Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ajit Pawar : विमाननगरपासून शिरुरपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारणार; जनसन्मान यात्रेत अजित पवारांची घोषणा

12

म. टा. प्रतिनिधी, येरवडा : ‘पुणे शहर प्रचंड वाढत आहे. वाहतुकीची समस्या गंभीर बनू बनली आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी पूर्णपणे काढून टाकण्याची, तर काहींची ती कायम ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यााठी मंत्रिमंडळाची लवकरच बैठक घेणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विमाननगरपासून थेट शिरूरपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जनसन्मान यात्रा वडगांव शेरी आली होती. या वेळी अजित पवार बोलत होते. विमाननगर मधील सोसायट्या, पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सुनील टिंगरे, रूपाली चाकणकर उपस्थित होते.

‘अतिक्रमण, वाहतूक मोठी समस्या’

‘नगर रस्त्यावरील विमाननगर चौकात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागते. विमाननगर परिसरात सर्वत्र फूटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहे. दिवसाढवळ्या वाइन शॉपबाहेर मद्यपी रस्त्यावर दारू पितात. कचराही नियमित उचलला जात नाही. सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे,’ अशा समस्या या वेळी नागरिकांनी मांडल्या.

आठ दहा दिवस झाले तरी फुटपाथवरील कचरा उचलला जात नाही. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही पाचशे चौरस फुटाच्या घरांना कर माफ करावा. ब्रम्हा सन सिटी मध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे,अशा समस्या मांडल्या

शरद पवार म्हणाले, दादांचा निर्णय पक्षातले लोक घेतील! काकांची दारे तुमच्यासाठी खुली? अजित पवार म्हणाले….
उर्वरित बीआरटीचा निर्णय लवकर घ्या

नगर रस्त्यावर निम्म्याहून अधिक लोहगाव विमानतळावर जागा कमी पडत असल्याने पाचशे कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल बांधले. मार्ग काढल्यामुळे वाहतूक कोंडी सुटली आहे.मात्र उर्वरित बीआरटी मुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.यावर अजित पवार यांनी बैठकीत पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना मोबाईलवर संपर्क साधून उर्वरित बी आर टी वर तातडीने निर्णय घ्यावा.उपनगरातील नागरिकांच्या समस्या वेळेत सोडावा.कचरा,अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी सोडावा,अशा सूचना केल्या.

‘राखी हेच माझे सुरक्षाकवच’
लोणावळा :
‘राज्यातील भगिनींनी मला बांधलेली राखी हेच माझे मजबूत सुरक्षा कवच आहे. भगिनींसारखी ताकद सोबत असताना मला कोणी काहीही करू शकत नाही. मी महाराष्ट्रभर फिरत राहणार आहे. मावळातील भगिनींइतके प्रेम आतापर्यंत कुठेही मिळाले नाही, ते मी कधीही विसरू शकत नाही. जनतेची अशीच साथ कायम राहिली तर राज्याचा आणि मावळचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.