Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune News: एकविरा देवी पायथा मंदिर ते कार्ला मळवली रस्ता बंद, ‘या’ पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश
मौजे कार्ला गावातून मळवली-भाजे गावाकडे जाण्यासाठी आणि मौजे मळवली-सदापुरमार्गे वाकसाई फाटा अशी सर्व प्रकारची सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन ती मौजे कार्ला- वाकसाई फाटा- सदापुर मार्ग मळवली व भाजेगावाकडे वळविण्यात येईल. मौजे कुसगांव-औंढे-मळवली येथे पर्यटनासाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करुन मळवली-औंढे-कुसगांव अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. मौजे भाजे येथील धबधबा आणि मळवली येथे पर्यटकांच्या चारचाकी वाहनांसाठी जुन्या महामार्गाने मौजे वाकसाई फाटा- सदापूर-मळवली-भाजे या पर्यायी मार्गाचा वापर करावा.मौजे पाथरगांव – बोरज – मळवली गावाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक करावी. मौजे मळवली येथील वाहने देवले मार्गे पुणे – मुंबई द्रुतगती मार्गे आणि मळवली -औंढे – कुसगांव-लोणावळा जुन्या महामार्गानी पर्यटकांची चारचाकी वाहने येतील. मौजे भाते ते लोहगडकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे लोहगड येथून पुणे – मुंबईकडे जाणारी चारचाकी वाहने लोहगड – दुधिवरे खिंड – औंढोली – औंढे यामार्गे पुणे मुंबई व मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जातील किंवा लोहगड -दुधिवरे खिंड – पवनानगर या मार्गे नवीन पुणे – मुंबई व मुंबई – पुणे या मार्गाचा वापर करावा.
तसेच लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दुचाकी व तिनचाकी वाहने लोहगड – दुधिवरे खिंड – औंढोली – औंढ- औंढे ब्रिजवरुन कुसगांव – लोणावळा येथून जुना मुंबई – पुणे या मार्गाचा वापर करतील. सदर कालावधीत जुना पुणे – मुंबई महामार्गावर कार्ला फाटा ते वेहेरगांव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.