Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; मर्दानी खेळावर तयार करण्यात आलेल्या ‘वारसा’ माहिती पटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

13

कोल्हापूर: नुकताच जाहीर झालेल्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये लेखक निर्माता दिग्दर्शक असलेले सचिन सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर ‘ वारसा ‘ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट विभागात भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर परेश मोकाशींचा ‘वाळवी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. हा पुरस्कार ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन दिल्ली येथे देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे चित्रपट सृष्टीची पायाभरणी झालेल्या कोल्हापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

फुटबॉलवेड्या कोल्हापुरात शिवकालीन युद्ध कला असलेली मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कलेच्या जोरावर मराठा साम्राज्य उभा केलं ही शिवकालीन युद्ध कला सध्या मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी नको तो विषय काढला, मुस्लिमांचा संताप, गुन्हाही दाखल; जाणून घ्या काय नेमके काय घडले

वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती,मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे. सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल तीस लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला.
Jalebi On Independence Day : स्वातंत्र्य दिनाला १००हून अधिक किलोची जिलेबी फस्त करणारे महाराष्ट्रातील शहर; वर्षातले २ दिवस गोड पदार्थ एवढा खातात की…

सचिन सूर्यवंशी यांच्या 2019 साली आलेल्या ‘द सॉकर सिटी’ या सिनेमालाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नंतर २०२२ साली त्यांना ‘वारसा’ साठी दुसऱ्यांदा फिल्मफेअर मिळाला. आणि आता यांच्या या माहितीपटाची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून त्यांना सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट या कॅटेगरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असून कोल्हापूरकरांना सचिन सूर्यवंशी यांचा अत्यंत अभिमान वाटत आहे. ‘वारसा’ हा माहितीपट युट्यूबवर उपलब्ध आहे.

हा पुरस्कार मी शिवरायांच्या मावळ्यांना तसेच ही युद्धकला जपलेल्या सर्व खेळाडू व तालमींना अर्पण करतो. आपली मुलं परदेशातील खेळ खेळतात कारण त्या खेळात करियर करता येते.आपल्या मातीतल्या या खेळाला शालेय क्रीडाप्रकारात कुठेलेच स्थान नाही. शासनाने मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. असे झाले तर शिवरायांचा हा समृद्ध वारसा जपला जाईल अशी इच्छा सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.