Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्यात शंभर टक्के साक्षरता; निरक्षर नोंदणीचे प्रमाण अत्यल्प, फक्त ८१० जणांची नोंदणी

8

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिक्षण विभागाचे साक्षरता अभियान निश्चित उद्दिष्टापेक्षा मागे आहे. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत २०२४-२५ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ हजार ७९७ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप ८१० निरक्षर जिल्ह्यात शोधण्यात आले. मागील वर्षीचे उद्दिष्टपूर्ण करण्यावर आता शिक्षण विभागाचा भर असून, अशा चार हजार नवसाक्षरांची परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. अभियानासाठी आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांची मदत घेतली जाणार आहे.

शिक्षण विभागातर्फे नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २०२७ पर्यंत शंभर टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. दर वर्षी जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात येते परंतु, उद्दिष्ट पूर्ण करण्यात विविध जिल्हे मागे असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले. त्यामुळे अभियान निश्चित वेळेत पूर्ण होणार का, असे प्रश्न उपस्थित केली जात आहेत. छत्रपती संभाजीनगरसाठी निरक्षण नोदंणीचे उद्दिष्ट २४ हजार ७९७ एवढे देण्यात आले. मात्र, अद्याप एक हजार नोंदणी ही झाली नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे ८१० जणांची नोंदणी झालेल्यांना साक्षर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यासह मागील वर्षी परीक्षा दिलेल्यांचा शिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यांचे वर्ग सुरू झाले असून, काही ठिकाणी नियमित वर्ग होत आहेत. जिल्ह्यात २०२३-२४ साठी १७ हजार ८३४ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सुमारे चौदा हजार निरक्षरांची नोंदणी झाली. साक्षरतेचे वर्ग झाल्यानंतर त्यांनी परीक्षा दिली. यंदा २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यंदा जिल्ह्यासाठी २४ हजार ७९७ निरक्षरांची नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, नोंदणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांत वेगळी स्थिती नाही. अनेक जिल्ह्यात निरक्षर नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवावरही लक्ष..

साक्षरता कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाने गणेशोत्सव, नवरात्र उत्सवात प्रचार, प्रसारावर लक्ष केंद्रीत केले आहे. सार्वजनिक उपक्रमातून असाक्षरता नष्ट करून संपूर्ण साक्षरता करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात येते. सर्व मंडळांना उपक्रमात सहभागी करून त्यांच्याद्वारे प्रसार, प्रचारासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये बॅनर, देखावे, साक्षरतेवर आधारिक वक्तृत्व, चित्रकला, वादविवाद, रांगोळी, कथाकथन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात १२ लाख ४० हजार

राज्यात मागील वर्षी ६ लाख २० हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. या वर्षीही ६ लाख २० नोंदणीचे लक्ष आहे. मागील वर्षी नोंदणी केली परंतु, परीक्षा देवू शकले नाहीत. परीक्षेत अप्रगत राहिले अशांची पुन्हा तयारी करून घेतली जाणार आहे. सप्टेंबरमध्ये या नवसाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाकडून नियमितपणे नोंदणीचा आढावा घेण्यात येत असला तरी शिक्षकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते.
Marathwada Rain: मराठवाड्यात रिमझिम पावसाच्या सरी; दीर्घ खंडानंतर मध्यम सरी कोसळल्या
२०२४-२५ची राज्यभरातील आकडेवारी..
राज्यात एकूण शिकणारे ६९,१३०
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिकणारे ८१०

नवसाक्षरांच्या नवीन नोंदणीची प्रक्रियाही सुरू आहे. आम्ही नियमितपणे आढावा घेत, सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. यासह मागील वर्षातील उद्दिष्टांप्रमाणे जे राहिले आहेत. त्यांच्या परीक्षा सप्टेंबर घेण्याचे नियोजन आहे. नवसाक्षरांचे वर्ग घेत, त्यांच्या परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येतील. – डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, (योजना)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.