Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिव्यांग असूनही प्रमाणपत्रापासून वंचित, बीडच्या तरुणावर चहा विकण्याची वेळ

11

दिपक जाधव, बीड : एकीकडे आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण दिव्यांगांच्या प्रमाणपत्रामुळे गाजत असताना दुसरीकडे मात्र दिव्यांग असतानाही बीडच्या एका युवकाला दिव्यांगाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याला त्याच्या हक्काचे दिव्यांग प्रमाणपत्र कधी भेटणार याची तो वाट पाहत आहे. बीडच्या परळीतील वीरभद्र गड्डे नावाच्या मुलाला पाच वर्षाचा असताना उजव्या डोळ्याला काटा लागला होता. यामुळे त्याचा उजवा डोळा पूर्ण निकामी झाला. मात्र, आई-वडिलांनी त्यावर उपचार करून कमीत कमी तो डोळा म्हणून तरी दिसावा यासाठी प्रयत्न केले. तो डोळा राहिला मात्र उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली.यानंतर वीरभद्रने आपल्या डाव्या डोळ्याच्या आधारेच आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला दिव्यांगाचे प्रमाणपत्र भेटावे याकरता भरपूर प्रयत्न केले. अंबाजोगाई, बीड रुग्णालयात खेटेही मारले. मात्र उजवा डोळा पूर्ण रिकामी होऊनही लेस डिसॅबिलिटी असा शेरा देत त्याचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नाकारण्यात आले.
Ajit Pawar: जागावाटप लवकर करा! अजित पवार सर्वाधिक आग्रही; दादांना नेमकी कोणती काळजी?

आता अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही पदवी असलेला वीरभद्र आपल्या वडिलांना त्यांच्या चहाच्या टपरीवर मदत करतो आणि आपली उपजिविका भागवतो. एकीकडे IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे गाजत असताना दुसरीकडे राज्यात आणखी किती वीरभद्र परिस्थितीशी झुंज देत आहेत, हे बघितले पाहिजे.

तीन एकर क्षेत्रात विविध पिकांची लागवड

विजया गंगाधर घुले असं महिला शेतकऱ्याचे नाव असून त्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवाशी आहेत. विजया घुले यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत योग्य मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सुरवातीला विजया घुले यांनी अर्धा एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर कालांतराने खजूर आणि सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. विजया यांनी खजूरची 80 झाडे तर सफरचंदचे 240 झाडे लावलेले आहेत. म्हणजे एकूण तीन एकर क्षेत्र हे मिश्र पिकासाठी गुंतवले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या तिनही पिकांमधून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.