटच्या चौथऱ्यावर उभा दिसतो.

मागील भिंतीवर निलेश यांच्या आयुष्यातील काही क्षणांचे फोटो लावलेले आहेत. त्यांच्याबद्दल एक लहानसा लेखही लिहिलेला आहे. काल त्यांचा स्मृतिदिन येथे साधेपणाने साजरा केला गेला. पोलिसांतर्फे निलेश तुणतुणे यांना मानवंदना देण्यात आली. दर वर्षी येथे हा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या गावात निलेश यांचे आई-वडील २ भाऊ आणि बहीण राहतात. अलिबाग रोहा रस्त्यावर सहाणगोठी येथे निलेश तुणतुणे यांचे स्मारक उभे आहे. त्याच्या स्मारकासमोर तेवणारी ज्योत रस्त्यावरुण जाणाऱ्या येणाऱ्याला निलेशच्या पराक्रमाने पुलकित करीत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.