Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pitru Paksha 2024 : मृत्यूनंतर पिंडदान का केले जाते? जाणून घ्या गरुड पुराणानुसार महत्त्व आणि पितृदोष निवारण्यासाठी पूजा

6

Mrutuyananter Pind daan ka kele jate : भाद्रपद शुक्ल पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होतो. यंदा हा १८ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत असेल. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षात मतृ पितरांना पिंडदान अर्पण करण्याची परंपरा आहे. यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची विधी आहे. जाणून घेऊया पिंडदान करण्याचे महत्त्व आणि पितृदोष निवारण्याचे महत्त्व

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

When is Pind Daan done after death :

भाद्रपद शुक्ल पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होतो. यंदा हा १८ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत असेल. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षात मतृ पितरांना पिंडदान अर्पण करण्याची परंपरा आहे. यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची विधी आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार पिंडदान केल्याशिवाय मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही. पिंडदान गया आणि इतर ठिकाणी पिंडदान करण्याचे खूप महत्त्वाचे आहे. पितृपक्ष हा काळ मृत पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यामुळे यशस्वी आणि समृद्धी जीवनाचा आशीर्वाद देतात.

गरुड पुराणानुसार जर मृत्य व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील हानिकारक असू शकते. जाणून घेऊया पिंडदान करण्याचे महत्त्व आणि पितृदोष निवारण्याचे महत्त्व

पिंडदान म्हणजे काय?

पिंडदान हा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर केला जाणार पवित्र विधी आहे. गरुड पुराणानुसार स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी अनिवार्य आहे. हे कार्य पितरांना मोक्ष प्राप्त देण्यासाठी केले जाते. पिंडदान हे मृत पूर्वजांना अर्पण करण्यात आले आहे. यावेळी काळ्या तीळात शिजवलेला भात मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पितरांच्या नावाने अर्पण केले जाते. ज्यामुळे पितरांना शांती आणि मोक्ष मिळू शकेल.

पितृदोष निवारण्यासाठी

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो. त्याने पितृपक्षात पिंडदानाची विधी करायला हवी. या पूजेमध्ये तर्पण विधी, ब्राह्मणांना भोजन, वस्त्रे आणि पितरांजी पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते.

पिंडदान महत्त्व

पिंडदान हा एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. हा विधी केल्याने अनेक पापांपासून मुक्ती होते. तसेच पूर्वजांच्या तृप्तीसाठी केला जातो. हा विधी मृत आत्म्याला पुर्नजन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी केला जातो. पिंडदान केले नाही किंवा मृत्यूनंतर धार्मिक कार्य नाही तर पितरांचा आत्मा दु:खी आणि असंतुष्ट होतो.
आत्म्याला सांसारिक भौतिक बंधनांपासून वेगळे करण्यासाठी पिंडदान देखील आवश्यक असेल. पिंडदान हे शास्त्रानुसार मृत व्यक्तीचा पुत्रच त्याला स्वर्गाचा मार्ग प्रदान करु शकतो. त्यामुळे श्राध्द आणि पिंडदान करण्याचा पहिला अधिकार फक्त मुलाला असेल.
धर्मानुसार पित्याचे श्राद्ध पुत्रानेच करावे. जर मुलगा नसेल तर पत्नीला पिंडदान करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.