Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनधिकृत रिसॉर्टवर महापालिकेचा हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरू

9

ठाणे : शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र आणि ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य आणि ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचे रविवारी सायंकाळी विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरे यांचा मृत्यू रिसॉर्टवरील कर्मचार्‍यांशी झालेल्या वादानंतर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने रिसॉर्टवर हातोडा चालवण्यास सुरवात केली आहे.
Atal Setu News : अटल सेतूवर कार थांबवली, गाडीतून उतरला, आजूबाजूला कुठेही न पाहता थेट समुद्रात उडी; तरुणाने आयुष्य संपवलं

अनधिकृत रिसॉर्टवर महानगरपालिकेचा हातोडा

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचजवळ असलेल्या अनधिकृत सेवन सी बीच रिसॉर्टवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्नाळा बीच परिसरातील सर्व अनधिकृतपणे रिसॉर्ट पाडण्याचे, जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेकडून तातडीने रिसॉर्ट पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Mumbai News : घोडबंदरची कोंडी सुटणार, गायमुख ते भाईंदरपर्यंत सुस्साट, MMRDA च्या योजनेला मंजुरी; जाणून घ्या कसा असेल मार्ग?

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचं रविवारी निधन झालं. ते रविवारी आपल्या कुटुंबासोसबत अर्नाळा बीचवरील सेवन सी बीच रिसॉर्ट येथे आले होते. त्यावेळी तिथे त्यांचा स्थानिक नागरिकांशी वाद झाला. या वादानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली होती. दुखापतीनंतर त्यांना रविवारीच हृदरविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं.
Thane Woman Reached Pakistan : ठाण्यातून पाकिस्तानला पोहोचली, नंतर मुंबईत; पुन्हा तिथे जायला निघाली आणि…
मिलिंद मोरे यांच्या निधनाची बातमी संपूर्ण ठाण्यात पसरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जात मिलिंद मोरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. रविवारी रिसॉर्टवर नेमकं काय झालं? याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना मिलिंद मोरे यांच्या कुटुंबियांकडून समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत अर्नाळा बीचजवळील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे आदेश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार महानगरपालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली.

दरम्यान, या भागातील स्थानिकांनी याआधी अनेकदा अनधिकृत असलेल्या रिसॉर्टविरोधात तक्रार करुन ती बंद करण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाईचे आदेश देत अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.