Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nashik Pune Highway: नाशिक फाटा-खेड कॉरिडोरला ग्रीन सिग्नल; केंद्राकडून कोटींचा निधी मंजुरी, असा आहे प्रकल्प

11

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड (राजगुरूनगर) या दरम्यानच्या ३० किलोमीटरच्या उन्नत मार्गासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा, या तत्त्वावर या आठ पदरी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या मार्गामुळे पुणे ते खेड या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रस्त्यासह आणखी काही महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांला मान्यता देण्यात आली. नाशिक फाटा ते खेड या महामार्गाची कल्पना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती.

सध्या नाशिक फाटा ते खेड या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते. चाकण परिसरातील औद्योगिक कंपन्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. या ठिकाणी ३० किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवासाचा वेळही कमी होईल. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या उन्नत मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यातील नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटरच्या मार्गांचे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे.

प्रकल्पाची किंमत- सात हजार ८२७ कोटी रुपये
रस्त्याची लांबी- ३० किलोमीटर

या उन्नत मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण तसेच खेड परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. याशिवाय पुणे ते नाशिक हा प्रवास सुकर होणार आहे. चाकण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ऑटोमोबाईल क्षेत्रासह उद्योगांच्या ‘लॉजिस्टिक्स’ची क्षमता वाढणार आहे. वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होणार असून याठिकाणी वाहतूक कोंडी फुटणार आहे.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी केला मेगा प्लॅनचा खुलासा! 3 लाख कोटींच्या रस्ते प्रकल्पाला 3 महिन्यांत मिळेल मंजुरी
असा आहे प्रकल्प

– नाशिक फाटा ते खेड या दरम्यान आठ पदरी उन्नत महामार्ग बांधणे
– सध्याच्या चार पदरी रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहा पदरी केला जाणार आहे.
– दोन्ही बाजूस सेवा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.
Ajit Pawar: मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा, अन्यथा…; अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी
भूसंपादन कसे होणार?

– पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीपर्यंत आवश्यक जागा देणार
– मोशीच्या पुढे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारण राजगुरुनगरपर्यंतची आवश्यक जागा देणार
– भूसंपादनाचे काम झाल्यावर येत्या ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष या मार्गाचे काम सुरू होणे अपेक्षित

जिल्ह्यातील अन्य रस्ते प्रकल्प

तळेगाव-चाकण-शिक्रापूर; तसेच पुणे-शिरूर मार्गावरील वाघोली-शिक्रापूर-रांजणगाव, हडपसर-यवत या मार्गांवर उन्नत मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत बैठक झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.