Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 25 सप्टेंबर 2024: धनलाभाचा योग, रखडलेले पेमेंट मिळणार ! रागावर नियंत्रण ठेवा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

6

Numerology Prediction, 25 September 2024 : बुधवार, 25 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही विचार केलेले सर्व कामे मार्गी लागणार आहेत. मूलांक 2 साठी धनलाभाचा योग तर रखडलेले पेमेंट मिळणार आहे. मूलांक 3 च्या जातकांनी वेळेचा सदुपयोग करावा. मूलांक 5 च्या लोकांनी बोलणे सौम्य ठेवा तर मूलांक 6 च्या जातकांनी रागावर नियंत्रण ठेवा. मूलांक 8 च्या लोकांनी गुंतवणुकि संदर्भात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या सकारात्मक विचारामुळे दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 25 सप्टेंबर 2024: धनलाभाचा योग, रखडलेले पेमेंट मिळणार ! रागावर नियंत्रण ठेवा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank Bhavishya 25 September 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1, 2, 3 आणि 5 यांच्यासाठी दिवस चांगला आहे, मूलांक 9 च्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने होणार आहे. मूलांक 6 असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवावे. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – सर्व कामे मार्गी लागणार, व्यापारात फायदा

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही विचार केलेले सर्व कामे मार्गी लागणार आहेत. जे लोक व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी दिवस उत्तम आहे. तुम्ही कोणासोबत भागिदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. यामुळे तुम्हा आर्थिक लाभ होणार आहे. कौटुंबिक बाबतीत दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती चांगली असून पैसे कमविण्याचे नवे मार्ग खुले होतील.

मूलांक 2 – धनलाभाचा योग, रखडलेले पेमेंट मिळणार

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचा योग आहे. तुमचे राहिलेले पेमेंट आज मिळणार आहे. आज अत्यंत विचारपूर्वक आणि संयमाने तुमची कामे पूर्ण कराल. आज तुम्ही वडील आणि मुलाचा सल्ला घेतला तर तुम्हाला बरेच लाभ होतील. वडिलांना एखादी भेटवस्तू देणे फायद्याचे ठरेल. आज तुमच्या बोलण्याची जादू तुमचे कुटुंब आणि कार्यक्षेत्रात पाहायला मिळेल. कौटुंबिक जीवनात लहानसहान मतभेद दिसतील, याकडे दुलर्क्ष करावे.

मूलांक 3 – वेळेचा सदुपयोग, धनलाभाचे योग

मूलांक 3 असणारे जातकांना आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल आणि अगदी योग्य प्रकारे तुमची कामे पूर्ण होतील. धनलाभाचे योग आहेत, कुटुंबात आज खेळीमेळीचे वातावरण असेल.आज व्यापारात काही आर्थिक गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला लाभ होईल. जर तुम्ही एखाद्या सरकारी संस्थेशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी दिवस अनुकूल आहे

मूलांक 4 – अडचणींचा सामना करावा लागेल

मूलांक 4 साठी आजचा दिवस फारसा सामान्य आहे. आज तुमच्या कामात काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. वडिलांची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे त्यांची काळजी घ्या, तपासण्या करण्यासाठी करायला सांगितल्या तर त्वरीत करा. तुम्हाला रक्तदाबासंदर्भात काही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. इतर व्यापारासाठी आज वेळ फारशी अनुकूल नसेल, तेव्हा काळजी घ्या.

मूलांक 5 – बोलणे सौम्य ठेवा, धनलाभाचा योग

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. जे लोक व्यापार करतात त्यांच्यासाठी दिवस चांगला असून नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. तुमचे कार्य पूर्ण करताना बुद्धी आणि चातुर्याचा वापर करा म्हणजे भविष्यात तुम्हाला चांगला लाभ होईल. धनसंपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची साथ तुम्हाला मिळेल. आज तुमचे बोलणे सौम्य ठेवा, तसेच कामे संयमाने करावीत.

मूलांक 6 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 6 साठी आजचा दिवस सामान्य आहे. आज कोणतीतरी गोष्ट तुम्हाला त्रास देवू शकते. आर्थिक स्थिती चांगली असून गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज कुटुंबीयांसोबत काही कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. जोडीदारासोबत काही कारणमुळे भांडण होण्याची शक्यता आहे. तुम्ही शांत राहा आणि राग वाढू देवू नका
ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल.

मूलांक 7 – विचार करून खर्च करा, भांडणाची शक्यता​

मूलांक 7 साठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या कार्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दिवसाची सुरुवात उत्तम असून तुमची विचारसारणी सकारात्मक असेल. तुमच्या स्वभावातील अहंकार आज वर येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये भांडण होईल तेव्हा सावध राहा. आज धनसंपत्तीचे योग आहेत पण तुम्ही सांभाळून पैसे खर्च करा. कौटुंबिक जीवन संमिश्र राहील.

मूलांक 8 – गुंतवणुकी संदर्भात ज्येष्ठांचा सल्ला घ्या

मूलांक 8 साठी दिवस सामान्य आहे. कुटुंबातील काही गोष्टी तुम्हाला त्रास देणार आहेत. तुमचा ताणतणाव खूप वाढणार आहे. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असेल. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेवून तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला लाभ होईल. जोडीदारासोबत छोटे मोठे भांडण होणार आहे. तुम्ही शांत राहा कारण भांडण वाढले तर नाते तुटू शकते. आज पायाला काही मार लागण्याची शक्यता दिसते, त्यामुळे काळजी घ्यावी.

मूलांक 9 – सकारात्मक विचाराने कामे मार्गी लागणार

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या सकारात्मक विचारामुळे दिवसाची सुरुवात चांगली होणार असून कामे मार्गी लागतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. धनलाभाचे योग असून त्याची गुंतवणूक योग्य जागी करा. कुटुंबात आज मतभेदाची शक्यता आहे. जोडीदारासोबत भांडण होणार आहे पण तुम्ही शांत राहा आणि तुमच्या रागाला आवर घाला. आज वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.