Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 20 सप्टेंबर 2024: कोणत्याही कामात अती घाई, संकटात नेई ! वेळचा सदुपयोग महत्त्वाचा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

6

Numerology Prediction, 20 September 2024 : शुक्रवार, 20 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. अवास्तव किंवा ज्या गोष्टीसोबत आपला संबध नाही त्याबद्दल चर्चा करु नका.मूलांक 2 असणाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मूलांक 3 च्या जातकांनी कामात घाई करु नये, कारण अती घाई संकटात नेते. मूलांक 5 च्या लोकांची कामे मार्गी लागतील पण त्यासाठी शॉर्टकटचा वापर करावा लागेल. मूलांक 7 चा होणार संकटांसोबत सामना तर मूलांक 9 ची होईल वादविवादातून सुटका होईल. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 20 सप्टेंबर 2024: कोणत्याही कामात अती घाई, संकटात नेई ! वेळचा सदुपयोग महत्त्वाचा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank Bhavishya 20 September 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 2,3,7 आणि मूलांक 8 यांच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवा तसेच तुमचा अहंकार फार उफाळून वर येणार नाही याची काळजी घ्या. मूलांक १ आणि मूलांक ९ साठी दिवस बरा आहे. आर्थिक स्थिती जर सामान्य असली तरी अर्थार्जनाचे अनेक मार्ग खुले होतील. वादविवादातून सुटका झाल्यामुळे तणाव कमी होईल. या संदर्भात तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – वेळेचा सदुपयोग करा

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. अवास्तव किंवा ज्या गोष्टीसोबत आपला संबध नाही त्याबद्दल चर्चा करु नका. तुमचा वेळ आज वाया जाण्याची शक्यता आहे. वेळेचा योग्य वापर करा, कारण वेळ निघून गेली की परत येत नाही. घरगुती कामांकडे तुम्ही कानाडोळा कराल. काही कर्ज किंवा उधारी घ्यायची असेल तर संध्याकाळची वेळ चांगली आहे.

मूलांक 2 – तणावाचा सामना करावा लागण्याची शक्यता

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्याबद्दल नियोजन करा. तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर त्यासंदर्भात ज्येष्ठांचा किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आज काही कारणामुळे ऑफिस किंवा घरी तणावाचा वातावरण निर्माण होवू शकते, तुम्ही शांत राहा आणि संयमाने वागा.

मूलांक 3 – कामात घाई नको, अनर्थ होण्याची शक्यता

मूलांक 3 असणारे जातर आज अधिक व्यस्त असणार आहेत. कोणतेही काम करताना मग ते ऑफिस असो वा घर कामांमध्ये घाई करू नका. अती घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. तुमचा अहंकार आणि राग यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही आज गुरूजनांसोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर करु शकता यामुळे तुमचा ताण हलका होईल.

मूलांक 4 – धनलाभाचा योग, आर्थिक स्थिती उत्तम

मूलांक 4 साठी आजचा दिवस धनलाभाचा आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार आहात कदाचीत स्वस्तःसाठी काही गोष्टी खरेदी कराल. मित्र परिवार तसेच कुटुंबासोबत आज खेळीमेळीचे वातावरण असेल त्यामुळे तुमचा ताणतणाव हलका होईल.

मूलांक 5 – कामे मार्गी लागण्यासाठी शॉर्टकटचा वापर

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला आजची पटापट पूर्ण व्हावीत असे वाटणार आहे. तुमचे काम त्वरीत पूर्ण व्हावे म्हणून तुम्ही शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न कराल. काही धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होणार आहात. दानधर्म केल्यामुळे समजात तुमची मान-प्रतीष्ठा वाढेल.

मूलांक 6 – वाणीवर संयम आणि गोडवा हवा

मूलांक 6 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला पत्नीकडून आनंदाची बातमी मिळेल. ऑफिस आणि व्यवसायात महत्त्वाचे कागदपत्र जपून ठेवा. आज तुमच्या वाणीवर संयम ठेवा आणि संवाद साधताना मधुरता आणि आदरभाव यांचा उपयोग करा तुम्हाला लाभ होईल.

मूलांक 7 – संकटांचा सामना होण्याची शक्यता

मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमच्या घरावर काही संकट येईल असे संकेत आहेत, तेव्हा सावध आणि सतर्क राहा. तुमचे महत्त्वाचे काम झाले नसल्यामुळे तुम्ही नाराज असाल पण याचा राग घरातील व्यक्तींवर काढू नका. ताणतणाव वाढल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

मूलांक 8 – जोडीदारासोबत भांडणाची शक्यता

मूलांक 8 साठी दिवस ठिक नाही. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. काही कारणामुळे तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. अचानक जुन्या मित्रांच्या भेटी होतील. ज्या विद्यार्थ्यांची परिक्षा आहे त्यांनी मन एकाग्र करून परिक्षा द्यावी तसेच जे काम करत आहोत त्यात फोकस रहावे. आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 9 – वादातून सुटका होईल, आर्थिक स्थिती सामान्य

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. खूप दिवसांपासून तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, ती करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमचा कोणासोबत वाद सुरु असेल तर त्यापासून आज सुटका होईल. आर्थिक स्थिती सामान्य असून धनप्राप्तीचे अनेक मार्ग समोर येतील त्याचा लाभ घ्या.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.