Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुरिअर सर्विसमधून फोन, आधार कार्ड वापरल्याची माहिती, नंतर पोलिसांच्या मदतीचा बनाव; पुण्यात महिलेसोबत काय घडलं?

12

पुणे (पिंपरी चिंचवड) : फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. नार्कोटिक्स डिर्पाटमेंटमधून बोलत असल्याचे महिलेला सांगण्यात आलं. पार्सलमध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ असल्याने ते कस्टम विभागाने पकडले असून अटकेची भिती घालून महिलेची २४ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केली. आता पोलिसांनी चार आरोपीना पिंपरी चिंचवडच्या सायबर सेलकडून अहमदनगर, जळगाव, सुरत येथून ताब्यात घेतलं आहे. यात आणखी एक धकादायक बाब समोर आली आहे. यापैकी एक आरोपी हा नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील माजी उपनगराध्यक्षा मीनल अशोक खांबेकर यांचा मुलगा आहे. तसंच त्याचे वडील अशोक खांबेकर हे साई संस्थांनचे माजी विश्वस्थ होते.

स्वरुप अशोक खांबेकर (वय ४२ रा. साईकृपा, इंदिरापथ, संभाजी चौकाजवळ, कोपरगाव, जि. अहमदनगर) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून माहिती घेऊन पुष्कर चंद्रकांत पाखले रा. प्लॉट नंबर ३९, सिधुरत्न, करगांव रोड, विदयुत लता कॉलनी समोर, चाळीसगाव, जळगाव यास जळगाव येथून तर मोनिक भरतभाई रंगोलिया रा. ए १६, महालक्ष्मी सोसायटी, पुनाग्राम, योगी चौक, सुरत, कौसिक मन्सुखभाई बोरड रा. २१०, हरिकुंज सोसायटी, चिकुवाडी, वराच्या रोड, सुरत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी येथील एका महिलेने फिर्याद दिली होती.
Trees Cut Without Permission Fine : विना परवानगी झाड तोडल्यास आता भरावा लागणार मोठा दंड, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

कशी झाली फसवणूक?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी येथे राहणाऱ्या एका महिलेला आरोपींनी तिच्या मोबाईलवर फोन करून फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्विसेसमधून बोलत आहोत असं सांगितलं. तुमच्या नावाचे मुंबई येथून इराणला पाठवलेले पार्सल फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्विस येथे मुंबई कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी पकडले आहे. त्यामध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ, ५ क्रेडीट कार्ड, १ लॅपटॉप आणि ५ एक्सपायर्ड इराणी पासपोर्ट असून सदर पार्सलसाठी फिर्यादीचे आधारकार्ड वापरले असल्याचं सांगितलं. त्यावेळी फिर्यादी यांनी घाबरून कोणतेही पार्सल पाठवले नसल्याचे सांगितले.
Jaipur Teacher : आनंदात नाचत होता, अचानक खाली कोसळला तो परत उठलाच नाही… घटनेने परिसरात हळहळ
त्यावेळी समोरील मोबाईलधारकाने तुम्ही तक्रार करु शकता, तुमचा कॉल नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो, तुम्ही त्यांच्याकडून क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या असं सांगून सदर कॉल ट्रान्सफर केल्याचा दिखावा केला. त्यानंतर नार्कोटिक्स क्राईम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून स्काइप अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडलं. त्यावरून फिर्यादी महिलेच्या नावाचं आधारकार्ड, बँक खात्याचा वापर, मनी लॉड्रिग, ड्रग ट्रॅफिकिंगसाठी केला जात असल्याचं सांगितलं. त्यातून तुम्हांला अटक सुद्धा होऊ शकते असंही आरोपींनी सांगितलं.
Vinesh Phogat : कशी बदलली विनेश फोगाटच्या वजनाची कॅटेगरी? फायनलआधी १०० ग्रॅम कमी होतं वजन, रात्रभरात सगळंच बदललं

पोलीस मदत करत असल्याचं सांगितलं

त्यामधून बाहेर निघण्यासाठी पोलीस मदत करत असल्याचं दाखवून महिलेस स्काइप कॉल करून स्क्रिन शेअर करण्यास संगितलं. महिलेच्या दोन्ही बँकांची माहिती घेतली आणि बँक अकाऊंटवर बॅलन्स असल्याचे पाहून आरबीआयकडून खात्याची वैधता चेक करण्याचं कारण देत खातं सर्वेलन्समध्ये असल्याने हॅकर्सने सर्व हॅक केलं.

त्यावेळी महिलेचा पोलीस असल्याचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. तिने थेट हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावत विविध भागतून पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गु.र.नं. ८८२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३६(३), ३४० (२), ३१८ (२), ३१६ (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.