Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईसहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे आणि धरणे भरुन वाहू लागली आहेत. तर काही ठिकाणी पावसाने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. हवामान खात्यांच्या इशारानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, मुंबई या परिसरात उद्या मुसळधार पाऊस कोसळेल या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर सातारा, पुणे आणि पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने थेट रेड अलर्ट दिला आहे.
उद्या सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा प्लान आखत असतील तर शक्यतो घराबाहेर पडणे टाळा अशी सूचना करण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी सुद्धा मुंबईसह उपनगरांना पावसाचा इशारा दिला होता. मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. कुलाबामध्ये ३७.८, सांताक्रूझमध्ये ४७.१, दहिसर ३२.०, राममंदिर ५०.५, विक्रोळी ५८.५, चेंबूर ३२.०, सायन ७८.० आणि माटुंगा ५७.० इतकी पावसाची नोंद हवामान वेधशाळेने केली आहे.
मध्य महाराष्ट्रासह पुण्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, अधून मधून गार वारे आणि संततधार पाऊस पडतो आहे. छत्री, रेनकोट घेऊनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरात गुरुवारी चोवीस तासांत ११ मिलिमीटर तर शुक्रवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत १२.८ मिमी पावसाची नोंद झाली. तापमानातही दोन दिवसांच्या तुलनेत थोडी घट होऊन कमाल २५.५ आणि किमान २२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला, जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली.