Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 5 to 11 August 2024 : वृषभसह ४ राशींना प्रेमात ग्रीन सिग्नल! जोडीदारावर विश्वास ठेवा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

11

Weekly Love Horoscope 5 to 11 August 2024 :ऑगस्ट महिन्याचा हा आठवडा श्रावण मासाची सुरुवात करणार आहे. त्यामुळे भगवान शंकर आणि पार्वतीचा आशीर्वाद सर्व राशींवर राहिल. अनेक ग्रहांचा संयोगाने गजकेसरी योग तयार होत आहे. जाणून घेऊया मेष ते मीन पर्यंतच्या १२ राशींचे प्रेम राशीभविष्य सविस्तर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 5 to 11 August 2024 : वृषभसह ४ राशींना प्रेमात ग्रीन सिग्नल! जोडीदारावर विश्वास ठेवा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?
Saptahik Love Rashifal 5 to 11 August 2024 :
ऑगस्ट महिन्याचा हा आठवडा श्रावण मासाची सुरुवात करणार आहे. त्यामुळे भगवान शंकर आणि पार्वतीचा आशीर्वाद सर्व राशींवर राहिल. अनेक ग्रहांचा संयोगाने गजकेसरी योग तयार होत आहे. या काळात शिवाची उपासना केल्याने नाते संबंध दृढ होतील. प्रेम जीवन उत्साही असेल. सुंदर भविष्यासाठी नियोजनाच्या मूडमध्ये असाल. आर्थिक नियोजन कराल. प्रेमसंबंधात स्थिरता जाणवेल. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नात्यात स्थिरता

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंद आणि समृद्धीचा असणार आहे. कुटुंब आणि जोडीदारासोबत तुम्ही आनंदी जीवन जगाल. प्रेम जीवन उत्साही असेल. सुंदर भविष्यासाठी नियोजनाच्या मूडमध्ये असाल. आर्थिक नियोजन कराल. प्रेमसंबंधात स्थिरता जाणवेल.

वृषभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – प्रेम जीवनात सुखद अनुभव

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. जोडीदारासोबत आयुष्याच्या नवीन टप्प्यात जाण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात प्रेमसंबंधात आनंदी राहाल. प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. प्रेमसंबंधात काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल.

मिथुन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – जोडीदाराचे सहकार्य मिळेल

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असेल. प्रेम जीवनात आनंदाचे दार ठोठावेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात जोडीदारासोबत सुंदर ठिकाणी जाण्याचा निर्णय घ्याल. प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल.

कर्क साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नातेसंबंधात संयम बाळगा

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा परस्पर प्रेमाने भरलेला असेल. प्रेमसंबंधांमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण अनुभवाल. नातेसंबंधात संयम बाळगा.

सिंह साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – तणाव वाढेल

सिंह राशीच्या लोकांच्या प्रेमसंबधांमध्ये सुखद योगायोग घडतील. एकमेकांशी वाद घातल्याने तणाव वाढू शकतो. एकमेकांचे संयमाने ऐकणे फायदेशीर ठरेल. एकमेकांचा आदर करा. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका.

कन्या साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – प्रेम जीवनात अस्वस्थता

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधांमध्ये सुख-समृद्धी येईल. आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. प्रेम जीवनात अस्वस्थता जाणवेल. गोष्टी सुधरवण्यासाठी जोडीदारासोबत वेळ घालवाल.

तुळ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नात्यात दूरावा

तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत आव्हानांनी भरलेला असेल. मोठ्याच्या चुकांमुळे परस्पर मतभेद होतील. वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल. त्यामुळे नात्यात दूरावा येईल. आठवड्याच्या शेवटी नाते स्थिर करण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नाते बिघडेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधांच्या बाबतीत हा आठवडा तणावपूर्ण असेल. प्रेमसंबंधात वाईट बातम्या मिळतील ज्यामुळे परस्पर मतभेद वाढतील. कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मनात शंका येईल. तुमच्या पार्टनरला त्रास होऊन नाते बिघडू शकते.

धनु साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

प्रेमसंबंधांच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांनी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ नका. दुसऱ्याचा हस्तक्षेप तुमच्यासाठी त्रास देऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. शांतपणे एकांतात वेळ घालवण्यास प्राधान्य द्याल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत सुखद योगायोग घडतील.

मकर साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नाते मजबूत होईल

मकर राशीच्या लोकांनी प्रेम संबंधांच्या बाबतीत थोडा संयम बाळगावा. कोणाच्याही बोलण्याकडे जास्त लक्ष न देता प्रेमावर विश्वास ठेवा. प्रेमसंबंधातील गोष्टी संवादाने सोडवा. प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. प्रेम मजबूत होईल. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.

कुंभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – प्रेमसंबंधात नाते दृढ होईल.

कुंभ राशीच्या लोकांनी बाहेरील व्यक्तीवर नात्यात विश्वास ठेवू नका. कुटुंबातील सदस्यांशी नाते सुधारेल. नात्यासाठी हा काळ चांगला राहिल. प्रेमसंबंधात प्रेम दृढ होईल. आयुष्यात आनंददायी वेळ घालवाल.

मीन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – नात्यात अडचणी येतील

मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात नात्यात संवाद साधा. प्रेमसंबंधातील मुद्दे संवादाने सोडवले तर चांगले परिणाम मिळतील. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ शकतो. अफवांमुळे नात्यात अडचणी येतील. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहिल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.