Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सप्टेंबर राशीभविष्य २०२४ : भाद्रपद महिन्यात ५ राशींवर पडेल पैशांचा पाऊस! व्यवसायात नफा, कोणावर राहिल बाप्पाची कृपा, वाचा सप्टेंबरचे मासिक राशिभविष्य
Monthly Horoscope September 2024 in marathi : सप्टेंबर महिन्यात काही राशींवर बाप्पाची कृपा राहाणार आहे. या महिन्यात बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या महिन्यात ५ राशींच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच व्यवसायात देखील नफा होणार आहे. तुमची राशी काय सांगते त्यासाठी सविस्तरपणे वाचा राशिभविष्य.
सप्टेंबर महिन्यात काही राशींवर बाप्पाची कृपा राहाणार आहे. या महिन्यात बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या महिन्यात ५ राशींच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच व्यवसायात देखील नफा होणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहाल. अहंकाराची भावना तुमच्यात प्रबळ होऊ शकते. बोलण्याने आणि वागण्याने इतरांना दुखावू शकता. प्रेम जीवनात विचारपूर्वक पाऊल उचला. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नात्यातील अविश्वासाची दरी वाढू शकते. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही समस्या चिंतेचे कारण बनेल. कामामुळे थकवा येऊ शकतो. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ शुभ राहिल. तुमची राशी काय सांगते? कसा असेल सप्टेंबर महिना? चला जाणून घेवूया.
मेष – व्यवसायात नफा
सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र राहाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आनंदी असाल. कुटुंबाचे सहकार्य या काळात मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहाल. अहंकाराची भावना तुमच्यात प्रबळ होऊ शकते. बोलण्याने आणि वागण्याने इतरांना दुखावू शकता. महिन्याच्या मध्यात विरोधकांकडून सावध राहा. व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास कंटाळवाणा असला तरी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. कोणताही निर्णय घाईने घेणे टाळा. हिंतचिंतकांचा सल्ला घ्या. कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रेमाच्या बाबतीत या महिन्यात विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात. या काळात प्रेमसंबंधात अनेक अडथळे येतील. वैवाहिक जीवनात कडू-गोड वाद होतील. जोडीदारच्या तब्येतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयी बदला.
वृषभ – उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे आरोग्य आणि नातेसंबंधाकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही जुन्या आजारामुळे त्रस्त असाल. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होऊ शकतात. व्यवसायात स्पर्धकांकडून कठीण स्पर्धा होईल. वरिष्ठांच्या मदतीने नातेवाईकांशी संबंध सामान्य होतील. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक प्रयत्न कराल. अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. त्यामुळे आर्थिक चिंता सतावेल. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळा. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. प्रेम जीवनात विचारपूर्वक पाऊल उचला. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नात्यातील अविश्वासाची दरी वाढू शकते.
मिथुन – नवीन आव्हांने येतील
मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना नवीन आव्हानांचा असेल. या काळात अनेक नवीन संधी देखील मिळतील. नोकरीच्या संदर्भात मोठे बदल होतील. लांबचा प्रवास करावा लागले. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. तुमचा वेळ आणि शक्ती योग्यप्रकारे व्यवस्थापित केल्यास अपेक्षित यश मिळेल. या काळात एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते. विरोधक तुमच्या कामात अडथळे आणतील. बुद्धीने तुम्ही त्यावर मात करण्याय यशस्वी व्हाल. या काळात व्यवसायात संमिश्र परिणाम मिळतील. काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि वेळ द्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी ताण जास्त राहिल. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही समस्या चिंतेचे कारण बनेल. कामामुळे थकवा येऊ शकतो. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ शुभ राहिल. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात काही अडचणी येतील. जोडीदाराशी संपर्क साधू शकणार नाही. वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहिल. प्रेमजीवनातील दूरावा संपेल. पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.
कर्क – बोलण्यावर नियंत्रण ठेवा
कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा भार अधिक असेल. काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. इतरांवर अवलंबून राहाणे टाळा. समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला बुद्धीने काम करावे लागेल. महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती नियंत्रण राहिल. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात थोडा कमी नफा मिळू शकतो, हळूहळू प्रगती कराल. या काळात तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद किंवा सन्मान मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. परदेशात करिअर किंवा व्यवसायात अनेक नवीन संधी मिळतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत बनतील. प्रेम संबंधांच्या दृष्टीकोनातून हा काळ चांगला नसेल. प्रेम जोडीदाराला भेटण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. एखाद्या गोष्टीबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व वाद मिटतील. जोडीदारासोबत प्रेम आणि विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे. आरोग्य सामान्य राहिल.
सिंह – पैसे गुंतवणे टाळा
सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात हा काळ वेळ, पैसा आणि शक्तीचे व्यवस्थापन करावे लागेल. अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महिन्याच्या सुरुवातीला घर, वाहन इत्यादींवर पैसे खर्च करु शकतात. ज्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. या काळात काही घरगुती समस्यांना सामोरे जावे लागेल. ज्यामुळे तुमचे मन थोडे चिंतेत राहिल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या बदलतील. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला घ्या. कुणाच्या बोलण्याने प्रभावित होऊन पैसे गुंतवणे टाळा. या महिन्यात तुम्हाला व्यवसायात खूप चढ-उतार दिसतील. व्यवसाय वाढीसाठी वाट पाहावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान होईल. जास्त वादविवाद केल्याने परिस्थिती बिघडू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध सामान्य राहातील. वैवाहिक जीवनही आनंदी राहिल. जोडीदार तुमच्या कठीण काळात आधार बनेल.
तुळ – संपत्ती वाढ
सप्टेंबर महिना तुळ राशींसाठी आनंद आणि सौभाग्य घेऊन येईल. या महिन्यात तुम्हाला जवळच्या मित्रांकडून प्रत्येक पावलावर साथ मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला मोठे यश मिळेल, ज्यामुळे मानसन्मानात वाढ होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोर्टातील निर्णय तुमच्या बाजूने लागतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कामात अडथळे येतील, पण तुमच्या हुशारीने त्यावर मात कराल. व्यवसायात प्रगती आणि नफा कमी होईल. विदेशातील संबंधित व्यवसायात मोठे यश मिळेल. तुमचे करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या संपत्ती वाढ होईल. आर्थिक लाभासोबतच सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च कराल. मालमत्तेसंबंधित प्रश्न सुटतील. राजकारणातील लोकांना मोठे पद मिळेल. प्रेमसंबंधात हा महिना शुभ राहिल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला आहे. प्रेमीजोडप्यांना कुटुंबाकडून लग्नासाठी होकार मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहिल. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल.
वृश्चिक – व्यवसायात अपेक्षित यश
वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ आणि लाभदायक ठरेल. रखडलेले काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सत्ता आणि सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. व्यवसाय विस्तार करण्यासाठी हा काळ योग्य आहे. कुटुंबासोबत मित्राचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आलेले काही अडथळे दूर होतील. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नुकसान टाळण्यासाठी ठोस पावले उचलावे लागतील. मार्केटिंग करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. बुद्धिमत्ता आणि विकासाच्या जोरावर संपत्ती, सन्मानात वाढ होईल. कुटुंबात शुभ कार्य असल्यामुळे वातावरण आनंदी असेल. प्रेमसंबंधात हा काळ अनुकूल असेल. जोडीदाराकडून आनंदाचा वर्षाव होईल. जोडीदाराकडून गिफ्ट मिळाल्यामुळे आनंदी असाल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आरोग्य सामान्य राहिल
धनु – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
सप्टेंबर महिना धनु राशीच्या लोकांसाठी लाभाचा आणि यशाचा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठा प्रस्ताव मिळेल. या काळाच तुमच्या क्षमतेच्या जोरावर समाजातील विविध क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होईल. भविष्यात तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल. तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित होईल. काम बिघडवण्याचा प्रयत्न होतील. पार्टनरशीपमध्ये काम करणाऱ्यांना पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी लागेल. या काळात इतरांवर जास्त विश्वास ठेवल्याने आर्थिक नुकसान होईल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. महिन्याच्या मध्यात परिस्थिती नियंत्रणात राहिल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्येवर तोडगा काढाल. तुम्हाला जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात घाईने काम करणे टाळा तसेच वाहन सावकाश चालवा. प्रेमसंबंधात हा आठवडा शुभ राहिल. मैत्रीचे रुपातंर प्रेमाच्या नात्यात होऊ शकते. प्रेम संबंधात विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
मकर – रागात निर्णय घेणे टाळा
मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना संमिश्र असेल. महिन्याच्या सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे मन थोडे अस्वस्थ राहिल. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. मित्रांच्या मदतीने आव्हानांवर मात कराल. जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ अस्थिर असेल. अचानक मोठ्या खर्चांमुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडू शकते. कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. मालमत्तेशी संबंधित वाद सोडवाल. रागाच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होईल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्याकडून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी विचार करा. आरोग्याची आणि नात्याची विशेष काळजी घ्या. नोकरीच्या संर्दभात तुम्हाला मोठे यश मिळेल. घरामध्ये सुखसोयींशी संबंधित गोष्टींमुळे आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा थोडा त्रासदायक असू शकतो. जोडीदाराशी संवाद साधल्याने अनेक प्रश्न मिटतील. मित्राच्या मदतीने नात्यात सुधारणा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
कुंभ – नातेसंबंधांवर लक्ष द्या
कुंभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. या काळात तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर विशेष लक्ष द्या. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक दूरावतील. या काळात आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्यावर कामाचा बोजा राहील. कामाच्या संदर्भात लांब प्रवास करावा लागेल. नवीन व्यवसायात हुशारीने पैसे गुंतवा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हिंतचिंतकांचे मत जरुर घ्या. महिन्याच्या मध्यात तुम्हाला अचानक मोठे यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. मालमत्ता खरेदी-विक्रीतून लाभ होईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जीवनाशी संबंधित मोठ्या समस्येवर उपाय मिळाल्याने आनंदी असाल. वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील. प्रेमी जोडीदारासोबत संबंध चांगले असतील. महिन्याच्या उत्तरार्धात जोडीदारासोबत आनंद वाढवण्याचे काम कराल. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. जोडीदार प्रत्येक क्षणी तुमच्या पाठीशी असेल.
मीन – व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल.
मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना चढ- उतारांचा असेल. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यापारात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. कठीण काळात जवळचे लोक कायम सोबत राहातील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे काम वेळेत पूर्ण कराल. या काळात मालमत्तेशी संबंधित वाद तुमच्या चिंतेचे कारण बनेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहिल. या काळात अडचणी काही प्रमाणात कमी होतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण केल्यास व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. कुटुंबाशी संबंधित घरगुती बाब समस्येचे कारण बनेल. योग्य वेळेची वाट पाहून समस्या सोडवा. महिन्याच्या शेवटी मानसिक आणि शारीरिक समस्या दु:खाचे कारण बनेल. प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. कोणत्याही प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.