Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील एका श्री समर्थ कृपा महिला स्वयंसहायता समूह गटाच्या माध्यमातून कोकम फळापासूनचे प्रोडक्शन बनवलं केलं जातंय. यामध्ये कोकम फळापासून साधारण सहा ते सात वेळा प्रोसेसिंग करुन कोकमचे आगळे वेगळे प्रोडक्शन बनवलं जातं आहे. याच प्रोडक्शन हाऊस मध्ये जवळपास सात ते दहा महिला काम करत असून त्यांचा उदरनिर्वाह देखील याच कोकम फळापासून बनवल्या गेलेल्या विविध प्रोडक्शन पासून मिळत असलेल्या उत्पन्नातून चालत आहे. कोकम फळापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या प्रोडक्शनला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील राज्यातून मोठी मागणी आहे यामध्ये गुजरात राज्याचा सुद्धा समावेश आहे. महिलांनी बनवलेल्या प्रोडक्शनची चर्चा महाराष्ट्रात सुद्धा जोरदार आहे.
कोरोनात घडी विस्कटली, महिलांनी पदर खोचला, व्यवसायात पाय रोयला!
कोकम प्रोडक्शन बनविण्यामागचं वास्तव असे की, बचत गट सुरू करण्याआधी पूर्वी याच ठिकाणी ‘जागृती पोटके’ यांच्या भावाच्या मुलाने कोकणात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या फळांची फॅक्टरी उभी केली होती, फॅक्टरी त्याचे आई-वडील सांभाळायचे. काही काळानंतर महाराष्ट्रामध्ये कोरोनाची महामारी आली आणि संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. दुर्दैवाने कोरोनाच्या महामारीमध्ये फॅक्टरी सुरू केलेल्या मुलाचे आई-वडील २०२० च्या कोरोनाच्या विळख्यामध्ये सापडले आणि दुर्दैवाने दोघांचे निधन झाले त्यानंतर फॅक्टरी कशी सांभाळायची असा प्रश्न मृत पावलेल्या आई-वडिलांच्या मुलासमोर उभा राहिला. फॅक्टरीमध्ये दहा ते पंधरा महिला काम करत होत्या, त्यांचा उदरनिर्वाह याच फॅक्टरीच्या आधारावरती चालत होता. तसेच मार्केट देखील महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभे केले होते.
दरम्यानच्या काळात फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय मुलाने घेतला. त्याचवेळी फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या महिलांनी एक दिवस फॅक्टरी चालवण्याचा निर्णय घेतला. फॅक्टरी बंद करू नका आम्हाला चालवायला दे अशी विनंती जागृती पोटके यांनी आपल्या भाचाकडे केली. काम करणाऱ्या सात ते दहा महिलांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून कोकम फळापासून प्रोडक्शन बनवण्याचा निर्णय घेतला. कोकम फळापासून विविध प्रकारचे प्रोडक्शन बनवायला बनवायला सुरुवात केली.
जागृती पोटके यांनी माहिती दिली, सुरुवातीच्या काळामध्ये कोकणातच पिकत असलेल्या शेतकऱ्यांकडून १५ टन कोकम फळ विकत घेतले. प्रति किलो ३० रुपये दराने कोकम फळ विकत घेतले त्यातून आम्हाला ३५ टक्के आगळ, ३५ टक्के कोकम सोल,३० टक्के बिया मिळाल्या होत्या. आम्ही काम चालू केले,चार महिन्यांमध्ये कोकम सोल सुकून भाचाकडे सुरुवातीपासून असलेल्या ग्राहकांना उत्पादन देण्यास सुरुवात केली.
कोकमातून अनेक उत्पादनांची निर्मिती
कोकणात मुबलक उत्पन्न देणारं हे कोकम फळ आहे त्याच फळाचा उपयोग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केला. मालवण, कुडाळ, वेंगुर्ले या भागातून हे कोकम फळ आम्ही खरेदी करतो ज्या पद्धतीने मार्केटमध्ये दर असतो त्याचप्रमाणे आम्ही ३० रुपये किलो दराने विकत घेतो जवळपास १५ ते २० टन कोकम फळ हे (रतांबे) विकत घेतो. कोकम फळावर प्रोसेसिंग करण्यासाठी सुरुवातीला कोकम फळ फोडावे लागते त्यामधून आगळ ,बिया वेगवेगळ्या केल्या जातात. याच कोकम फळापासून आम्ही जवळपास सहा ते सात प्रकारची उत्पादन बनवली. यामध्ये कोकम आगळ, कोकम सरबत, कोकम तेल,कोकम सोल,आणि कोकम बियांपासून तेल बनवतो आणि त्यातून कोकम बटर बनवले जाते आणि कोकम तेल काढल्यानंतर त्यातून चुन निघतो त्यातून आम्ही पेंड बनवली जाते. शेतामध्ये वापरण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती 33 टन इतकी केली आहे. हीच खते फळबागांसाठी आणि ऊस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.
उत्पादनाला अर्थसाहय्य कसे मिळाले..
हा व्यवसाय बचत गटामार्फत सुरू करण्यासाठी अर्थसाह्य हे तिथल्या लोकल बँकेकडून घेतल्याचं महिला सांगत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दोन लाखाचं बँकेकडून अर्थसहाय्य घेतलं त्यानंतर कच्चा माल घेण्यासाठी प्रधानमंत्री सूष्म अन्न योजनेअंतर्गत आम्ही चार लाखाचं कर्ज घेतलं. कोकम फळापासून बनवलेले हे प्रोडक्शन आम्ही मुंबई ,पुणे आणि गुजरात मध्ये पाठवलं जातं. कोकम फळापासून बनवलेले कोकम सोल हे दोनशे रुपये किलो प्रतिदराने तर कोकम बटर दोनशे चाळीस रुपये प्रति दराने आणि कोकम आगळ हा शंभर रुपये प्रति लिटर दराने मार्केटमध्ये विकला जातो आणि त्याचप्रमाणे कोकम सरबत देखील दोनशे दहा रुपये दराने मार्केटमध्ये विकत असतो.
कोकम प्रोडक्शनला लागणारे कोकमपळे जिल्हा बाहेरून घेत नसून जिल्ह्यामधील असलेल्या शेतकऱ्यांकडूनच घेतो त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याच पद्धतीने दर आहेत त्याच दराने आम्ही विकत घेतो. प्रोसेसिंग करून प्रॉडक्ट बनवत असतो. जवळपास वर्षाला १५ ते २० टन एवढा कोकम फळ लागतो. जशी ग्राहकांची मागणी असेल तसे कोकमवर प्रोसेस करून मार्केटमध्ये माल पाठवतो. यातून जवळपास एक कोटी ते सव्वा कोटी पर्यंत उलाढाल होत असल्याचा दावा महिलांनी केला आहे.