Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pimpri Crime: सायबर चोरांकडून वृद्धाला ३९ लाखांना गंडा; गॅसचे बिल थकीत असल्याचा बहाणा करुन फसवलं, काय घडलं?
काय आहे प्रकरण?
या प्रकरणी ८२ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका मोवाइल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वृद्धाला फोन करून, ‘तुमचे एमएनजीएलचे बिल थकीत आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून आरोपीने वृद्धाच्या मोबाइलचा ताबा घेतला. त्याआधारे फिर्यादीच्या बँक खात्यातून २२ लाख २७ हजार ९९६ रुपये ट्रान्सफर केले. फियांदी यांच्या फिक्स डिपॉझिट खात्यातील रकमेवर १७ लाख चार हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले. याबाबत समजल्यानंतर फिर्यादी यांनी बँकस कळवले आणि ते खाते बंद केले. त्यानंतर बँकने कर्जाची रक्कम बजा करून, उर्वरित रक्कम फिर्यादीस दिली. आरोपीने फिर्यादी यांची एकूण ३९ लाख ८७ हजार ९९० रुपयांची फसवणूक केली.
कारमधून रोकड पळविली…
कारच्या काचा फोडून कारमधून एक लाख ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरटपाच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाराम बाळासाहेव साठे (वघ ३९री) यांनी फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.