Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 21 ऑगस्ट 2024: मूलांक 4 अडचणी आणि समस्या वाढणार ! मूलांक 8 ताणतणावात वाढ ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घ्या.

12

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 21 ऑगस्ट 2024: मूलांक 4 अडचणी आणि समस्या वाढणार ! मूलांक 8 ताणतणावात वाढ ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घ्या
Numerology Prediction, 21 August 2024 : अंक ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक 1 आणि 2 साठी आजचा दिवस ताणतणावाने भरलेला आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. रागाला आवरा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. मूलांक 4, 6 आणि मूलांक 7 यांचे ऑफिस किंवा घरी भांडण होण्याची शक्यता आहे. त्यांनी कामात फोकस ठेवा आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवा. या संदर्भात अधित जाणून घेऊयात, तसेच मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – ताण वाढणार, अती राग घातक

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस काही खास नसेल. आज तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अडचणींना आणि समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस विशेष अनुकूल नाही. येणारे पैसे अचानक कुठेतरी अडकतील. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आज दिवसभर तुम्ही निराश होणार आहात. स्वतःची विशेष काळजी घ्या, कारण तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर तो वाढण्याची शक्यता आहे. आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्या आणि जंकफूड खाणे कमी करा. आज तुम्हाला दिवसभर तणाव राहणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. तुम्ही शांत राहा आणि राग राग करू नका. जोडीदारासोबत चांगले वागणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

मूलांक 2 – पैशांची गुंतवणूक आज नको

मूलांक 2 साठी आजचा दिवस अनुकूल नाही. धनसंपत्ती संदर्भात अडचणींना सामना करावा लागेल. तुम्ही पैशांची गुंतवणूक करायाच विचार करत असाल तर माहिती घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण पैसे बुडण्याची शक्यता दिसते आहे. व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस अनुकूल नाही, त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय टाळा. आज तुम्ही खूप भावूक होणार आहात. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या आईला एखादी भेटवस्तू द्या, यामुळे तुम्हाला अडचणीत मदत मिळेल. जीवनसाथीशी संबंध सुखद ठेवा, त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल

मूलांक 3 – व्यवसायात उत्तम नफा

मूलांक तीन असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला आहे. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस उत्तम आहे. खूप दिवसांपासून तुम्हाला पैशांशी संबंधित अडचणी येत होत्या, त्या आज सुटताना दिसतील. व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कामात नेहमीपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या दृष्टीनेही आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील.

मूलांक 4 – दिवस अडचणीचा, समस्यांनी भरलेला

मूलांक 4 असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आजचा दिवस समस्यांनी आणि अडचणींनी भरलेला असेल. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस सामान्य असून पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा. तुमच्या स्वभावातील हट्टीपणा आज उफाळून येणार आहे त्या हट्टापायी तुम्ही कामात चुकीचे निर्णय घेऊ शकता. म्हणून तुम्हाला सल्ला आहे की संयमाने वागा. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आज तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेतला तर तुम्हाला खूप फायदा होईल. कुटुंबाच्या दृष्टीने पाहिल्यास, तुमच्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्यापासून दूर राहणे पसंत करतील. त्यामुळे आज संयमाने बोला आणि नम्र भाषेचा वापर करा. जोडीदारासोबत आजचा वेळ चांगला जाईल.

मूलांक 5 – व्यापार वाढविण्याचा प्रयत्न सफल

मूलांक 5 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य असून तुम्ही पैशांचा वापर विचारपूर्वक करा. व्यापारात आज तुम्हाला नफा मिळताना दिसेल. व्यापार वाढवण्यासाठी आज तुम्ही काही नवे प्रयत्न नक्की करा, तुम्हाला यश मिळेल. कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. फक्त आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या कटू शब्दांचा वापर करू नका. जीवनसाथीसोबत आजचा दिवस चांगला आहे. तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीत पुढे येऊन तुमच्या पाठीशी उभा राहील.

मूलांक 6 – ऑफिस-घरी भांडणाची शक्यता

मूलांक 6 साठी आजचा दिवस अनुकूल नाही. आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. पूर्ण विचार आणि खात्री केल्याशिवाय पैशांची गुंतवणूक करू नका.ऑफिस आणि घरी जोरदार भांडण होण्याची शक्यता आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही कुटुंबीयांच्या आनंदासाठी अनावश्यक खर्च करणार आहात. जोडदाराची साथ मिळेल.

मूलांक 7 – अंहकारामुळे वाद होण्याची शक्यता

मूलांक 7 साठी आजचा दिवस अडचणींनी भरलेला राहील. आज तुमच्यातील अहंकार उफाळून येणार आहे त्यामुळे तुम्ही होणारे काम नाकारु शकता. यामुळे तुमचे नुकसान होणार आहे, तुमच्याविरुद्ध विरोधक उभे करू शकता. तुमच्या या वागणुकीमुळे कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी सल्ला आहे अहंकारापासून दूर राहा. अहंकार सर्वनाशाचे कारण आहे तुम्ही संयम ठेवा आणि शांतपणे वागा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. धनसंपत्ती संदर्भात येणारी अडचण थोडी कमी होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नव्या मार्गांचा विचार करु शकता. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल.

मूलांक 8 – अडचणी आणि समस्या यामुळे ताण वाढणार

मूलांक 8 साठी दिवस त्रासदायक आहे. प्रत्येक कामात अडचणींचा आणि समस्यांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला कोणती ना कोणती नवीन समस्या त्रास देत राहणार आहे. तुम्हाला ताणतणावाचा त्रास होऊन जुना आजार डोके वर काढणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा वेळ अनुकूल नाही. आज तुम्ही व्यापारासंबंधी कोणताही मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास टाळा. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयासाठी काही वेळ थांबा. कुटुंबाच्या दृष्टीनेही आज वादावादीची शक्यता दिसते आहे. जोडीदारासोबत चांगले वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मूलांक 9 – तब्येतीची विशेष काळजी घ्या

मूलांक 9 च्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण आज पोटाचे आजर डोके वर काढणार आहेत. तुमच्या आहारावर विशेष लक्ष द्या आणि खाण्यात हळदीचा वापर करा. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर राहाल. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीचे फळ मिळणार कुटुंबासोबत अनुकूल वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध आज उत्तम राहतील. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.