Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील ‘या’ ट्रॅकवर ब्रिटीश कंपनीचं नियंत्रण
अमरावतीपासून मुर्तजापूरच्या १९० किमीचं अंतर २० तासांत पूर्ण करणारी एक शकुंतला एक्सप्रेस चालते. त्यामुळे या ट्रॅकला शकुंतला रेल्वे ट्रॅक असं म्हणतात. ही एक्सप्रेस अचलपूर, यवतमाळदरम्यान १७ स्थानकांवर थांबते. मागील ७० वर्षांपासून ही ट्रेन स्टीम इंजिनसह चालते. हे इंजिन १९२१ मध्ये ब्रिटनच्या मॅनचेस्टरमध्ये बनवण्यात आलं होतं. १९९४ मध्ये या एक्सप्रेसला डिझेल इंजिन लावण्यात आलं. या रेल्वे ट्रॅकमध्ये लागलेले सिग्नल ब्रिटीशकालीन आहेत.
शकुंतला ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी
शकुंतला रेल्वे ट्रॅकवर केवळ एक ट्रेन शकुंतला पॅसेंजर ट्रेन धावते. ही ट्रेन आता बंद झाली आहे. मात्र या भागात राहाणारे लोक ही ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. या ट्रॅकवर ब्रिटीश कंपनीचा मालकी हक्क होता. मात्र कंपनीने लक्ष न दिल्याने ट्रॅकची परिस्थिती खराब झाली. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने ट्रॅकवर रेल्वे न चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्यांदा शकुंतला एक्सप्रेस २०१४ आणि नंतर एप्रिल २०१६ मध्ये बंद करण्यात आली. शेवटची ही ट्रेन २०२० मध्ये धावली होती.
५ डब्बे असलेली ही ट्रेन रोज ८०० ते १००० लोकांना ने-आण करते. १९५१ मध्ये भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं, पण हा मार्ग भारत सरकारच्या अखत्यारीत आला नाही. आता या ट्रॅकचा वापर करण्यासाठी रेल्वेला १ कोटी २० लाख रुपये रॉयल्टी म्हणून ब्रिटीश कंपनीला द्यावे लागतात. मात्र आता काही रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं, की हा ट्रॅक रेल्वेच्या जमिनीवर तयार झाला असल्याने आता कोणतीही रॉयल्टी द्यावी लागत नाही.
ब्रिटीशांनी कशासाठी तयार केलेला हा रेल्वे ट्रॅक?
अमरावतीमध्ये कापसाची शेती होते. कापसाला अमरावती ते मुंबई पोर्टपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजांनी या रेल्वे ट्रॅकची निर्मिती केली होती. ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीने या रेल्वे ट्रॅकला बनवण्यासाठी सेंट्रल प्रोविंस रेल्वे कंपनीची (CPRC) स्थापना केली होती. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत एक करार केला. त्यामुळेच भारताकडून ब्रिटीश कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती.