Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
The Fire God of the Hindus : असे मानले जाते की अग्नितत्वात जी कोणतीही वस्तू टाकली जाते ती पवित्र आणि शुद्ध होते. म्हणूनच यज्ञात अग्नीचा वापर केला जातो आणि सीतेची परीक्षा घेण्यासाठीही अग्नीचा वापर झाला होता. पण अग्नी इतका महत्त्वाचा का आहे? पुरणांमध्ये अग्नीची देवता, अग्निदेवाबद्दल बऱ्याच गोष्टी आहे. त्यातून आपल्याला समजून येते की अग्नीला इतके पवित्र का मानले गेले आहे. चला तर मागून जाणून घेऊ.
Sita Agnipariksha :
पुराणांमध्ये अग्निदेवाची व्याख्या दिलेली आहे. अग्निदेवाचे शरीर लाल रंगाचे आहे, अग्निदेवाला ३ पाय, ७ हात, ७ जीभ, सोनेरी दात आणि दोन चेहरे, काळे डोळे आणि काळे केस आहे. अग्नीचे स्वरूप असे आहे याचे कारण म्हणजे ही देवता विनाश आणि पावित्र्य या दोन्हींशी संबंधित आहे. या देवतेचे वाहन मेंढा आहे. काही ठिकाणी अग्निदेव रथात बसून मार्गक्रमण करत आहे आणि त्यांचा रथ मेंढा आणि पोपट ओढत आहेत असे दाखवलेले आहे. तसे पाहिले तर अग्निशिवाय जीवन शक्य नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपणाला अग्नीची गरज भासत असते. पण अग्नीत टाकलेल्या वस्तू पवित्र का होतात, याचे उत्तर आपल्याला पुराणात मिळते.
1. सीतेचे पावित्र्य अग्निपरीक्षेने का ठरवण्यात आले?
एका पौराणिक कथेनुसार महर्षि भृगू यांची पत्नी पौलोमी हिने आधी पुलोमन नावाच्या राक्षसासोबत विवाह केला होता. त्यामुळे ऋषी भृगू आणि पुलोमन यांच्या पत्नीवरून वाद झाला. त्यानंतर ऋषी भृगू यांनी अग्निदेवाला प्रश्न विचारला की पौलोमी कोणाची पत्नी आहे. यावर अग्निदेवाने पुलोमन याचे नाव घेतले. नाराज झालेल्या ऋषी भृगू यांनी अग्निदेवाला शाप दिला की, तू सर्व गोष्टींचे भक्षण करतील, त्यामुळे तुला विनाशकारी आणि अशुभ समजले जाईल. या शापामुळे अग्निदेव नाराज झाले आणि त्यांनी यज्ञातील हविष्य ग्रहण करणे बंद केले, त्यातून अराजकता निर्माण झाली. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी ब्रह्माने अग्निदेवाला वरदाने दिले की जठराग्नी व्यतिरिक्त ते जे काही भक्षण करतील किंवा त्यांच्यात जे काही घातलं जाईल, त्याला पवित्र मानले जाईल. म्हणून सीतेने अग्निपरीक्षा देत स्वतःला पवित्र सिद्ध केले होते.
2. यज्ञात अग्नीला इतके महत्त्व का?
प्रश्न असा निर्माण होतो की अग्नीला यज्ञात इतके महत्त्व का आहे? हरिवंश पुराणानुसार एकदा असुरांनी देवांचा पराभव केला. त्यावर क्रोधित झालेल्या अग्निदेवाने असुरांचा विनाश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मय आणि शम्बरासुर या दोन असुरांनी त्यांच्या शक्तीने पावसाची निर्मिती केली, त्यामुळे अग्नी क्षीण पडू लागला. त्यानंतर देवगुरू बृहस्पतींनी अग्नीला सदैव तेजस्वी राहाण्याचा आशीर्वाद दिला.
3. अग्निसंदर्भात पौराणिक कथा
ब्रह्मपुराणानुसार एकदा अग्निदेवाचा मोठा भाऊ जातवेदस याची हत्या मधू नावाच्या एका दैत्याने केली. त्यानंतर दुःखी झालेले अग्निदेव स्वर्ग सोडून पाण्यात जाऊन बसले. यामुळे स्वर्गावर मोठे संकट आले. अग्निदेवाची मनधरणी करण्यासाठी इंद्रदेव स्वतः गेले. त्यावर अग्निदेवाने दैत्यांपासून रक्षणासाठी शक्ती हवी अशी मागणी केली. तेव्हा इंद्र आणि इतर देवतांनी अग्नीला यज्ञाचा प्रथम आणि महत्त्वाचा भाग होण्याची शक्ती दिली. या सर्व कारणांमुळेच अग्नि पवित्र आहे.