Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 23 ऑगस्ट 2024 : या राशींसाठी नोकरी-व्यवसायात बदल ! कामात घाईगडबड नको, अन्यथा होईल नुकसान ! पाहा तुमचे राशिभविष्य

8

Finance Horoscope Today 23 August 2024 In Marathi : 23 ऑगस्टला मेष राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या चांगल्या कार्यांमुळे तुमचा आणि कुटुंबाचा गौरव वाढेल. वृषभ राशीच्या जातकांचे ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. तर मिथुन राशीसाठी वेळ अनुकूल नाही, प्रत्येक कामात अडथळे येणार आहेत. सिंह राशीसाठी नोकरी-व्यवसायात नवे बदल आहेत. तूळ राशीच्या जातकांनी लक्षात ठेवा धोकादायक कामांपासून दूर राहा. धनू राशीच्या जातकांचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. कुंभ राशीच्या जातकांनी कामात घाईगडबड करु नये नुकसान होईल. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया 23 ऑगस्टचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 23 ऑगस्ट 2024 : या राशींसाठी नोकरी-व्यवसायात बदल ! कामात घाईगडबड नको, अन्यथा होईल नुकसान ! पाहा तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 23 August 2024 : 23 ऑगस्ट मेष, वृषभसह या राशींसाठी दिवस खूप चांगला आहे. कामे मार्गी लागणार असून धनलाभाचा योग आहे. अचानक पैसे मिळणार आहेत. व्यवसायात स्थिती उत्तम असून तुम्ही व्यवसाय वाढीचा विचार करु शकता. सिंहसह या राशींसाठी व्यवसाय आणि नोकरीत बदल होणार आहेत तुम्ही घाबरू नका त्याचा सकारात्मक परिणाम असेल. या राशीच्या लोकांची विश्वासू व्यक्तीकडून आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे सावध राहा. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय सांगते ते जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिफल : नोकरी-व्यवसायासात फायदा

मेष राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या चांगल्या कार्यांमुळे तुमचा आणि कुटुंबाचा गौरव वाढेल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. आज आर्थिक स्थिती चांगली असेल, गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. आज दानधर्म करणार आहात. आज तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यापर करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असून कामाचा ओघ वाढणार आहे.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक

वृषभ राशीसाठी आजचा दिवस ठिक आहे. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमचे मन आज शांत राहणार आहे त्यामुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. सहकारी प्रत्येक कामात मदत करतील. घरातून निघताना आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडा, विशेष यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. तुम्ही विचार केलेली सगळी कामे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होणार आहेत.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : वेळ अनुकूल नाही, प्रत्येक कामात अडथळे

मिथुन राशीसाठी दिवस फारसा चांगला नाही. कोर्ट कचेरी किंवा काही कारणामुळे तुमची कायदेशीर चौकशी सुरु असेल तर सतर्क राहा. वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही. त्वरित निर्णय घेता न आल्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होणार आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांच्या कृपेने तुमचे अधिकार वाढू शकतात. कुटुंबासोबत वातावरण आनंदात जाणार आहे. आर्थिक स्थिती सामान्य असेल.

कर्क आर्थिक राशिभविष्य : प्रमोशन होणार, वरिष्ठांकडून कौतुक

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमचे प्रमोशन काही कारणामुळे अडकले असेल तर ते आता नक्की होणार आहे. तुमच्या मधुर वाणीने आणि बुद्धीचातुर्याने तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला तुमच्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. डोळ्यांचा त्रास असेल तर तो कमी होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुमच्या कामात उत्तम फायदा होणार आहे. तब्येत सांभाळा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

सिंह आर्थिक राशिभविष्य : नोकरी-व्यवसायात नवे बदल

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. जर तुम्ही व्यापारी असाल, तर तुमच्या व्यापारात काही नवीन बदल होतील. जर तुम्ही नोकरीत असाल, तर तुमचे अधिकार वाढतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. कुटुंबाकडूनही आज चांगली बातमी मिळणार आहे त्यामुळे घरी वातावरण आनंदी असेल. आज धनलाभाची शक्यता आहे पण त्यामुळे तुमचा अहंकार वाढेल, तसे शक्यतो होवू देऊ नका. आज सामाजिक कार्यात सहभाग घेणार असून चैनीच्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे खर्च वाढणार आहेत.

कन्या आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये जबाबदारी वाढणार

कन्या राशीच्या लोकांना आज दिवस ठिक आहे पण ताणतणाव वाढणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल, तसेच जबाबदाऱ्या देखील वाढतील. तुम्ही आज अवास्तव खरेदी करणार आहात त्यामुळे धनाचा अपव्यय होऊ शकतो. तुम्ही नेहमीच मनापासून इतरांच्या भल्यासाठी आणि सेवेसाठी प्रयत्नशील असता, याचा फायदा आज तुमच्या मुलांना होईल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या अन्यथा तब्येत बिघडू शकते.

तूळ आर्थिक राशिफल : धोकादायक कामांपासून दूर राहा

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दिवस यशाने भरलेला असला तरी खूप धावपळ होणार आहे. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. धोकादायक कामांपासून दूर राहा अन्यथा दंड अथवा शिक्षा होवू शकते. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत लहान-मोठे त्रास आणि धावपळ आहे तसेच मानहानीची शक्यता राहील. तुम्हाला कोणत्या तरी कारणामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : सुखद दिवस, कामे पटापट होणार

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस आहे, आणि तुमच्या सुखात वाढ होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. मनात सकारात्मक विचार येतील आणि ऑफिसमधील कामे पटापट मार्गी लागतील. तुमचे पद आणि अधिकारांमध्ये वाढ होईल. आज तुमचे विरोधक थंड असतील. मुलांबद्दल तुमच्या मनात अधिक आदर असेल संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ आनंदात जाईल, आणि तुमचे मन चांगल्या कामांमध्ये गुंतलेले असेल. खरेदी करण्याचा मूड आहे.

धनू आर्थिक राशिभविष्य : विश्वासघात होण्याची शक्यता सावध राहा

धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभाचा दिवस आहे, आणि तुमचे मन चांगल्या कामांमध्ये गुंतलेले असेल. तुमच्या ज्ञानात वाढ होणार असून बुद्धीचातुर्याने नवीन शोध लावणार आहात. तुमचे अडकलेले पैसे मिळतील, आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. संध्याकाळच्या वेळी तुमची तब्येत बिघडू शकते तेव्हा सावध राहा. एखादी विश्वासू व्यक्ती आणि नोकर चाकर विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकतात, सतर्क आणि सावध राहा.

मकर आर्थिक राशिफल : शुभलाभ पण खर्च जोरदार

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभा आहे. तुम्ही उत्साहाने प्रत्येक काम करणार आहात. अनावश्यक खर्च तुमच्या समोर येतील, तुम्ही विचार करणार हे खर्च आपण टाळूया पण आज ते शक्य नाही. खर्चाचा दिवस आहे थोडा ताणतणाव जाणवेल. तुमची बढती काही कारणामुळे अडकली असेल तर ती होणार आहे. संध्याकाळपर्यंत काही पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल आणि तुम्हाला आनंद मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : कामात घाईगडबड नुकसान करेल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे, तुम्हाला नोकरीत आणि व्यापारात लाभ होणार आहे. तुमचे मन आनंदी राहील. घाईगडबडीत केलेल्या कामामुळे नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवा. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन कामात गुंतवणूक करण्याबद्दल विचार करू शकता, त्याचा फायदा भविष्यात नक्की होईल. मुलांच्या सुखासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल, आणि लाभ झाल्यामुळे तुमचे मन आनंदी राहील.

मीन आर्थिक राशिभविष्य : नवीन योजना यशस्वी होणार

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुमच्या सुख-सन्मानात वाढ झाल्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. जर तुम्हाला बँक किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घ्यायचे असेल, तर ते सहजपणे मिळेल. नवीन-नवीन योजना आखून त्यांना यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून कामे यशस्वी होणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.