Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Upcoming women centric movies:अलीकडच्या वर्षांत स्त्रीकेंद्री सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. विषय, सादरीकरण, अभिनय या सर्वच बाबींमध्ये ते सिनेमे दर्जेदार ठरले. अलीकडे ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाल्यानं पुन्हा एकदा महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि जाणकार प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं. हा ट्रेंड सामाजिकदृष्ट्या सुखावणारा आणि बदल घडवणारा आहे; अशी प्रतिक्रिया अभिनेत्री व्यक्त करत आहेत. पडद्यावरील याच ‘महिलाराज’ सिनेमांविषयी…
हायलाइट्स:
- कुशल आणि कर्तृत्ववान स्त्री व्याक्तिरेखांचं सिनेमाच्या पडद्यावर चित्रण
- चित्रपटातून महिलांचा संघर्ष, त्याग, जिद्दीच्या प्रवासाचं दर्शन
यानिमित्तानं महिला सिनेमाचं नेतृत्व करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
women centric movies:बॉक्स ऑफिसवर असणार आता ‘महिलाराज’ ,बॉलिवूडसह या मराठी चित्रपटांची उत्सुकता
या दोघांनी उडवली कुशल बद्रिकेची झोप; म्हणाला- ‘शूटिंग संपवून रात्री उशिरा घरी आलो, मी घाबरलो…’
पूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये महिलांना केवळ प्रेमकथांतील पात्रं, साहाय्यक भूमिकांमध्ये दाखवलं गेलं होतं. ‘मदर इंडिया’, ‘अर्थ’, ‘बंधन’ यांसारख्या काही अपवादात्मक चित्रपटांनी महिलांची सशक्त भूमिका दाखवली होती; पण मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये महिलांना दुय्यम स्थान मिळत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत महिलांभोवती फिरणारे चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न झाला. विद्या बालनच्या ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’ या प्रवाहाला सुरुवात केली. तसंच मराठीच्या पडद्यावर गतवर्षी ‘बाईपण भारी देवा’, ‘बटरफ्लाय’, ‘श्यामची आई’, ‘फुलराणी’, ‘झिम्मा २’ सारख्या सिनेमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. येत्या काळातही ही स्त्रीकेंद्री महिलांची साखळी मोठी होत जाईल, अशी चर्चा आहे.
दारुच्या नशेत मित्राच्या बायकोशी लगट, भर पार्टीत खाल्लेला मार, पण याच घटनेमुळे झाला ११ कोटींचा नफा* प्रदर्शित सिनेमे
मायलेक
नाच गं घुमा
बाई गं
भक्षक
आर्टिकल ३७०
लापता लेडीज
ए वतन मेरे वतन
सावी
द बकिंगहम मर्डर्स
स्त्री २
* आगामी सिनेमे
फुलवंती
गुलाबी
जिगरा
इमर्जन्सी
लव्ह सितारा
बिन्नी अँड फॅमिली
स्त्रीकेंद्री चित्रपट आधीपासूनच होते; परंतु ७० आणि ८०च्या दशकातील अॅक्शनपट सिनेमांमुळे चित्र बदललं आणि नायिकांना फक्त ग्लॅमर आणि गाण्यांपुरतं मर्यादित ठेवलं गेलं. आता मात्र महिलांच्या भूमिका अधिक सशक्त बनत आहेत. स्त्री व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असलेले सिनेमे बॉक्स ऑफिसवरही यश मिळवत आहेत. माझ्या आवडत्या चित्रपटांमध्ये ‘लापता लेडीज’ आहे, ज्यामध्ये महिला कलाकार आणि महिला दिग्दर्शक किरण राव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
– तरण आदर्श, सिनेव्यवसाय विश्लेषक
सिनेमांच्या शीर्षक भूमिकेत स्त्री व्यक्तिरेखा असणं सिनेसृष्टीला नवा प्रेक्षकवर्ग मिळवून देत आहे. तसंच ही बाब सामाजिकदृष्ट्या आणि सिनेविश्वासाठीदेखील एक नवा आयाम गाठणारी आहे. यानिमित्तानं सिनेमांच्या कथानकाच्या कक्षा रुंदावत आहेत. हा बदल प्रामुख्यानं गेल्या दोनेक वर्षात झालेला दिसतोय.
– गिरीश जौहर, सिनेमा ट्रेंड अॅनालिस्ट