Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sindhudurg News: नोकरीच्या मागे न धावता कोकणकन्या व्यवसायात गुंतली, अगरबत्तीतून वर्षाला ७ ते ८ लाखांची उलाढाल

8

सिंधुदुर्ग: महिलांनी चूल आणि मुलं साभाळावं अशी समाजाची मानसिकता आहे. याचं मानसिकतेला दुजोरा देत मेट्रो सिटीतील नोकरी सोडून आणि फारसं आर्थिक पाठबळ नसताना देखील तळकोकणातील एका छोटेशा गावातील महिलेने जिद्द आणि मेहनत, चिकाटीच्या जोरावर व्यवसायात पाय रोवला आहे. अशी या “कोकण कन्येची” खास यशोगाथा आहे.सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील आदुर्ले या मूळ गावी “कांचन पाटील” महिलेने आपल्या पतीच्या सहकार्याने अगबतीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे शिक्षण डीएड झाले असून सरकारी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु कांचन पाटील यांचे पती दुबईमध्ये नोकरीला होते. परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांची नोकरी गेली आणि ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये देखील नोकरी केली. पण मात्र ती सुद्धा नोकरी काही कारणास्तव सोडावी लागली.

दरम्यानच्या काळात “कांचन पाटील” ही पुण्यातील एका अगरबत्तीच्या कंपनीत काम करायची. त्यामुळे तिच्याकडे अगरबत्ती कशी बनवायची याचा तिच्याकडे अनुभव होता. त्याचं अनुभवाच्या जोरावर ग्रामीण भागामध्ये अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. याचं व्यवसायाला अच्छे दिन यायला सुरुवात झाली आहे. कांचन पाटील हिचे पती देशांबाहेर नोकरी करत होते परंतु कोरोनाच्या काळात त्यांना रिलोकेट करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये नोकरी केली. तिथे सुद्धा नोकरीची हमी फार कमी होती. पती बाहेरच्या देशात असल्यामुळे मी गावी राहत होती.
Parbhani Brothers PSI : आदिवासी कुटुंबातील सख्ख्या भावांची कमाल, एकत्रच PSI झाले, गावात बँडच्या तालावर मिरवणूक
त्यानंतर पती पुण्यामध्ये आल्यानंतर मी पुण्यामध्ये जाऊन काही महिने अगरबत्तीच्या कंपनीमध्ये नोकरी केली. माझ्या पती देखील एक ईच्छा होती तू कशाला नोकरी करतेस. आपण अगरबत्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू. त्यानंतर आम्ही कोरोनामध्ये गावी आल्यानंतर स्वतःचा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. अगरबत्ती व्यवसाय करत असतानाच सुरुवातीच्या काळात स्वतःच अगरबत्तीचं शॉप सुरू केला. रॉ अगरबत्ती साहित्य बाहेर मागवावं लागायचं. बाहेरून अगरबत्ती रॉ मटेरियल मागवत असल्यामुळे त्याच कॉस्ट जास्त व्हायची. त्यामुळे मी निर्णय असा घेतला की स्वतः मशीन घेऊन अगरबत्ती बनवायला सुरुवात केली.

सध्या स्वतः म्यॅनुफॅक्चयरिंग करतोय आहे. या अगरबत्ती मध्ये वाईट प्रीमिक्स, कलर प्रीमिक्स, बाबू स्टिक, बंगलोर, पुणे, सुरत येथून माल मागवावे लागतं. ही अगरबत्ती बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशीनची आवश्यकता असते. या मशीन देखील बाहेरून मागविण्यात आले आहे. ही अगरबत्ती बनविण्यासाठी मिक्सर, ड्रायर, आणि अगरबत्ती मशीन असते.अगरबत्ती बनविण्यासाठी सुरुवातीला अगरबत्ती मटेरियल मिक्सर मध्ये टाकावं लागत. त्यानंतर अगरबत्ती मशीन मध्ये टाकावं लागत. बाबू स्टिक च्या साह्याने अगरबत्ती मशीन द्वारे बनवली जाते. त्यानंतर तयार झालेल्या अगरबत्ती सुकविण्यासाठी ड्रायर मशीनमध्ये टाकावी लागते. या ड्रायर मशीनमध्ये जवळपास शंभर ते दीडशे किलो अगरबत्ती ड्राय करू शकतो.

या अगरबत्तीसाठी जिल्हा बाहेर देखील मार्केट आहे. गावांमध्ये सुद्धा कांचन पाटील यानी आपले स्वतःचे शॉप देखील सुरु केले आहे. तिथे सुद्धा त्यांना ग्राहक मिळत आहेत. अधिक ग्राहक मिळविण्यासाठी इंडिया मार्ट या साईटवर सुद्धा इन्क्वायरी सुरू असते त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा देखील अगरबत्ती ही विकली जात आहे. त्याचप्रमाणे गोवा, पुणे, मुंबई देखील मार्केट उपलब्ध आहे. स्थानिक ग्राहकांचा सुद्धा प्रतिसाद मिळत आहे.

हा अगरबत्तीचा व्यवसाय उभा करण्यासाठी आम्हाला साधारणतः सुरुवातीला पाच ते सहा लाख खर्च आला. त्यानंतर सुरुवातीला लागणारे सर्व मशनरी उपलब्ध करून घेतले. अर्थसहाय्यासाठी उमेदवार संस्थेकडून देखील यांना अर्थसाहाय्य मिळालं, स्थानिक बँकांकडून सुद्धा आम्ही लोन घेतलं. त्याचप्रमाणे आमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट होती ती सुद्धा आम्ही या व्यवसायामध्ये गुंतवली आहे. बनवलेले अगरबत्ती ही मुंबई ,पुणे, गोवा या भागांमध्ये आम्ही ऑर्डर प्रमाणे विकत असतो. त्यामुळे यातून आम्हाला सात ते आठ लाख रुपयांचा नफा वर्षाला मिळत असल्याचा कांचन पाटील सांगत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.