Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पीडितेच्या वडिलांमुळे आरोपीची पाच वर्ष जुनी कुंडली उघड

12

नवी मुंबई : नवी मुंबईतून समोर आलेल्या यशश्री शिंदे खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पीडितेचा प्रियकर असलेल्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर ही हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे लोकांना श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणाची आठवण झाली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली २२ वर्षीय तरुणी शनिवारी नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपात आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. यशश्रीवर अनेक वेळा वार केल्याचे पोलिसांना आढळून आले. या घटनेतील मुख्य आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे.

दाऊद शेखची पाच वर्ष जुनी कुंडली उघड

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या वडिलांनी २०१९ मध्ये दाऊद शेख नावाच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी शेखवर यशश्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तरुणी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी कलम ३५४, ५०६, बाल संरक्षण कायदा २०१२च्या कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Uran Murder Case: सहा पथकं, सीसीटीव्ही फुटेज अन् एक टीप, असा पकडला गेला तरुणीला निर्घृणपणे संपवणारा दाऊद शेख

कुत्र्याने मृताचा चेहरा खाल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटायला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक अहवालात अशी काही गोष्ट समोर आली ते ऐकून सारेच हादरले. मृताचा चेहरा विद्रूप झाला होता. कारण भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाला फाडून टाकले होते. यशश्रीचे शिंदेचे कॉल रेकॉर्ड तपासले असता ती कर्नाटकातील दाऊद शेखच्या बऱ्याच दिवसांपासून संपर्कात असल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर पोलिसांना शिंदेच्या अंगावर ‘दाऊद’ नावाचा टॅटूही सापडला आहे.

यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री आणि दाऊद शेख हे २०१९ पासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरुणीचे या गोष्टीवर नाराज होते. नंतर शेख कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी स्थलांतरित झाला. त्यानंतर आता शेख नुकताच उरणला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्या भेटीमागील कारण शोधले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी लोकांना या प्रकरणाकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही मृतदेहाचे छिन्नविछिन्न असल्याचा दावा फेटाळून लावला. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह उरण परवेल महामार्गालगतच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेकदा वार करण्यात आले असून तिचे हात पायही तुटल्याचे समोर आले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.