Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 19 सप्टेंबर 2024: दुखापत होण्याची शक्यता, सावध राहा ! आळस सोडा, कामाला लागा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 19 September 2024 : गुरुवार, 19 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून धनलाभाचे योग आहेत. मूलांक 2 चे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. तर मूलांक 3 च्या लोकांना विरोधकांचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मूलांक 5 चा दिवस चांगला असून प्रत्येक काम पूर्ण होणार आहे. मूलांक 7 असणाऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. मूलांक 9 च्या जातकांनी रागावर कंट्रोल ठेवा आणि घरात मंगलकार्याच्या आयोजनाची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – धनलाभाचे योग, व्यापारात प्रगती
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग असून व्यापारातही प्रगती होईल. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. भावंडांसोबत बोलत असाल तर संयमाने वागा आणि कटू शब्दांचा वापर टाळा, अन्यथा धनहानीचे योग निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. आज सकारात्मक वातावरण असल्यामुळे तुमचा उत्साह वाढणार आहे.
मूलांक 2 – टेन्शन वाढण्याची शक्यता
मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन होईल. आर्थिक स्थिती ठिक असेल, तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. आज तुमचा राग तुमचा रक्तदाब वाढवू शकतो, त्यामुळे संयमाने वागा आणि राग वाढणार नाही याकडे लक्ष द्या. कुटुंब आणि जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 3 – विरोधक त्रास देण्याची शक्यता
मूलांक 3 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज कोणालाही सल्ला देणे कटाक्षाने टाळायला हवे. प्रतिस्पर्धी किंवा विरोधक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संबंध चांगले असतील, तुमच्या प्रत्येत कामात त्यांची साथ मिळेल. व्यवसाय क्षेत्रात काम वाढल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामावरील फोकस आणि नियोजन योग्य पद्धतीत करा, लाभ होईल.
मूलांक 4 – दुखापत होण्याची शक्यता, काळजी घ्या
मूलांक 4 साठी आजचा दिवस थोडा काळजी करण्यात जाणार आहे. अचानक तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे मन आणि मेंदू आज खूप विचलीत होतील आज कोणत्या खास विषयांवर निर्णय घ्यायचे असतील तर ते टाळावेत. घरी मंगलकार्याच्या आयोजनाची चर्चा होणार आहे, तुम्हाला आर्थिक बाजू अधिक मजबूत करावी लागेल. कुटुंब आणि जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
मूलांक 5 – प्रत्येक काम पूर्ण होणार
मूलांक 5 साठी आजचा दिवस चांगला असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जो काही विचार केलेला आहे, ते कार्य आज तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत सुखद वेळ घालवाल. जोडीदाराची तब्येत अचानक बिघडू शकते काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामात फोकस ठेवा आणि सहकाऱ्यांच्या मदतीने प्रोजेक्ट पूर्ण करा.
मूलांक 6 – व्यावसायिक टेन्शन त्रास देणार
मूलांक 6 साठी आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायाशी संबंधित काही चिंता तुम्हाला त्रास देणार आहे. विरोधक डोके वर काढतील आणि काहीजण तुम्हाला विरोधकांच्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमच्या वागण्यावर संयम ठेवा. आज घरातील सदस्यांसाठी गिफ्ट खरेदी करणार आहात. जोडीदारासोबत संबंध अधिक वृद्धींगत होतील.
मूलांक 7 – दुखापत होण्याची शक्यता, सावध राहा
मूलांक 7 साठी आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा तसेच आरोग्याची काळजी घ्या. रक्ताशी संबंधित आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तुमचे येणारे पैसे अचानक अडकू शकतात. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करा.
मूलांक 8 – आळस दूर करा, कामाला लागा
मूलांक 8 साठी दिवस खास नाही, तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दिवस संपता-संपता काही गोष्टी तुमचे टेन्शन वाढविणार आहेत. आज काम करताना आळस जाणवेल तुम्ही आळस दूर करण्याचा प्रयत्न करा. दिवसभर कामात फोकस आणि उत्साह ठेवा. घरातल्या व्यक्ती तुमच्या आळशीपणामुळे नाराज होतील. घरात वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 9 – घरात मंगलकार्याच्या आयोजनाची शक्यता
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. खूप दिवसांपासून घरात एखादे मंगल कार्याचे आयोजन करावे असा तुमचा विचार आहे, त्यावर आज ठोस निर्णय घेणार आहात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. घरात आणि जोडीदारासोबत आनंदी वातावरण असेल. व्यवसाय आणि ऑफिसमध्ये काम वाढेल पण तुम्ही फोकस असाल तर कामे पटपट मार्गी लागतील.