Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 19 ऑगस्ट 2024 : या राशींनी राहा सतर्क, चोरीची शक्यता ! भांडण करु नका, अनर्थ होईल ! पाहा तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 19 August 2024 In Marathi : 19 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्याचा साथ मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगला लाभ होईल. वृषभ राशीच्या लोकांची सरकारी कामे होणार आहेत. मिथुन राशीने सर्तक रहावे मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. कर्क राशीला आर्थिक बाबतीत यश मिळेल. तर तूळ राशीच्या जातकांची कामे पूर्ण होणार असून धनलाभाचा योग आहे. वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहावे. मीन राशीच्या लोकांनी सतर्क रहावे प्रवासात चोरी होण्याची शक्यता आहे. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया 19 ऑगस्टचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य.
मेष आर्थिक राशिफल : निराशाजनक बातमी मिळणार
मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्याचा साथ मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगला लाभ होईल. धन- संपत्ती आणि मान सन्मान मिळाल्याने तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा, यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कदाचित एखाद्या बाबतीत तुम्हाला निराशाजनक बातमी मिळू शकते. संध्याकाळी तुमचे काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकते. तुमच्या पैशात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल आणि व्यवसायातील योजना यशस्वी होण्यामुळे मन प्रसन्न राहील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे होणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला समाधान आणि शांतता मिळेल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. वृषभ राशीचे जे जातक राजकारणात आहेत तुम्हाला यश मिळेल तसेच तुमची रणनीती पक्षाला नक्की आवडेल. सरकारी ओळखीमुळे तुमची कामे पटापट होणार आहेत. नवीन करार होणार आहेत त्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे काम यशस्वी होतील. पद आणि प्रतिष्ठेची वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. रात्री काही लोकांना भेटून तुम्हाला फायदा होईल. मुलांबद्दल चांगल्या गोष्टी समजल्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : चोरीला होण्याची शक्यता
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला आहे फक्त तुम्ही जे काही काम कराल त्यात सतर्क आणि सावध राहा. तुमची सगळी अडकलेली काम पूर्ण होतील. पण काही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला एखादी नवीन चांगली बातमी ऐकू येईल. संध्याकाळी तुमचे काही अडकलेले काम पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. रात्री एखाद्या शुभ कार्यात सहभागी होणार आहात.
कर्क आर्थिक राशिभविष्य : आर्थिक बाबतीत यश
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा आणि यशाचा आहे. मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा मान-सन्मानवाढेल. मुलांच्या जबाबदारी पूर्ण झाल्याने तुम्ही खूप आनंदी व्हाल. कुटुंबासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ शुभलाभ देणारा आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींकडून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही आनंदात वेळ घालवाल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : मधुर वाणीमुळे प्रतिष्ठा मिळेल
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाने भरलेला असून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तुमची मधुर वाणी तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. तुमच्या पैशात वाढ होईल. शिक्षण आणि स्पर्धा या क्षेत्रात तुम्हाला विशेष यश मिळेल. संध्याकाळी तुम्हाला काही कारणास्तव खूप धावपळ करावी लागू शकते. त्यामुळे थकवा आणि ताणतणाव जाणवेल. विरोधक आज शांत असतील त्यांचा फार त्रास होणार नाही.
कन्या आर्थिक राशिभविष्य : नोकरी-व्यवसायात यश
कन्या राशीच्या लोकांना आज फायदा होईल आणि जीवनात सुख-समृद्धी वाढेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात यश मिळेल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी समजेल त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. कोर्ट कचेरी किंवा एखादी केस चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. आज शुभ कार्यासाठी खर्च कराल त्यामुळे तुमचा माना-सन्मान अधिक वाढणार आहे.
तूळ आर्थिक राशिफल :कामे पूर्ण होणार, धनलाभाचा योग
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात लाभ होणार आहे. तुमची सगळी काम पूर्ण होतील आणि तुम्हाला समाधान मिळेल. घर आणि कुटुंबात सुख शांती असेल. तुमचे पैसे जे अडकले होते ते परत मिळतील. तुमचे विरोधक आज तुमच्यावर मात करु शकणार नाही. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : वादविवादापासून दूर राहा
वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश तसेच व्यवसायात आज जे काम हाती घ्याल त्यात फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही शांतपणे काम करा. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तणाव होईल आणि काम करण्याची इच्छा कमी होईल.
धनू आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे होणार
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मानाचा आहे. तुमचे विरोधी देखील तुमची प्रशंसा करतील. सरकारकडून तुम्हाला फायदा होईल आणि सरकारी कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. जी कामे अडकली होती ती पूर्ण होतील. तुम्हाला सासरकडून आज धनलाभ होणार आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळेल.
मकर आर्थिक राशिफल : काम आणि खर्च वाढणार
मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणीत होणार आहे. कुटुंब आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. संध्याकाळी कोणत्याही वादात पडू नका. रात्री पाहुणे येण्याती शक्यता आहे. त्यामुळे काम आणि खर्च दोन्ही वाढणार आहे. एकूणच दिवस आनंदात जाणार आहे.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : वाद करु नका, ताणतणावात वाढ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुमची जी कामे सुरू होतील ती अडकू शकतात. तुम्ही नकळत एखाद्या वादात सापडू शकता आणि त्यामुळे तुमचे शत्रू वाढणार आहेत. तुमच्या बुद्धीचा वापर करून केलेले काम देखील आजे तुमचे नुकसान करू शकते. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा. कामातील नुकसान आणि निराशा यामुळे तुम्हाला मनस्ताप होईल. काही वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक कुठेतरी जावे लागू शकते. म्हणून सावध रहा आणि वादात पडू नका.
मीन आर्थिक राशिभविष्य : प्रवासात चोरी होण्याची शक्यता
मीन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी उत्तम असून तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होणार आहेत. आज सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करु नका किंवा तुम्ही त्यांच्याकडून काही उधार घेऊ नका, यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा प्लॅन करणार आहात. आज धार्मिक कार्यात खर्च करणार आहात. प्रवासाचा योग आहे पण प्रवासाता काळजी घ्या कारण चोरी होण्याची शक्यता आहे.