Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shravan Month 2024 : श्रावणात करा द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन,जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

7

Where is 12 jyotirlinga of Shiva : श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. या काळात भगवान शंकराची पूजा करण्याचा विशेष विधी आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की, जो भक्त या महिन्यात दररोज शिवलिंगाती पूजा करतो. सोमवारचे व्रत करतो, भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या महिन्यात लाखो शिवभक्त ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी उज्जैन, काशी आणि हरिद्वार इत्यादी भारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली जाते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Shravan Month 2024 : श्रावणात करा द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन,जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
12 Jyotirlingas in India :
श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. या काळात भगवान शंकराची पूजा करण्याचा विशेष विधी आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की, जो भक्त या महिन्यात दररोज शिवलिंगाती पूजा करतो. सोमवारचे व्रत करतो, भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या महिन्यात लाखो शिवभक्त ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी उज्जैन, काशी आणि हरिद्वार इत्यादी भारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली जाते.
पुरातण काळात १२ ज्योतिर्लिंगाचे वर्णन दिले आहे. पुराणानुसार ज्या ठिकाणी भगवान शिव प्रकट झाले तिथे त्यांच्या ज्योतिर्लिंगाच्या रुपात पूजा केली जाते. शिवपुराणानुसार भगवान शिव या ठिकाणी त्यांच्या विविध रुपात पूजा करतात. जाणून घेऊया ज्योतिर्लिंगाबद्दल

द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र

शिवपुराणानुसार जो व्यक्ती दिवसभरात बारा ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करतो त्याची सात जन्मांची पापे नष्ट होतात. त्याच वेळी तो जन्म- मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त होती.

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
उज्जयिन्यां महाकालं ओम्कारम् अमलेश्वरम्॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।

सोमनाथ ज्योतिर्लिंग

​गुजरातमधील सौराष्ट्र भागात सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे प्रसिद्ध मंदिर यापूर्वी सहा वेळा पाडून पुन्हा बांधण्यात आले. १०२२ साली महमूद गझनवीने हल्ला करुन या मंदिराचे बरेचसे नुकसान केले. त्यानंतर हे मंदिर भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी बांधले होते. हे ज्योतिर्लिंग केवळ भारतातीलच नाही तर पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते.

श्रीमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

आंधप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात श्रीमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग वसलेले आहे. या मंदिराजवळून श्रीशैल पर्वतावर असलेली कृष्णा नदी वाहते. त्याला दक्षिणेचा कैलास असेही म्हणतात. शिवपुराणानुसार या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. पूजा केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग

मध्य प्रदेशातील माळवा येथील उज्जैनमध्ये वसलेले महाकालेश्वर. हे मंदिर क्षिप्रा नदीच्या काठावर आहे. प्राचीन काळी उज्जैनला अवंतिकापुरी म्हणतात. हे एकमेव शिवलिंग असे की दक्षिणाभिमुख आहे. या ठिकाणी सकाळी होणारी भस्म आरती जगभरात प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या मध्यभागी एका बेटावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. उज्जैन ते खांडवा या रेल्वे मार्गावर मोरटक्का नावाचे रेल्वे स्थानक आहे जे या ठिकाणावरुन १० मैल अंतरावर आहे. येथे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन स्वतंत्र शिवलिंग आहेत. परंतु या एकाच लिंगाची दोन रुपे आहेत. ओंकारेश्वर लिंग हे स्वयंभू मानले जाते. ओंकार म्हणजेच ओमच्या आकारात आहेत, म्हणून या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर असे म्हणतात.

केदारनाथ ज्योतिर्लिंग

हिमालयातील केदार नावाच्या पर्वतावर केदारनाथ ज्योतिर्लिंग वसलेले आहे. हे ठिकाण हरिद्वारपासून १५० मैल आणि उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशपासून १३२ मैलांवर आहे. केदारनाथ धामचे वर्णन स्कंद पुराण आणि शिवपुराणात आढळते. भगवान शंकराने केदार क्षेत्राला महत्त्वाचे स्थान दिले आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग

पुण्याच्या उत्तरेस भीमा नदीच्या काळी सह्याद्री पर्वतावर वसलेले श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग. हे ठिकाण नाशिकपासून १२० किमी मैलांवर आहे. डाकिनी सह्याद्री पर्वताच्या शिखराचे नाव आहे. शिवपुराणाच्या कथेनुसार भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामच्या कामरुप जिल्ह्यातील गुवाहाटीजवळ ब्रह्मपूर टेकडीवर असल्याचे सांगितले जाते. नैनिताल जिल्ह्यातील काशीपूर नावाच्या ठिकाणी असलेले विशाल शिवमंदिर हे भीमाशंकरचे ठिकाण आहे. असे म्हटले जाते की, कोणताही भक्त सूर्योदयानंतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याची सर्व पापे नष्ट होतात.

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग

वाराणसी येथील काशीचे श्री विश्वनाथजी हे सर्वात प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगेच्या काठावर वसलेले काशी विश्वनाथ शिवलिंगाचे दर्शन हिंदूसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये काशीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, प्रलय आल्यावर या भागाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव या स्थानाला त्रिशूळावर धारण करतील आणि प्रलय टळ्ल्यानंतर काशीला पुन्हा नीट करतील.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पंचवटीपासून १८ मैल अंतरावर आहे. ब्रह्मगिरीजवळ गोदावरीच्या तीरावर या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. पवित्र गोदावरी नदीचा उगमही याच ठिकाणी होतो. भगवान शिवाचे एक नाव त्र्यंबकेश्वर आहे. गौतम ऋषी आणि गोदावरी नदीच्या सांगण्यावरून भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे वास्तव्य करतात असे मानले जाते.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग

​झामरखंडमधील देवघर नावाच्या ठिकाणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराच्या एका नावापैकी वैद्यनाथ हे आहे. म्हणून याला वैद्यनाथ धाम असेही म्हटले जाते. हे सिद्धपीठ आहे. या शिवलिंगाला कामना लिंग असेही म्हणतात. श्रावणात या ठिकाणी भक्तांची गर्दी पाहायला मिळते. ​

नागेश्वर ज्योतिर्लिंग

गुजरातमधील बडोदा प्रदेशात गोमती द्वारकेजवळ श्रीनागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. नागेश्वर म्हणजे सापांचा देव. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवाला सापांचे देव मानले जाते. नागेश्वर ज्योतिर्लिंगबद्दल असे म्हटले जाते की, या शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

रामेश्वर ज्योतिर्लिंग

तामिळनाडूच्या रामनाद जिल्ह्यात श्री रामेश्वर तीर्थ आहे. लंका जिंकल्यानंतर भगवान श्रीरामांनी आराध्य दैवत शंकराची पूजा केली होती. या ज्योतिर्लिंगाला श्रीरामेश्वर किंवा श्रीरामलिंगेश्वर असेही म्हटले जाते. हा धाम हिंदूंच्या चार धामांमध्येही येतो.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

महाराष्ट्रातील दौलताबाद स्टेशनपासून १२ मैल अंतराव बेरुळ गावाजवळ श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यापूर्वी वरचे कपडे काढावे लागतात असे म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि आत्मिक शांती मिळवण्यासाठी दूरवरुन लोक येतात. शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. एकनाथ गुरू आणि श्री जनार्दन महाराज यांची समाधीही येथे आहे.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.